डार्लिंग हबीने दिल्या दीपिकाच्या फोटोवर अशा रोमँटीक कमेंट्स

डार्लिंग हबीने दिल्या दीपिकाच्या फोटोवर अशा रोमँटीक कमेंट्स

बी टाऊनमधील सेलिब्रिटी कपल म्हणजे रणवीर आणि दीपिका यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल तर सगळ्यांनाच माहीत आहे. एकीकडे काही सेलिब्रिटी त्यांचे खासगी आयुष्य सोशल मीडियावर शेअर करत नाही. तर दुसरीकडे काहीजण त्यांना हवे तसे राहतात. त्यातीलच एक आहेत रणवीर आणि दीपिका… कारण ते त्यांच्यातील काहीच गोष्टी लपवून ठेवत नाही. रणवीरला दीपिकाचा फोटो आवडला की, इतर चाहत्यांप्रमाणे अगदी दिलखुलास कमेंट करतो. आताही दीपिकाच्या फोटोवर रणवीरने रोमँटीक कमेंट करत सगळ्यांनाच  #couplegoals काय असतात ते दाखवून दिले आहे.


कोणत्या फोटोवर केली आहे कमेंट?


deepika fi  %281%29


 


deepika comment


दीपिकाच्या सौंदर्याच्या चर्चा जगभरात आहेत. तिच्या इन्स्टाग्रामच्या फोटोवर लाखो कमेंट असतात. यात नेहमी एक कमेंट खास असते ती तिचा डार्लिंग हबी रणवीर सिंहची… तो नेहमीच दीपिकाच्या फोटोवर कमेंट करत असतो. पण कान्स फेस्टिव्हलमधील तिच्या लुकच्या फोटोवर रणवीरने अशी काय कमेंट केली की, सगळ्या बॉयफ्रेंडनी त्याच्याकडून धडा घ्यायला हवा. आता झालं असं की, दिपिकाने तिचा कान्समधील फोटो शेअर करत taddaa! अशी कॅप्शन लिहिली त्यावर रणवीरने कमेंट देतMore like Ta-Ta-Ta-Daaaaa-TA-DAAAAAAAAAA !!!!!! 👑अशी कमेंट दिली आहे. तर दीपिकाने दुसरा फोटो शेअर करत close up लुक शेअर केला आहे.  Aur pass… अशी नॉटी कमेंट दिली आहे. एकूणच या दोघांची लव्हस्टोरी आणि त्यांचे एकमेकांवरील प्रेम एकदम झक्कास आहे असे म्हणायला हवे.


कान्सच्या रेडकार्पेटवर प्रियांका,दीपिका आणि कंगनाचा जलवा


तयार होतानाचा व्हिडिओ केला शेअर


दीपिकाने या कार्यक्रमासाठी तयार होतानाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये त्याचा मेकअप आणि हेअर दाखवण्यात आला आहे. जो मस्त आहे. त्यालाही अनेकांनी खूप कमेंट दिल्या आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#Cannes2019


A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on
दोघंही आहेत शूटमध्ये व्यग्र?


ऐश्वर्या साकारणार आहे खलनायकाची भूमिका


deepika


दिपिका आणि रणवीर हे दोघेही सध्या त्यांच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. दीपिका ‘छपाक’ च्या शुटींगमध्ये आहे तर रणवीर 83 या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. या शुटींगमधून वेळ काढत ते एकमेकांना नेहमीच वेळ देत असतात. त्यांचे अनेक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळेच त्यांचे चाहते त्यांच्यावर खूश असतात आणि नेहमीच त्यांच्या फोटोवर भरभरुन कमेंट करत असतात.


दीपिकाच्या प्रेग्नंसीच्या अफवा


कॉमेडीक्वीन भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा


#metgala नंतर दीपिका गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कारण तिने घातलेल्या गाऊनमध्ये तिचा बेबीबंप दिसत असल्याचे अनेकांनी म्हटले होते. पण तिचा ड्रेस टाईट असल्यामुळे आणि तिने दिलेल्या पोझमुळे तिचे पोट दिसत असल्याचे नंतर स्पष्ट झाले त्यामुळे प्रेग्नंसीच्या अफवा लगेचच थांबल्या. दीपिका-रणवीरच नाही तर या आधी प्रियांका चोप्राही गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण प्रियांकाच्या आईनेच या बातमीचे खंडन करुन ही तिच्या ड्रेसमुळे तुम्हाला तसे वाटले असेल असे म्हटले होते.


(फोटो सौजन्य- Instagram)