‘सिम्बा’चं अमृताला ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर सरप्राईज

‘सिम्बा’चं अमृताला ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर सरप्राईज

आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या कलाकारांचे अगदी मनापासून चाहते असतो आणि याबाबतीत कोणतेही सुपरस्टारदेखील कमी नसतात. तेदेखील कोणला तरी मनापासून फॉलो करत असतात. अशीच आपली मराठी तारका अमृता खानविलकर. तिचं रणवीर सिंहवरचं प्रेम तर संपूर्ण जगाला माहीत आहे आणि रणवीर सिंहलादेखील याची कल्पना आहे. रणवीर नेहमीच तिला सरप्राईज देत असतो. याआधीही तिच्या वाढदिवसाला स्वतःच्या लग्नातील विधीतून वेळ काढून रणवीरने मेसेज केला होता. यावेळी तर त्याने अमृताला आश्चर्याचा धक्काच दिला. आतापर्यंत सोनी मराठीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर अनेक कलाकारांनी स्पर्धकांचे सुपर परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी हजेरी लावली आहे.‘आला रे आला सिंबा आला’ असा आवाज घुमत ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर सिम्बाने सरप्राईज एन्ट्री करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले.


ranveer and amruta
अमृताला रणवीरने दिला आश्चर्याचा धक्का


नेहमीच उत्साही असणारा संग्राम भालेराव उर्फ रणवीर सिंह याने कळत-नकळतपणे ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या सेटवर जाऊन सर्वांना सरप्राईज करण्याचे ठरविले होते आणि तो सेटवर येणार याचा त्याने कोणाला थांगपत्ताही लागू दिला नव्हता.  आपण ज्या ठिकाणी शूट करतोय, त्याच ठिकाणी ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे ही शूट चालू आहे असे जेव्हा त्याला कळले तेव्हा त्याने लगेच ‘सरप्राईज एन्ट्री’चा प्लॅन तयार केला. अचानकपणे, कसलीही पूर्व कल्पना न देता रणवीर सिंह थेट समोर उपस्थित राहणे यासारखे सुंदर सरप्राईज अमृतासाठी कोणतेही नसेल. अमृताशी गप्पा-गोष्टी रंगल्या नंतर, आपल्या सुपर स्पर्धकांच्या उत्साहाला दाद देत रणवीरने त्यांच्यासोबत सेल्फी-फोटो काढले.


simmba amruta
अमृताने व्यक्त केली भावना


अमृताने आपला रणवीरबरोबरचा फोटो शेअर करत ही भावना व्यक्त केली. रणवीरसारखा माणूस असूच शकत नाही असंही अमृताने म्हटलं आहे. रणवीर आज जो काही तो केवळ त्याच्या अशा चांगल्या वागण्यामुळेच वेगळा ठरतो असंही अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. रणवीर काही मिनिटांसाठी सेटवर येऊन सर्वांनाच आनंद देऊन गेला आणि तेही फक्त अमृताला सरप्राईज देण्यासाठी. या फोटोमध्ये अमृताच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहताना दिसत आहे.