सहानुभूती मिळवण्यासाठी रश्मी 'वूमन कार्ड' खेळत असल्याचा अरहान खानचा आरोप

सहानुभूती मिळवण्यासाठी रश्मी 'वूमन कार्ड' खेळत असल्याचा अरहान खानचा आरोप

अरहान खान आणि रश्मी देसाई या दोघांचेही एकमेकांवरी आरोप प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच अरहान खानने आपल्या अकाऊंटमधून 15 लाख काढल्याचा आरोप आपले बँकेचे स्टेटमेंट जाहीर करत रश्मी देसाईने केला होता. आता यावर अरहान खानने रश्मी देसाई ही लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी ‘वूमन कार्ड’ खेळत असल्याचे म्हटले आहे. ‘बिग बॉस’ नंतर या दोन्ही कलाकारांंच्या आयुष्यात एक तुफानचं आलंय असं म्हणायला हरकत नाही. अगदी बिग बॉस चालू असल्यापासून त्यांच्या या आरोप प्रत्यारोपाला झालेली सुरूवात अजूनही थांबत नाहीये तर यामध्ये आता अधिकच कटूता आलेली दिसून येते आहे. या शो मधून बाहेर आल्यानंतर दोघेही वेगळे झाले असले तरीही सोशल मीडियाद्वारे या दोघांचे एकमेकांवर आरोप लावणे चालूच आहे.  मात्र रश्मी देसाईचे अधिक  चाहते असल्याने ती त्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप आता अरहान खानने केला आहे. 

रश्मी देसाईच्या खात्यातून अरहान खानने घेतले 15 लाख, चाहत्याने केली पोलखोल

अरहानने मुलाखतीमध्ये केले स्पष्ट

काही दिवसांपूर्वीच रश्मीने आपले बँकेचे स्टेटमेंटही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर आता अरहानने आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘रश्मी सर्वांची सहानुभूती मिळविण्यासाठी वूमन कार्ड खेळत आहे. तिने बिग बॉसमध्येही हेच केलं होतं. तिने कधीही मला कोणताही फोन गिफ्ट म्हणून दिलेला नाही. तर माझा फोन अनलॉक करण्यासाठीही तिने थंबप्रिंट माझ्यावर फोनवर लावलेले आहेत.  कारण ती नेहमीच असुरक्षित होती. तिच्या भूतकाळामुळे ती नात्यामध्ये असुरक्षित  होती, तिच्या संशयी आणि पझेसिव्ह स्वभावामुळे तिनेच माझ्या फोनवर स्वतःचे थंबप्रिंट लावले होते जेणेकरून ती कधीही माझा फोन पाहू शकेल. यामुळे मला कधीच काही प्रॉब्लेम नव्हता.’

याशिवाय पुढे अरहानने सांगितले की, ‘ती बँकेचा मुद्दा सर्वांसमोर घेऊन आली. तिने माझ्यावर आरोप लावला आहे की, मी तिच्या खात्यातून 15 लाख रूपये  काढले आहेत. पण तुम्हीच विचार करा की, जोपर्यंत ती सही करत नाही तोपर्यंत मी तिच्या खात्यातून पैसे काढू कसे शकतो. बाकी तिच्या खात्यातून जे 8 लाख रूपये काढण्यात आले होते त्याची कल्पना तिच्या सीएला देखील आहे. त्याचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत. त्यामुळे ती जे काही आरोप लावत आहे ते सर्व खोटे आहेत. स्वतःला सतिसावित्री दाखवण्यासाठी माझी इमेज खराब करत आहे. लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठीच ती हे वूमन कार्ड खेळत आहे आणि तिने बिग बॉसमध्येही हेच केले होते.’

अभिनेत्री रश्मी देसाईला होता ‘हा’ गंभीर आजार, म्हणून वाढत होतं वजन

 

चाहत्यांमध्येही दरी

यामुळे मात्र रश्मी आणि अरहनाच्या चाहत्यांमध्येही दरी झाली आहे. सोशल मीडियावर रश्मी देसाईला अनेक जण पाठिंबा देत असून अरहानला मात्र शिव्या घातल्या जात आहेत. पण यामध्ये नक्की खरं कोण आणि खोटं हे रश्मी आणि अरहान या दोघांनाच माहीत. मात्र त्यामुळे या दोघांचंही आयुष्य अगदीच चव्हाट्यावर आलं  आहे हे नक्की. आता अरहानच्या या प्रत्यारोपानंतर रश्मी देसाई काय उत्तर देणार याकडेही तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण नक्की खरं काय हेदेखील सर्वांना जाणून घेण्याची तितकीच उत्सुकता लागून राहिली आहे. आता नक्की या दोघांपैकी कोण खरं बोलत आहे हे या दोघांनाच माहीत. 

#BiggBoss13 : रश्मी देसाई सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉस कंटेस्टंट