राणी मुखर्जीच्या 'हिचकी' चित्रपटाला इटलीतील ग्रॅफन पुरस्कार

राणी मुखर्जीच्या 'हिचकी' चित्रपटाला इटलीतील ग्रॅफन पुरस्कार

राणी मुखर्जीने हिचकी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. हा चित्रपपट जगभरातील प्रेक्षकांना फारच आवडला होता. नुकताच हिचकी चित्रपट इटलीतील 49 व्या गिफोनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये हिचकी चित्रपटाला इटलीतील ग्रॅफन पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्तम चित्रपटासाठी मिळालेल्या या पुरस्कारामुळे बॉलीवूडमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Instagram

हिचकीमध्ये राणीने साकारली ही महत्त्वाची भूमिका

हिचकी चित्रपट हा टॉरेट सिन्ड्रोम वर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात राणीने शिक्षिकेची भूमिका साकारली होती. या चित्रपटात राणीने तिच्या या आजारावर मात करत मुलांना शिकवण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. अतिशय गरिब कुटुंबातील मात्र परिस्थितीमुळे बिघडलेल्या मुलांना तिने या चित्रपटात यशाचा मार्ग दाखवण्याचं काम केलं होतं. ज्यामुळे हा चित्रपट शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी प्रेरणादायी होता. या चित्रपटाने जगभरात जवळजवळ 250 कोटीहून अधिक कमाई केली होती.

राणी मुखर्जी पुन्हा एकदा मर्दानी अवतारात

सध्या राणी मुखर्जी तिच्या मर्दानी 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. राणी मुखर्जीचा मर्दानी 2014 साली एक हिट चित्रपट ठरला होता. मर्दानी या चित्रपटात राणी मुखर्जीने शिवानी शिवाजी रॉय या पोलिस अधिकाऱ्याची  भूमिका साकारली होती. या चित्रपटातील राणीच्या या हटके भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली प्रतिसाद दिला होता. लहान मुलींची मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश या विषयावर आधारित हा चित्रपट होता. आता मर्दानी चित्रपटाचा सिक्वल येत आहे. आता मर्दानी 2 मध्ये राणी मुखर्जी नेमकी कोणती भूमिका साकारणार या कडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या चित्रपटात राणी पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका साकारणार आहे. सध्या सिक्वल आणि पोलिसाच्या भूमिकांचा हिंदी चित्रपटात ट्रेंड आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वल येत  आहेत. शिवाय दबंग,सिंघम,सिम्बा, मर्दानी अशा अनेक चित्रपटामधून साकारलेल्या पोलिसांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. थोडक्यात चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेला एक प्रकारचं ग्लॅमर निर्माण झालं आहे. मात्र मर्दानी मधील भूमिका ही महिला पोलिस अधिकाऱ्याची असल्याने हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा असेल.

Instagram

राणी पुन्हा साकारणार पोलिस अधिकारी

राणी मुखर्जीने तिच्या या भूमिकेसाठी प्रंचड मेहनत घेतली असून ती तिच्या सोशल मीडियावरील फोटोजवरून दिसून येत आहे. एका डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणं नक्कीच तिच्यासाठी आव्हानात्मक असणार. या चित्रपटाची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करत आहे. तर दिग्दर्शक गोपी पुथरन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. वास्तविक राणीने लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर चित्रपटात काम करणं कमी केलं होतं. मर्दानी नंतर राणीने ‘हिचकी; या चित्रपटात काम केलं होतं. हिचकीमधील तिची भूमिकादेखील प्रंचड गाजली होती. राणी मोजक्या चित्रपटात काम करत असली तरी तिच्या भूमिका हटके आणि महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे आजही राणीचे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसतात. तिच्या भूमिकांचं नेहमीच कौतुक होत असतं.

अधिक वाचा

 Indian Idol’ फेम मराठमोळा राहुल वैद्य करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

एक नवं प्लॅनेट, एक नवीन योजना... काय असेल अमृता खानविलकरची नेक्स्ट स्टेप

BBM2 : दिवसेंदिवस वाढतेय शिवानीची लोकप्रियता

इनायासह काढलेल्या फोटोवर सोहा अली खानला नेटकऱ्यांनी दिल्या वाईट कमेंट्स

फोटोसौजन्य - इन्साग्राम