साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला असा एक दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya). मंगल कार्यांसाठी अत्यंत पवित्र असा हा दिवस मानला जातो. या दिवशी अगदी काहीही करायचे असेल तर मुहूर्त काढावा लागत नाही. संपूर्ण दिवस तुम्ही कोणतेही मंगल कार्य अगदी आरामात पार पाडू शकता. एखादी नवीन वस्तू या दिवशी घरी आणायची असेल तर हा दिवस शुभ मानला जातो. पण या दिवशी सोन्याची खरेदी फार मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रत्येक जण अगदी थोडे का होईना सोने खेरदी करतोच. म्हणूनच या दिवशी सोन्याचा कितीही भाव असला तरी लोकं सोनं खरेदी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण या दिवशी सोन्याची खरेदी का केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊया या दिवशी सोन्याची खरेदी नेमकी का केली जाते ते
जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचा पूजाविधी आणि पौराणिक कथा
मुहूर्त आणि योग
यंदा अक्षय्य तृतीया ही 14 मे, शुक्रवारी आली आहे. हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. पहाटे 5 वाजून 38 मिनिटांनी ही शुभ वेळ सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 मे रोजी सकाळी वाजून 59 पर्यंत हा मुहूर्त असणार आहे. याकाळात तुम्ही कोणतेही शुभकार्य करु शकता.
या कारणासाठी करतात सोने खरेदी
सोने हे भारतीयांसाठी फारच पवित्र आणि महागडे असे धातू रुप आहे. या पासून दागिने घडवले जातात. अगदी कोणत्याही शुभ प्रसंगी गळ्यात सोने घालण्याची पद्धत आहे.इतकेच नाही. महिला- पुरुष दोघांसाठीही ही इतर कोणत्याही भेटवस्तूच्या तुलनेत अत्यंत महाग अशी ही भेटवस्तू आहे. पण सोनं खरेदी नेमकी या दिवशीच का करतात असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल जाणून घेऊया त्यामागील कारणं
- असं म्हणतात की, या दिवशी सोनं खरेदी केलं म्हणजे त्या रुपाने लक्ष्मीचे घरात आगमन केले जाते. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते.
- सोन्याची खरेदी केल्यामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे घर आनंदी राहते.
- सोन्याची खरेदी केल्यामुळे घरात आर्थिक चणचण कधीही भासत नाही.
- सोन्याची खरेदी केल्यामुळे लक्ष्मीत वाढ होते अशी धारणा आहे. असे केल्यामुळे तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ होते.
अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश (Akshaya Tritiya Wishes In Marathi)
यामागे सांगितली जाते एक आख्यायिका
या आधी आपण अक्षय्य तृतीया माहिती आणि पौराणिक कथा जाणून घेतली आहे. पण या व्यतिरिक्त देखील एक कथा सांगितली जाते.
पौराणिक दाखल्यानुसार, असे म्हणतात की या दिवशी भगवान श्री कृष्णाचा बालमित्र सुदामा याने कृष्णाकडे आर्थिक मदतीची मागणी केली. त्यावेळी श्रीकृष्णासाठी भेट म्हणून सुदामा पोहे घेऊन गेला. कृष्णाला पोहे देताना सुदाम्याला फारच संकोच वाटला. कृष्णानेही लगेच ते पोहे घेतले आणि खाल्ले व सुदाम्याचा सत्कारही केला. तो पाहुणचार पाहून सुदामा धन्य झाला.आर्थिक मदतीविषयी काहीही न बोलता तो तिथून निघून गेला. पण घरी आल्यावर त्याने जे पाहिले त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. त्याच्या झोपडीचा राजमहाल झाला होता. तर त्याची मुलं ही छान कपडयांमध्ये होती. ही अन्य कोणाची नाही तर भगवान श्रीकृष्णाची कृपा होती. त्यामुळेच या दिवशी सोने खरेदी करत सुख- समृद्धी घरात आणली जाते .
आता या अक्षय्य तृतीयेला करा सोन्याची खरेदी आणि घरी आणा सुख- समृद्धी
अक्षय्य तृतीयेची माहिती आणि महत्त्व (Akshaya Tritiya Information In Marathi)
Akshaya Tritiya Quotes in English