गोड नात्याची सुरुवात सांगणारे ‘रंग माळियेला’ गाणे

गोड नात्याची सुरुवात सांगणारे ‘रंग माळियेला’ गाणे

२०१९ हे वर्ष देखील मराठी चित्रपटांसाठी  बायेपिकमय असणार आहे. कारण २०१९ या वर्षाची सुरुवातच भाई या पु.ल. देशपांडे यांच्या बायोपिकने झाली आणि आता आणखी एक सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे तो म्हणजे ‘आनंदी गोपाळ’ भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असून या सिनेमातील एक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. गोड नात्याची सुरुवात सांगणारे असे हे गाणे आहे. रंग माळियेला असे या गाण्याचे बोल असून गाण्यात आनंदीबाईच्या लग्नाचे क्षण दाखवण्यात आले आहे. स्त्री शिक्षणाची कास धरणाऱ्या गोपाळराव यांनी आनंदीबाई लग्नानंतर शिक्षणाचे धडे द्यायला कशी सुरुवात केली हे देखील गाण्यात दाखवण्यात आले आहे.


कसे आहे गाणे?


एखाद्या बायोपिकवर चित्रपट तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्यात चालत नाही. त्याचा पुरेपूर विचार गाण्यातही करण्यात आला आहे. टीझरमध्ये  आनंदीबाईंना पाहायला गेलेल्या गोपाळरावांचा तिऱ्हाईत स्वभाव कसा आहे ते दाखवण्यात आला आहे. कारण मला लग्न करायचे आहे. त्यामुळे मी मुलगी पाहायला आलो असे ते थेट उत्तर देतात. आनंदीबाईंना जेवण करता येते का? हे विचारत असताना आनंदीबाईमधील निरागसता या गाण्यात पाहायला मिळते. शिवाय गोपाळराव आनंदीबाईंनी शिकावे यासाठी करत असलेले प्रयत्न दखील दिसतात. घर- संसार सांभाळून शिक्षण घेणारी आनंदीबाई जोशी आपल्याला पाहायला मिळते. गाण्यात शेवटी आनंदीबाई जोशी नऊवारीवर शाळेचे बूट घालून जाताना दिसते. तिथूनच त्यांचा डॉक्टर बनण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झालेला दाखवण्यात आला आहे. त्यामुळे गाण्यातील प्रत्येक क्षण आपल्याला रोखून धरतात. केतकी माटेगावकर आणि शरयु दाते यांनी हे गाणे गायले आहे.गाण्याला संगीत ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी दिले आहे. त्यामुळे गाणे छान जुळून आले आहे.  जे सतत गुणगुणायची इच्छा होते.

Subscribe to POPxoTV

ललित साकारतोय गोपाळराव


तरुणींच्या गळ्याची ताईत असलेला ललित नेहमीच चॉकलेट बॉयच्या भुमिकांमध्ये दिसला आहे. पण पहिल्यांदाच बायोपिकच्या निमित्ताने त्याच्या अभिनयातील वेगळी चुणूक पाहायला मिळणार आहे. ललित यात गोपाळरावांची महत्वपूर्ण भूमिका साकारतोय. टीझर आणि गाण्यातून त्याची डायलॉग डिलीव्हरी उत्तम वाटत आहे. त्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत केलेली दिसून आली आहे. आनंदीबाई जोशी यांची भूमिका साकारलेली मुलगीही तितकीच गोड आहे. पण तिचे नाव मात्र सांगण्यात आलेले नाही. येत्या १५ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यानंतर ही लिटल स्टार कोण? हे समजेलच. पण याआधी देखील आनंदीबाई जोशींच्या जीवनावर आधारित मालिका झी मराठीवर होऊन गेली आहे. 'उंच माझा झोका' असे या मालिकेचे नाव होते. या सिनेमाची घोषणा झाल्यानंतर आनंदीबाईंची भूमिका कोण साकारतेय ही उत्सुकता होती. पण मालिकेत आनंदीबाई साकारणारी बालकलाकार यात नाही तर एक नवा चेहरा या निमित्ताने समोर आला आहे. 


जाणून घ्या 'आनंदी गोपाळ' चित्रपटाविषयी


प्रेक्षकांची उत्सुकता 


चित्रपटाच्या टीझरनंतर या त्याच्या रिलीजची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर आल्यानंतरच आनंदीबाई जोशी कोण होत्या? याचा अधिक सर्च करण्यात आला. मराठीच नाही तर अमराठी प्रेक्षकांनाही मराठीतील दर्जेदार चित्रपट आवडत आहे. त्यामुळे या सिनेमाची प्रतिक्षा असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे. 


(फोटो सौजन्य- Instagram)anadi-gopal-fi