दीपिका पादुकोणच्या 'द्रौपदी'नंतर रणवीर सिंह साकारणार आता सूर्यपुत्र 'कर्ण'

दीपिका पादुकोणच्या 'द्रौपदी'नंतर रणवीर सिंह  साकारणार आता सूर्यपुत्र 'कर्ण'

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहचे चाहते अनेक आहेत. मागच्या वर्षभरापासून त्याचे चाहते रणवीरच्या '83' या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र कोरोनामुळे हा चित्रपट चांगलाच लांबणीवर पडला आहे. आता या वर्षी जून महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल. पण एवढंच नाही लवकरच रणविरला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत पाहण्याची संधीदेखील त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. वासू भगनानी प्रॉडक्शन आणि पूजा फिल्मने नुकतंच महाभारतातील एक महत्त्वाचं पात्र सूर्यपुत्र महावीर कर्ण यावर चित्रपट करत असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कर्णाची भूमिका साकारण्यासाठी रणविर सिंहला विचारण्यात आलेलं आहे. रणवीरनेही या प्रोजेक्टसाठी त्यांची संमती दर्शवली आहे. रणवीरने या भूमिकेसाठी होकार दर्शवल्यामुळे चाहत्यांसमोर तो आता तिसऱ्या ऐतिहासिक भूमिकेतून येणार आहे. या आधी त्याने बाजीराव मस्तानीमध्ये बाजीराव पेशवे आणि पद्मावतमध्ये अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. 

चित्रपटाची झाली अधिकृत घोषणा

रणवीरने या चित्रपटासाठी होकार कळवला असला तरी अजून या चित्रपटाबाबत रणवीर साकारत असलेल्या भूमिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार निर्मात्यांना या चित्रपटात कर्णाची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंह परफेक्ट वाटत आहे. कारण तो या भूमिकेत अगदी चपखल बसू शकतो असं त्यांना वाटतं. निर्मात्यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा 23 फेब्रुवारीलाच केली होती. ज्यामुळे या चित्रपटाबाबत आणि त्यात साकरण्यात येणाऱ्या भूमिका कोण करणार याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. निर्मात्यांच्या मते हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल ज्यामध्ये हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडल या भाषांचा समावेश असेल. हा या वर्षीचा आणखी एक बिगबजेट चित्रपट असेल. कारण यासाठी जवळजवळ तीनशे कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. या चित्रपटावर गेली पाच वर्षे काम सुरू आहे. यापूर्वी या चित्रपटाचं शूटिंग सुरू करून दोन वेळा बंद करण्यात आलेलं होतं. त्यामुळे अधिकृत घोषणा झाल्यावरच समजेल की यामध्ये रणवीर खरंच कर्णाची भूमिका साकारणार की नाही.

एकीकडे दीपिका साकारणार 'द्रौपदी'

आश्चर्याची गोष्ट म्हणजे रणविर एकीकडे सूर्यपुत्र कर्णाची भूमिका साकारत असेल तर दीपिका पादुकोण द्रौपदीच्या भूमिकेत असेल. कारण काही दिवसांपूर्वीच दीपिकाने 'दी पॅलेस ऑफ इल्युशन' या पुस्तकावर आधारित एतिहासिक चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली आहे. या चित्रपटात दौपदीच्या दृष्टीकोनातून महाभारत दाखवण्यात येणार आहे आणि त्यात दीपिका पादुकोन 'दौपदी'ची भूमिका साकारणार आहे. लवकरच या दोघांचा एकत्र भूमिका असलेला '83' प्रेक्षकांना पाहता येईल. या चित्रपटात रणवीर माजी क्रिकेटर कपिल देव तर दीपिका त्यांची पत्नी रोमी भाटिया साकारणार आहे. शिवाय रणवीर लवकरच रोहीत शेट्टीच्या 'सूर्यवंशी'मध्येही झळकेल. 'जयेशभाई' या कॉमेडी चित्रपटातही तो मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे करण जौहरच्या एका चित्रपटात तो आलिया भटसोबत काम करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील.