तापसी पन्नू कंगनाची स्वस्तातली कॉपी….कंगनाच्या बहिणीने पुन्हा उधळली मुक्ताफळ

तापसी पन्नू कंगनाची स्वस्तातली कॉपी….कंगनाच्या बहिणीने पुन्हा उधळली मुक्ताफळ

बॉलीवूडमध्ये सतत कोणाचं ना कोणाचं टीकायुद्ध सुरू असतं आणि आजकाल यात अग्रेसर आहे अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली रणौत. जी प्रत्येक आठवड्याला बॉलीवूडमधील कोणा ना कोणावर तिची मुक्ताफळ उधळत असते. यावेळी तिच्या निशाण्यावर आहे अभिनेत्री तापसी पन्नू.

तापसी पन्नूवर का केली टीका

रंगोलीला फक्त तिची मुक्ताफळ उधळण्यासाठी निमित्त लागतं. 2 जुलैला कंगना आणि राजकुमार राव स्टारर जजमेंटल है क्या ट्रेलर रिलीज झालं. हे ट्रेलर रिलीज होताच ते सोशल मीडियावर ट्रेंड करत होतं. फॅन्ससोबतच बॉलीवूड सेलेब्सही या ट्रेलरचं कौतुक करत होते. त्यावर वरून धवन आणि तापसीनेही ट्वीट केलं. पण दोघांनाही सामना करावा लागला तो कंगनाची बहीण रंगोलीच्या रोषाचा. तिने आधी वरूण धवनवर टीका केली आणि नंतर तापसीवर निशाणा साधला. असं घडताच दिग्दर्शक अनुराग कश्यप या वादात उतरला आणि टीकायुद्ध अजूनच चिघळलं. 

तापसीचं कौतुक तिच्यावरच उलटलं

तापसीने तिच्या ट्विटमध्ये लिहीलं होतं की, हे ट्रेलर खूपच कूल वाटत आहे. या ट्रेलरकडून आधीच खूप अपेक्षा होत्या आणि आता तर ते खूपच चांगलं वाटतंय. तापसीने जसं ट्वीट केलं तसं रंगोलीने त्यावर कमेंट करत लिहीलं की, काही लोकं कंगनाला कॉपी करत स्वतःच दुकान चालवतात. पण लक्ष द्या की, ते कधी कंगनाच्या कामाची स्तुती किंवा तिची दखल घेत नाहीत. तापसी तू कंगनाची स्वस्तातली कॉपी करणं बंद केलं पाहिजे. 

अनुरागने घेतली तापसीची बाजू

रंगोलीच्या या तिखट कमेंटनंतर अनुराग कश्यपने रंगोलीला रिप्लाय करत लिहीलं की, कम ऑन रंगोली आता तर तू हद्द पार केली आहेस. यावर काय म्हणावं तेच कळत नाही. तापसी आणि तुझी बहीण कंगना या दोघींसोबत मी काम केलं आणि ही गोष्ट माझ्या समजण्यापलीकडे आहे. ट्रेलरचं कौतुक करणं म्हणजे त्याच्या प्रत्येक पैलूच कौतुक करण्यासारखं आहे आणि यात आपोआपच कंगनाचा समावेश होतो. 

रंगोलीनेही दिलं अनुरागला उत्तर

काही लोकांना कोणत्याही गोष्टीचा फरकच पडत नाही. तसंच काहीसं कंगनाच्या बहिणीचं आहे. तिने अनुरागलाही खरं खोटं सुनवलं. तिने उत्तर दिलं की, मी सगळ्यांना आरसा दाखवणार आहे. मला माहीत आहे की, तुम्ही कंगनासोबत काम करत आहात. पण कोणताही मुद्दा समजून न घेता मधे पडू नका. बॅक ऑफ.

आता काय म्हणावं रंगोलीच्या या मुक्ताफळांना. वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात ना तेच खरं. पण आता रंगोली बॉलीवूडमधील प्रत्येकालाच टार्गेट करणार की काय. कंगनाने याबाबतही जजमेंटल होणं गरजेचं आहे.

हेही वाचा -

 कंगनाला पाठिंबा देत ह्रतिकच्या बहिणीने केले ह्रतिकवर गंभीर आरोप

कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ चं ट्रेलर रद्द, सेन्सॉर बोर्डचा चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप

रणबीर- आलियावर कंगना पुन्हा बरसली, साधला निशाणा