रणवीर सिंगने केलाय दीपिकावर गंभीर आरोप, काय केले दीपिकाने

रणवीर सिंगने केलाय दीपिकावर गंभीर आरोप, काय केले दीपिकाने

दीपवीर अर्थात दीपका आणि रणवीर सिंह हे बॉलीवूडमधील सर्वात क्यूट कपल म्हणून ओळखले जातात आणि दोघांचेही लाखो - करोडो चाहते आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये सामान्य जनतेप्रमाणेच सर्व सेलिब्रिटीही घरात बंदिस्त आहेत. त्यामुळे सगळे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ आणि फिटनेस व्हिडिओ करून आपल्या चाहत्यांचं मन रमवत आहेत. तर दीपिका आणि रणवीरने आपल्या चाहत्यांसाठी एंटरटेनमेंटचे काही एपिसोड्सच सोशल मीडियावर आणल्याचं दिसून येत आहे. पण आता रणवीरने दीपिकावर चक्क एक गंभीर आरोप केला आहे. रणवीर आणि दीपिका सध्या घरी आहेत आणि दोघेही एकमेकांसह वेळ घालवत आहेत. असं असातना नक्की दीपिका आणि रणवीरमध्ये असं काय बिनसले की रणवीरने दीपिकावर गंभीर आरोप केलाय. तुम्ही कोणताही तर्कवितर्क काढू नका.  नक्की काय झालंय ते आम्ही तुम्हाला सांगतो. 

दीपिका रणवीरला खाऊ घालतेय स्वादिष्ट जेवण

रणवीर सिंहने आपली पत्नी दीपिका पादुकोण लॉकडाऊन दरम्यान आपल्याला स्वादिष्ट जेवण रोज बनवून खायला घालत असल्याचं सांगितलं आहे. ज्यामुळे त्याला जिममध्ये जास्त मेहनत घ्यावी लागत असल्याचा आरोप त्याने दीपिकावर केलाय. रणवीरने आपली पत्नी दीपिकाला ‘लव्हली’ म्हटलं असून आपल्याला रोज दीपिका स्वादिष्ट जेवण तयार करून खायला घालत असल्याचंही सांगितलं आहे. पण त्याचा परिणाम आपल्याला जिममध्ये जास्त मेहनत करावी लागत असल्याचंही रणवीरने म्हटलं आहे. रणवीरने शनिवारी आपल्या लाईव्हमध्येही दीपिकाबद्दल बरंच काही बोलला. यामध्ये त्याने सांगितलं की, ‘माझी पत्नी मला खूपच स्वादिष्ट जेवण बनवून खायला देत आहे. यामध्ये केक, आईस्क्रिम आणि बरंच काही आहे. त्यामुळे मला जिममध्ये दुप्पट मेहनत करावी लागत आहे. आजही ती एक नवी डिश बनवण्याच्या मूडमध्ये आहे. ती इतकं सुंदर जेवण बनवते की, मला खात राहावं वाटतं. ती खूपच लाघवी आहे.’ त्याशिवाय रणवीर एका व्हिडिओमध्ये जिममध्ये वर्कआऊट करतानाही दिसला. त्याने आपल्या चाहत्यांना त्यांची काळजी घेण्यासही सांगितले. ‘मला आशा आहे की तुम्ही सगळे आपापल्या घरात सुरक्षित आहात. तुम्हा सर्वांना खूप सारे प्रेम.’ त्याशिवाय रणवीरने दीपिकाने त्याच्यासाठी बनवलेल्या जेवणाचे फोटोही शेअर केले आहेत.

सध्या असा वेळ घालवत आहे दीपिका- रणवीर

जेवणामध्ये पास्ता, गार्लिक ब्रेड

दीपिकाने रणवीरसाठी खास पास्ता, गार्लिक ब्रेड आणि ग्रॅटिन डुपिनिन असे पदार्थ बनवले होते. तसंच रणवीरने त्याच्यासाठी बनवलेल्या नाश्त्याचाही फोटो शेअर केला होता. दीपिका आणि रणवीर दोघेही आपापल्या सोशल मीडियावरून सध्या लॉकडाऊनमध्ये करत असलेल्या अॅक्टिव्हिटी शेअर करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजनही करत आहेत. त्याशिवाय दोघे एकमेकांची नेहमीप्रमणे काळजीही घेत आहेत.

CoronaVirus: चित्रीकरण बंद असूनही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार वेतन

सोशल मीडियावर केले आर्जव

View this post on Instagram

🙏🏽

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

हे सगळं असलं तरीही दीपिका आणि रणवीरने आवर्जून सर्वांनाच आर्जवही केले आहे. सध्याची स्थिती पाहता COVID - 19 महामारीसाठी पीएम केअर फंडमध्ये  लोकांना दान करण्यास सांगितले आहे. या महामारीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यासही सांगितले आहे. रणवीरने ट्विटमध्ये म्हटले की, ‘ही प्रत्येक गोष्ट सध्या  मोजली जाणार आहे. आम्ही नम्रतेने आपल्याला PM केअर फंडमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही ही प्रतिज्ञा केली आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही पण कराल. आपण सर्व एकत्र आहोतत आणि लवकरच सर्व काही ठीक होईल.  जय हिंद!’ दीपिका आणि रणवीर दोघांनीही यामध्ये आपले योगदान दिले असून त्यांनी किती पैसे जमा केले आहेत हे मात्र कोणालाही कळू दिलेले नाही. अशा बऱ्याच सेलिब्रिटींनी सढळहस्ते मदत केली असून आकडा कळू दिलेला नाही. गुप्तदान हेच मोलाचे दान असते या उक्तीनुसार सर्वांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. 

दीपिका आणि रणवीरचं नातं टिकलं कारण...