रणवीरने सहकलाकाराला केलं किस, आता वाटतेय दीपिकाची भीती

रणवीरने सहकलाकाराला केलं किस, आता वाटतेय दीपिकाची भीती

रणवीर सिंह हा अगदी चाहत्यांपासून सहकलाकारांपर्यंत हवाहवासा वाटणारा अभिनेता आहे. तो जिथे असेल तिथे उत्साह आणि मनोरंजन निर्माण करतो. त्याचं दिसणं, बोलणं आणि वागणं असं सर्व काही मजेशीर असतं. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे त्याचे चाहत्यांच मनोरंजन होत आहे. रणवीर सध्या त्याच्या आगामी चित्रपट '83' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. '83' च्या टीमसोबत असताना त्याने मौजमस्ती करत जतिन या सहकलाकारासोबत लिपलॉक केलं आहे.  ज्यावर इतर सहकलाकारांनी गोंधळ सुरू केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यामुळे आता रणवीरला दीपिकाची भीती वाटत आहे. 

नेमकं काय झालं या व्हिडिओ दरम्यान...

चित्रपटाच्या निर्मिती आणि प्रमोशनसाठी नेहमीच कलाकारांना त्यांच्या टीमसोबत तासनतास घालवावे लागतात. सहाजिकच अशा वेळी थोडीफार मौजमजा केलीच जाते. रणविर सिंह तर मौजमस्ती करण्यात अगदी तरबेज आहे. त्यामुळे रणवीर सिंह त्याच्या आगामी चित्रपट '83' मधील टीमसोबत अशीच मस्ती करत होता. मस्ती करता करता तो आणि त्याचा सहकलाकार जतिन एकमेकांना लिपलॉक केल्याची अॅक्टिंग करू लागले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला गेला. ज्यावेळी त्याला अचानक त्याला आठवलं की आपली बायको दीपिकादेखील हा व्हिडिओ पाहाणार. ज्यामुळ त्याने या व्हिडिओत असं म्हटलं आहे की, "तुझी वहिनी हे लाईव्ह पाहील तर म्हणेल काय सुरू आहे "

टीम ‘83’ मध्ये आहेत हे कलाकार

83 चित्रपट कबीर खान दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटातील 1983 सालचे दिग्गज क्रिकेटपटू साकारण्यासाठी अनेक हिंदी आणि मराठी अभिनेत्यांची टीम त्यांनी तयार केली आहे. रणवीर सिंग कपिल देव, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर तर कृष्णामाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. सैयद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर तर पंकज त्रिपाठी ‘मानसिग’ यांची भूमिका साकारणार आहे.सुनिल गावस्कर यांचा रोल ताहिर भसीन साकारणार आहे. विशेष म्हणजे संदीप पाटील यांची भूमिका यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग पाटील साकारणार आहे. शिवाय कपिल देव यांची मुलगी आमिया देव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन करणार आहे. ती पहिल्यांच या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरूवात करत आहे. या टीममध्ये चिराग पाटील आणि आदिनाथ कोठारे या दोन मराठी कलाकारांची वर्णी लागल्याने त्यांचे चाहते फारच खूश झाले आहेत. थोडक्यात या चित्रपटातून अनेकजण आपलं नशिब आजमावणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. 83 चित्रपट 10 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार आहे.

फोटोसौजन्य - इन्साग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

अभिनेता कार्तिक आर्यनने केलं '8' किलो वजन कमी

वर्षात ‘विरूष्का’ची कमाई होते इतकी, ऐकाल तर व्हाल अवाक

लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार