Good News: रवीना टंडनच्या घरी आला छोटा पाहुणा, रवीनाने दिली गोड बातमी

Good News: रवीना टंडनच्या घरी आला छोटा पाहुणा, रवीनाने दिली गोड बातमी

रवीना टंडनला बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख करून द्यायची अजिबातच गरज नाही. रवीना सध्या खूपच आनंदात आहे. केवळ 44 व्या वर्षी रवीनाकडे एक good news आली आहे. थांंबा थांबा जरा...असा तसा विचार करू नका. आनंदाची बातमी तर आहे पण ती म्हणजे रवीनाची दत्तक मुलगी छायाला मुलगा झाला आहे. रवीना आजी झाली आहे. ही गोड बातमी रवीनाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. रवीनाने काही दिवसांपूर्वीच छायाच्या ‘बेबी शॉवर’चे फोटोही पोस्ट केले होते. आता छायाने एका गोंडस लहान बाळाला जन्म दिला असून आई आणि बाळ दोघांंचीही तब्बेत ठीक आहे. या दोघांचंही घरात जंगी स्वागत करण्यात आल्याचे फोटो रवीनाने पोस्ट केले आहेत. 

बाळाचं केलं जंगी स्वागत

रवीनाची मुलगी छाया हिने गोंडळ बाळाला जन्म दिला आहे. आपल्या घरी नातू आल्याची ही आनंदाची बातमी स्वतः रवीनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये छोट्या बाळाचं स्वागत करायला सर्वच जण दाराजवळ उभे असून उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. हा आनंद व्यक्त करताना रवीनाने आरती करत असतानाचेही फोटो पोस्ट केले आहेत आणि फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये देवाचे  आभारही मानले आहेत. रवीनाने लिहिलं आहे, ‘देवा तुझी कृपा. बाळ घरी आलं आहे.’

Nach baliye 9 च्या सेटवर मनीष पॉलमुळे रवीना झाली नाराज

छाया रवीनाची दत्तक मुलगी

Instagram

रवीनाने बॉलीवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 16 व्या वर्षीच केली. इतकंच नाही तिने अगदी लहान वयातच छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं आणि त्यांची व्यवस्थित जबाबदारी सांभाळली. छाया आणि पूजा त्यावेळी 11 आणि 8 वर्षांच्या होत्या. छायाच्या लग्नापासून ते अगदी बेबी शॉवरपर्यंत सर्व जबाबदारी रवीनाने व्यवस्थित सांभाळली आहे. दोघींनाही रवीनाने चांगलं शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं केलं. रवीनाने 2004 मध्ये उद्योगपती अनिल थडानी बरोबर लग्न केलं. त्यानंतर तिची दोन्ही मुलं रणबीर आणि राशा यांच्याप्रमाणेच तिचं छाया आणि पूजावरही तितकंच प्रेम आहे. 

लॉरेनच्या Topless फोटोशूटची सगळीकडे होतेय चर्चा

काही दिवसांपूर्वीच झाला होता ‘बेबी शॉवर’

रवीनाने काही दिवसांपूर्वीच आपली दत्तक मुलगी छायाच्या बेबी शॉवरचे फोटोही आनंदाने शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने आपल्या चारही मुलांचा फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये छाया, पूजा, राशा आणि रणबीर असे चौघेही आहेत. हा फोटो शेअर करताना तिने म्हटलं होतं, ‘मी आणि माझी मुलं. माझ्या मुलीचं बाळ...आता उलटे अंक मोजायला सुरुवात झाली आहे...' रवीना मोठ्या आतुरतेने बाळाची वाट पाहत होती. आता रवीना आजी झाली असून अतिशय आनंदी आहे. शिवाय रवीना सध्या छोट्या पडद्यावर ‘नच बलिये 9’ या कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणूनही काम पाहात आहे. रवीना मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही बऱ्याचदा ती लहान पडद्यावर कोणत्या ना कोणत्या तरी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तसंच सोशल मीडियावरही रवीना बरीच अॅक्टिव्ह असून आपल्या आयुष्यातील घडामोडींबद्दल आपल्या चाहत्यांना रवीना नेहमीच माहिती देत असते. आता लवकरच तिच्या नातवाचा फोटो पाहायला मिळेल का? याची उत्सुकता नक्कीच तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. 

भारती सिंह लवकरच देणार Good News, आई होण्याची आहे इच्छा

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.