तुमचा आवडता रणवीर बनणार गुज्जू भाई, साकारणार जयेश भाई

तुमचा आवडता रणवीर बनणार गुज्जू भाई, साकारणार जयेश भाई

तुम्ही रणवीर सिंहचे फॅन असाल तर तुम्हाला त्याच्या प्रत्येक अपडेट देणे आमचे काम आहे.आजही रणवीर संदर्भातील एक गॉसिप आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आता तुम्हाला माहीत आहे की, सध्या रणवीर 83 या वर्ल्डकपवर आधारित चित्रपटाचे शुटींग करतोय. हा चित्रपट संपणार तोच रणवीरचा आणखी एक प्रोजेक्ट सुरु होणार आहे. यावेळी तुमचा लाडका रणवीर तुम्हाला गुज्जू भाई साकारताना दिसणार आहे. ‘अने आ गुज्जू भाई ना नाम जयेश भाई छे’......


नुकतीच केली घोषणा
 

 

 


View this post on Instagram


 

 

Its a ‘miracle script’!!! 😍 Thrilled to announce my next film - ‘JAYESHBHAI JORDAAR’ 🎥 @yrf #JayeshbhaiJordaar


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on
रणवीसर सध्या एकामागोमाग एक हिट चित्रपट देत आहे. बाजीराव मस्तानी,पद्मावत, सिंबा, गली बॉय असे एकामागोमाग एक वेगळ्या भूमिका असलेले हिट चित्रपट रणवीरने या दोन ते तीन वर्षांच्या काळात दिले आहे. सध्या तो 83 या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटासाठी लागणारी मेहनत तर तो करताना दिसतोच आहे. पण तो चित्रपट संपत नाही तोच आणखी एक प्रोजेक्ट त्याच्याकडे आला असल्याचे कळत आहे. कारण त्याने शेअर केलेला एक फोटोच सगळे सांगून जात आहे. त्याने त्याचा हातात स्क्रिप्ट घेतलेला फोटो शेअर करत #jayeshbhaijordar असे लिहिले आहे.  त्याने गलियो की रासलीला- रामलीला या चित्रपटात त्याने गुजराती माणसाची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटातही तो गुज्जू भाईची भूमिका साकारणार आहे असे कळत आहे. त्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा त्याच्या अकाऊंटवरुन केली आहे. 


यशराज फिल्मचा आहे चित्रपट


जयेशभाई जोरदार हा यशराजचा चित्रपट असून हा चित्रपट दिव्यांक ठक्कर दिग्दर्शित करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीरला ही कथा आवडली आणि त्याने लगेचच या चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटातील जयेश हा दिलदार आहे असे देखील त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. 83 या चित्रपटाचे शुटींग साधारण ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे. यशराजसोबत रणवीर पहिल्यांदा काम करत नाही तर या आधीही त्याने यशराज फिल्म्ससोबत काम करुन स्वत:ला सिद्ध केले आहे. फोटोसोबतच त्याने दिग्दर्शक दिव्यांक ठक्करसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. 
 

 

 


View this post on Instagram


 

 

Where in the world did this kid come from?!?!? #DivyangThakkar is straight up JORDAAR !!! 😍🎥❤️🙏🏽 @yrf #JayeshbhaiJordaar


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on
83 होणार 2019 मध्ये रिलीज 


ranveer 83


1983 च्या वर्ल्डकपवर आधारित असलेला 83 हा बीगबजेट चित्रपट सध्या रणवीर करत आहे. क्रिकेटर्सची भूमिका साकारणे काही साधे- सोपे काम नाही हे त्याने एका व्हिडिओतून दाखवून दिले. या चित्रपटाच्या मेकींगची एक झलक काहीच दिवसांपूर्वी रणवीरने शेअर केली होती. हा चित्रपट 2019मध्ये रिलीज होणार आहे.


रणवीरचे लक जोरात


सध्या बघाव तिकडे चर्चा असते  फक्त रणवीर सिंहची.. हल्ली तर तो अनेकांच्या गळ्याचा ताईत बनला आहे. आता तो काहीही कपडे घालो तरी तो मुलींना हॉट वाटतो. त्याच्या चित्रविचित्र फॅशन आता अनेकांना आवडीच्या वाटू लागल्या आहेत. दीपिका पदुकोणसोबत लग्न केल्यानंतर तर त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. दीपिका त्याच्यासाठी लकी आहे असे तो म्हणत असला तरी त्याने या इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी फार मेहनत केला आहे. तो अजूनही मेहनत करत आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिका या वेगळ्या आहेत हे नव्याने सांगायला नको. आता तो जयेश भाई कसा साकारतो याची उत्सुकता आहे.


 (सौजन्य- Instagram)