म्हणून एकता कपूर करत नाही तिच्या मुलाचे फोटो शेअर…

म्हणून एकता कपूर करत नाही तिच्या मुलाचे फोटो शेअर…

एकता कपूर हे नाव टीव्ही आणि बॉलीवूड इंडस्ट्रीला नवीन नाही. गेली दोन दशकं एकताने इंडस्ट्रीवर राज्य केलं असून टीव्ही क्वीन म्हणून एकताची ओळख आहे. काही महिन्यांपूर्वीच सरोगसीच्या मदतीने एकताला मुलगा झाला असून तिने त्याचं नाव ‘रवी’ ठेवलं आहे. एकताचा भाऊ तुषार कपूरने सर्वात पहिले सरोगसीद्वारे त्याचा मुलगा लक्ष्य याला जन्म दिला आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकत एकताने बाळाला जन्म दिला. पण त्यापूर्वी तिने स्वतः बाळाला जन्म देण्यासाठीही प्रयत्न केले होते असंही सांगण्यात आलं. पण तरीही एकताला काही कारणामुळे बाळ न झाल्यामुळे तिला सरोगसीचा आधार घ्यावा लागला. अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असले तरीही एकताने मात्र आपल्या बाळाचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही. याचं कारण तिचा भाऊ तुषारने आता स्पष्ट केलं आहे.


एकता का नाही शेअर करत फोटो?
 

 

 


View this post on Instagram


 

 

First Mother’s Day as a mother naaaaah that was three years ago! #motheroftwo


A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on
तुषारने एकता कपूर का फोटो शेअर करत नाही याचं कारण आता स्पष्ट केलं असून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करायचे की नाही याची चर्चा घरात झाली होती असं सांगितलं. पण चर्चेअंती फोटो शेअर करायचे नाहीत असं ठरलं. लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर पटकन व्हायरल होतात त्यामुळे आमच्या घरातून या गोष्टीला कायमच नकार देण्यात आला आहे आणि जन्मलेल्या बाळाचे फोटो शेअर करू नये असा समज असल्यामुळे एकतानेही रवीचे फोटो शेअर केले नाहीत. बाळ थोडं मोठं झाल्यानंतर स्वतः एकताच त्याचे फोटो शेअर करेल असंही तुषारने सांगितलं आहे. लक्ष्य मोठा झाल्यानंतरच त्याचेही फोटो शेअर करण्यात आल्याचंही तो म्हणाला. त्यामुळे एकताही आपल्या बाळाचे फोटो इतक्यात शेअर करणार नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे एकताच्या चाहत्यांना तिच्या बाळाला बघण्यासाठी आता वाट पाहावी लागणार हे निश्चित.


लक्ष्यचेही फोटो झाले नव्हते व्हायरल


तुषार कपूरने तीन वर्षांपूर्वी सरोगसीद्वारे लक्ष्यला जन्म दिला आणि तेव्हापासून तो त्याला सिंगल पॅरेंट म्हणून वाढवत आहे. एकता आणि तुषार लक्ष्यचे नेहमीच लाड करताना दिसतात. पण लक्ष्यदेखील जन्माला आला तेव्हा त्याचे फोटो शेअर करण्यात आले नव्हते. लक्ष्य थोडा मोठा झाल्यानंतर त्याचे फोटो पोस्ट करण्यात आले. त्यामुळे एकताही तिच्या बाळाचे फोटो इतक्यात शेअर करण्याची चिन्हं नाहीत.


जानेवारी महिन्यात दिला बाळाला जन्म
 

 

 


View this post on Instagram


 

 

My boys ! Two sons !!! #mysunandmoon


A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on
जानेवारी महिन्यातच एकताच्या बाळाचा जन्म झाला असल्यामुळे एकता आपल्या बाळाबरोबर सध्या व्यस्त असते. इतकंच नाही तर तिने आपल्या बाळासाठी ऑफिसमध्ये क्रेचचा सेटअप तयार केला आहे. इतकंच नाही तर ऑफिसमधील इतर वर्किंग वुमनसाठीही तिने हे पाऊल उचललं आहे. यावेळी तिने ही गोष्ट करण्यासाठी जरा उशीरच झाल्याचंही सांगितलं होतं. पण बाळाला सांभाळून काम करता येतं हे एकता कपूर सध्या अनुभवत आहे. एकता अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सध्या व्यस्त आहे. पुन्हा एकदा निर्मिती केलेली ‘कसौटी जिंदगी के’ ही मालिका टीआरपीच्या खेळात पुढे असून लवकरच तिचा कंगना आणि राजकुमार राव अभिनित ‘मेंटल है क्या’ प्रदर्शित होत आहे.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


एकता कपूरने तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी घेतला हा निर्णय


जितेंद्रच्या एका अटीमुळे मालिका क्वीन एकता कपूरने केलं नाही लग्न


सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा