काजोलच्या गाण्यावर डान्स करणारा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

काजोलच्या गाण्यावर डान्स करणारा रणवीरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

‘मेरे ख्वॉबो मे जो आएँ… आ के मुझे छेड जाए’ काजोलचे हे गाणं आजही इतकं एव्हरग्रीन आहे की, या गाण्यावर कोणाला डान्स करावासा वाटणार नाही असे अजिबात होणार नाही. म्हणूनच की काय रणवीरलाही काजोलच्या या गाण्यावर तसाच शॉवर डान्स करायचा मोह आवरला नाही. त्याने चक्क बाथरुममध्ये या गाण्यावर डान्स केला आणि हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. त्याच्या या अदा पाहत रणवीरच्या चाहत्यांनी सांगा पाहू काजोल की रणवीर.. कोणी DDLJ च्या गाण्यावर डान्स चांगला केला ? असा प्रश्न विचारला आहे.

सई आणि नीना कुळकर्णी दिसणार मायलेकीच्या भूमिकेत

आता होतोय व्हिडिओ व्हायरल?

रणवीर सिंह नेहमीच वेगळं काहीतरी करत असतो. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन मिनिटं आम्हालाही त्याच्या या अदा पाहत काजोल की तो असा प्रश्न निर्माण झाला खरा… पण रणवीरचा हा व्हिडिओ काही नवा नाही.  रणवीरने 2016 साली हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. शॉवरखाली आंघोळ करत असताना त्याने या गाण्यावर लिपसिंक केले होते. हातात शॉवर घेऊन आणि हातात टॉवेल घेऊन तो काजोलप्रमाणेच नाचत होता. पण या व्हिडिओच्या शेवटी तो आदित्य चोप्राचे नाव घेऊन ट्रेलर लवकर रिलीज करा असे देखील सांगतो. आदित्य चोप्रासोबत त्याचे अपकमिंग प्रोजेक्ट असले तरी देखील ही गोष्ट ‘बेफिक्रे’ चित्रपटादरम्यानचा आहे.

सलमान खानच्या वाढदिवशी अर्पिता देणार त्याला हे गिफ्ट

इतक्या वर्षानंतर व्हिडिओ का होतोय व्हायरल

तब्बल 3 वर्षानंतर हा व्हिडिओ व्हायरल का होतोय? असा प्रश्न आम्हालाही पडला. रणवीरने हा व्हिडिओ रिपोस्ट केलेला नाही किंवा DDLJ या चित्रपटाची अॅनिव्हर्सरी वगैरे असाही काही संबंध नाही. खूप शोध घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, हा सगळा फॅन्सचा खेळ आहे. रणवीरच्या फॅन्सनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल करायला सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर रणवीर की काजोल असे प्रस्नही लोकांना विचारले आहेत. त्यामुळे पर्यायाने हे गाणंही आता लोकांना पुन्हा पाहिलं आहे. एकूणच हा सगळा फॅन्सचा खेळ असून रणवीरचा याच्याशी काही संबंध नाही. पण हा व्हिडिओ पाहून रणवीर तू किती क्युट आहे असं प्रत्येकाला नक्कीच वाटेल. 

कपिलदेवची भूमिका साकारणार रणवीर

Instagram

रणवीरने आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका केल्या आहेत. ऐतिहासिक पात्र निभावली आहेत. बाजीराव पेशवा, अल्लाऊद्दीन खिल्जी या दोन वेगळ्या भूमिका साकारताना त्याला लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले. आता तो 83 या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे.1983 साली देशाला क्रिकेटमध्ये मिळालेल्या वर्ल्डकपवर आधारीत हा चित्रपट असून या चित्रपटात रणवीरने कपिल देवची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठीही त्याने विशेष मेहनत घतल्याचे त्याच्या पोस्टवरुन दिसले आहे. शिवाय त्याने या चित्रपटातील त्याचा लुकही या आधी शेअर केला आहे. त्यामुळे आता रणवीरच्या चाहत्यांना त्याला पुन्हा एकदा स्क्रिनवर पाहण्याची इच्छा आहे. 


आता राहिला प्रश्न रणवीरच्या काजोल अवतारातील व्हिडिओचा तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहा. कारण तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.