‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी राणू मंडल बनली बॉलीवूड गायिका

‘या’ व्यक्तीमुळे स्टेशनवर गाणारी राणू मंडल बनली बॉलीवूड गायिका

कोणाचं भाग्य कधी उजळेल हे काही सांगता येत नाही. हे वाक्य प्रत्यक्षात खरं झालंय ते स्टेशनवर गाणाऱ्या राणू मंडाल या महिलेच्या बाबतीत…रेल्वे स्टेशनवर गात-गात राणू बॉलिवूडच्या गायकांपर्यंत पोहचली आहे. राणू मंडलचं आयुष्य एका क्षणात बदललं आणि ती रस्त्यावरून थेट बॉलिवूडच्या स्टुडिओपर्यंत पोहोचली.

राणूने सोशल मीडियावर सगळ्यांनाच आपल्या आवाजाची मोहिनी घातली आहे. यामुळेच इंटरनेटवर युजर्सना राणूने आपला वेगळा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. बॉलिवूडचा दिग्गज संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियाने आपल्या आगामी चित्रपटात संधी दिली आहे. परंतु, हिमेश हा पहिला व्यक्ती आहे की, राणूच्या आयुष्यातील एक देवदूत ठरला आहे. मात्र, सगळी किमया साधली ती तिच्या एका व्हिडिओने. पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती होता तरी कोण?

‘राणू’च्या आयुष्यात ‘देवदूत’ बनली ‘ही’ व्यक्ती

Instagram

रस्त्यावर गात असतानाचा तिचा व्हिडिओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल झाला आणि राणूच्या नशीबाला एक प्रकारे कलाटणीच मिळाली. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणा-या त्या व्यक्तीला राणू कधीच विसरू शकणार नाही. तिच्या आयुष्यात ‘देवदूत’ बनून आलेली ही व्यक्ती नेमकी कोण? यावर अनेक चर्चा सुरू असून तसे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. मात्र या गोष्टीचा अखेर उलगडा झाला आहे. या व्यक्तीचे नाव आहे, एतींद्र चक्रवर्ती. या व्यक्तीने राणूचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर शेअर केला. त्याला चांगलीच पसंती मिळत हा व्हिडिओ बऱ्याच लोकांनी व्हायरल केल्याने आज राणू हिमेश रेशमियासह एक नवं गाणं रेकॉर्ड केलं आहे.

आमीर खानची मुलगी इरा खान झाली विचित्र ड्रेसमुळे ट्रोल, फोटो व्हायरल

हिमेश रेशमियाबरोबर राणूने रेकॉर्ड केलं पहिलं गाणं!

View this post on Instagram

#Ranumandal

A post shared by 🤤sex ki bhuki🤤 (@sexylondiya234567790) on

या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर सगळ्यांनी राणूची तुलना थेट लता मंगेशकरबरोबर केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राणू रातोरात स्टार झाली. राणूने आपलं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं आहे. राणूने आपलं पहिलं गाणं गायक, संगीतकार हिमेश रेशमियासोबत गायलं आहे. या गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतचं मुंबईत पार पडलं. या रेकॉर्डिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हिमेश राणूकडून गाणं गाऊन घेताना दिसत आहे. राणूने ‘तेरी मेरी कहानी’ हे आपलं पहिलं वहिलं गाणं रेकॉर्ड केलं आहे. राणूचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला युजरर्सने लता मंगेशकरांची उपमा दिली होती.

वरूण धवन नोव्हेंबरमध्ये करणार डेस्टिनेशन वेडिंग

कोण आहे ही राणू मंडाल?

Instagram

पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर राणू मंडल ही महिला गाणी गात स्वत:च पोट भरत असायची. तिच्या मधुर आवाजाने अनेकांवर तिने जादूच केली आहे. यावेळी काहींनी फक्त तिचे कौतुक केले तर काहींनी तिच्या हातावर पैसे टाकले. मात्र एतींद्र चक्रवर्तीने गाणाऱ्या राणूला बघताच तिच्या गाण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यावेळी राणूनेही लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गीत गात होती. एतींद्रने तिचा व्हिडिओ बनवला आणि आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. तो इतका व्हायरल झाला की, या एका व्हिडिओमुळे राणूचे संपूर्ण आयुष्य वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचलं आहे. राणूसाठी खुद्द सलीम खान यांनी हिमेश रेशमियाकडे शिफारस केली होती. या गाण्यासाठी हिमेशने राणूला 7 लाख दिले. राणूने सुरुवातीला या गाण्याचे मानधन घ्यायला नकार दिला.

SHOCKING : Insha-Allah चित्रपटाबाबत भाईजानचं धक्कादायक ट्वीट