ऐन उन्हाळ्यात रणवीरला भरली थंडी, घातले लाल जॅकेट

ऐन उन्हाळ्यात रणवीरला भरली थंडी, घातले लाल जॅकेट

Gully boy रणवीर जे करतो त्याची चर्चा नेहमीच होते. त्याच्या अभिनयाची तारीफ करु  तितकी कमी आहे. पण त्याचे कपडे पाहिले की अनेकांना त्याला काय प्रतिक्रिया द्यावी असे होऊन जाते. पण तरीही तो आवडत असल्यामुळे अनेकांना रणवीरची स्टाईलही आवडू लागली आहे. कधी चटरपटर जॅकेट, कधी रंगीबेरंगी ट्कसीडो आणि बरेच काही प्रयोग रणवीर सिंह नेहमीच करत असतो. सध्या zeecineawards चे रिहर्सल सुरु आहेत. यावेळी रणवीर सिंहने फरचे लाल रंगाचे जॅकेट घातले होते. इतकेच नाही तर त्याने यावेळी हेअरस्टाईलही युनिकच ठेवली होती. पण त्याचा हा लुकही त्याच्या फॅन्सना चांगलाच आवडला आहे. काऱण त्याच्या फॅन्सनी त्याच्या या लुकचीही तारीफही केली आहे.


सलमानसोबत ही तरुण अभिनेत्री करणार 'इंशाअल्लाह'


Zeecineawards चा सराव जोरदार


तर तुम्हाला आता कळालेच असेल की. Zeecineaward ची तयारी सुरु आहे. Gullyboy च्या रिलीजपूर्वीही रणवीरने त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रॅपरचा गेटअप  पूर्णवेळ कॅरी केला होता. आता पुन्हा त्याच रॅपर लुकमध्ये तो सरावही करत होता.त्यावेळी त्याने हे लाल रंगाचं जाडजुड जॅकेट घातले. लाल जॅकेटसोबत त्याने केसांचा पोनीटेल घातला होता. त्यावर काळा गॉगल घातला होता. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने साईड स्ट्रॅप पँट्स आणि कलरफुल फ्लोरल जॅकेट घातले होते. आता तो या फोटोनुसार gully boy आणि simba या चित्रपटातील गाण्यावर परफॉर्म करणार आहे.,असेच वाटते आणि त्याचीच जोरदार तयारी सध्या रणवीर करत आहे. रणवीरसोबत अनेक सेलिब्रिटी या अवॉर्ड सेरेमनीसाठी येणार आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#ranveersingh at #zeecineawards rehearsals


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
जुही परमारने केला तिच्या मुलीसोबत डान्स


रणवीरचा फॅशन फंडाच वेगळा


रणवीरची फॅशन ही नेहमीच वेगळी असते. रणवीरचे इन्स्टा अकाऊंट पाहिले तर तुम्हाला त्याच्या अकाऊंटमध्ये  असेच काही फोटो दिसतील. रणवीरला कलरफुल कपड्यांची आवड आहे. शिवाय त्याला चमकदार कपडेही खूप आवडतात. म्हणून त्याच्या सोशल मीडिया वॉलवर कायमच असे फोटो असतात. पण रणवीर ते कपडे उत्तम कॅरी करतो. या सगळ्या फोटोमध्ये त्याला चिता प्रिंट, लाल. पिवळा, हिरवा, सिल्व्हर, गोल्डन, वेगवेगळ्या प्रिंटचे कलेक्शनचे कपडे घालताना पाहिले आहे.


ranveer in silver


आणि म्हणून जया बच्चन फोटोग्राफर्सवर भडकतात


दीपिका मात्र कम्फर्टेबल


रणवीरच्या फॅशनबद्दल कोणी कितीही काही बोलले तरी त्याची बायको दीपिका मात्र त्याच्या फॅशनसेन्सवर कधीच काही बोलत नाही. म्हणूनच कदाचित तो त्याला आवडणारे कपडे बिनधास्त घालतो. त्याच्या लग्नातही तो  आता काय कपडे घालतो याची उत्सुकता होती. पण लग्नातील त्याच्या कपडयाने सगळ्यांचीच मने जिंकली. त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये ही जोडी पिक्चर परफेक्ट दिसली. त्यांच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक क्षण पापाराझींनी इतके सुंदर क्लिक केले की सोशल मीडियावर त्यांच्या फोटोने धुमाकूळ घातला. सेलिब्रिटी लग्नसोहळ्यापैकी रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली.


ranveer in yellow


रणवीर दिसणार या चित्रपटात


सिंबा आणि Gully boyच्या यशानंतर आता रणवीर कोणत्या चित्रपटात दिसेल अशी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर रणवीरच्या फॅन्सना सांगायला आवडेल की, रणवीर धर्मा प्रोडक्शनच्या ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय  १९८३ च्या वर्ल्ड कपवर आधारीत ‘83’ आणि ‘धूम ४’ या चित्रपटातही तो दिसणार आहे.


ranveer deepika