Nach baliye 9 च्या सेटवर मनीष पॉलमुळे रवीना झाली नाराज

Nach baliye 9 च्या सेटवर मनीष पॉलमुळे रवीना झाली नाराज

सध्या टीव्हीवरील Nach baliye हा रिअॅलिटी शो दिवसेंदिवस मजेदार होत चालला आहे. पण या सेटवर निवदेक मनीष पॉलच्या वागण्यामुळे रवीना टंडन चक्क सेट सोडून गेली. त्यानंतर तब्बल तासभर तरी या शोचे शुटींग रखडल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष पॉलमुळेच रवीना नाराज झाल्याचे कळत असून खोळंबलेले शुटींग पुन्हा सुरु करण्यासाठी क्रू मेंबरला मात्र दोघांनी मनधरणी करावी लागली.

#BBM2 कंटेस्टंट आरोह वेलणकरची सामाजिक बांधिलकी

नेमकं झालं काय?

Instagram

Nach baliye 9 चे शुटींग सुरु होते. मनीष पॉल हा या कार्यक्रमाचा निवेदक असून तो या शोसाठी तयारी करत होता. तो कानाला इअर पीस लावत असताना त्याला त्या इयरपीसवर काही सुचना ऐकू आली. म्हणून त्याने त्या सूचनेला अनुसरुन काहीतरी तोंड केले. असे करताना रवीना टंडन समोर होती. रवीना टंडनला वाटले की, तिला पाहून मनीषने असे तोंड केले आणि ती तिच्या वॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेली. 

समजवण्यात गेला तासभर

मनीष पॉलही त्यानंतर त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेला. त्त्यादोघांच्या पाठी त्यांचा क्रू व्हॅनिटीमध्ये निघून गेला.  दोघांना सेटवर बोलावण्यात आणि त्यांची समजूत काढण्यात जवळपास तासभर गेल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांची मनधरणी केल्यानंतर तासाभरात शुटींग सुरु झाले. एकूणच गैरसमजामुळे या गोष्टी झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मनीष पॉलची मस्ती पाहता त्याच्याकडून असे झाले असावे असे वाटत नाही. पण तरीसुद्धा त्याचे एक वागणे त्या संपूर्ण दिवसासाठी त्रासदायक ठरले.

उर्वशी ढोलकियासोबतही झाला वाद

आता रवीना- मनीषा यांचा वाद ताजा असतानाच आता येणाऱ्या एपिसोडमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून आलेल्या उर्वशी ढोलकियासोबतही रवीनाचे चांगलेच वाजले. चुकीच्या निकालावरुन उर्वशीने आपले मत मांडले होते. त्यावरुन रवीनाने तिची कानउघडणी केली. पण उर्वशीने आपला मुद्दा अगदी ठामपणे मांडला यामध्ये जज अहमद खानही काही करु शकला नाही. झाले असे की, रवीनाने सगळ्यांसमोर या शोबद्दल बाहेर जाऊन वाईट बोलण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. तुमचा परफॉर्मन्स सगळे काही बोलतो तुम्हाला इथे ते दाखव्याची संधी दिली आहे असे रवीना म्हणताच. उर्वशीने इथे कोणाला बोलण्याचा अधिकार आहे का ? असा खोचक सवाल केला.  त्यानंतर काहीवेळ वातावरण तंग होते. पण उर्वशीला या सीझनची विनर व्हायचे आहे हे मात्र यामुळे अगदी नक्की झाले.

आणि भावुक झालेल्या विराटला अनुष्काने सावरले

सलमानचा शो

Nach baliye चे आतापर्यंत 8 सीझन आले असून सध्या त्याचा 9 वा सीझन सुरु असून हा शो सलमान खान प्रोड्यूस करत आहे. या शोची पॉप्युलॅरिटी चांगली आहे.अनेक सेलिब्रिटी कपल्सनी आतापर्यंत या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. अनेक उत्तम सादरीकरण या शोमध्ये करण्यात आलेले आहे.

रवीना पहिल्यांदाच जज

Instagram

Nach baliye च्या प्रत्येक सीझनमध्ये जज हे वेगवेगळे असतात. यंदाच्या या सीझनमध्ये रवीना टंडन ही पहिल्यांदाच जज असून तिला अनेकांची पसंती मिळत आहे. पण आता या शो ला काहीतरी फोडणी म्हणून असे काही प्रकार सेटवर घडत आहे. त्यामुळेच आता शो हिट करणारा हा स्टंट तर नाही ना हे मात्र अजून कळलेले नाही. 

पुन्हा एकदा ‘ड्रीमगर्ल’ची जादू, पण वेगळ्या स्वरूपात


आता या नव्या वादळानंतर मनीष आणि रवीना यांचे एकमेकांशी वागणे कसे असेल ते पाहायला हवे.