रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ, चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा

रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ, चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन अद्यापही पडदा उठत नाही. कुटुंबाने सुशांत आत्महत्या करु शकत नाही, असा दावा करत याची अधिक चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी केल्यानंतर आता बिहार पोलिस कामाला लागली आहे. या चौकशी दरम्यान अनेक मोठ्या गोष्टींचे खुलासे होऊ लागले आहेत. त्यामुळेच की, काय सुशांत सिंहची आत्महत्या हा रचलेला खून असू शकतो असा संशय आता त्याच्या फॅन्सनाही येऊ लागला आहे. दरम्यान, सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिचे नावही या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे येत आहे. त्यामुळे रियाच्या अडचणीत साहजिकच वाढ झाली आहे. या दोन-तीन दिवसाच्या काळात नेमक्या काय गोष्टी समोर आल्या आहेत ते जाणून घेऊया.

रीना च्या "इन्स्टा लाईव्ह" चा बोलबाला... चक्क भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलची हजेरी

रिया चक्रवर्तीवर का येत आहे नाव?

Instagram

सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या आत्महत्येवर संशय व्यक्त करत त्याची अधिक चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. पण रियाचा एक जुना व्हिडिओ वायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिचे बोलणे ऐकल्यानंतर या सगळ्यामध्ये रियानेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असावे असे बोलले जात आहे. त्यामुळे रियाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. सुशांतच्या शेवटच्या क्षणापर्यंत रिया त्याच्यासोबत होती. त्यामुळे तिला बऱ्याच गोष्टी माहीत असाव्यात, असेही सांगितले जात आहे. या व्यतिरिक्त सुशांतच्या वडिलांनी पैशांचा बाबतीत केलेला खुलासा अधिक धक्कादायक आहे. सुशांतच्या अकाऊंटमधून पैसे काढल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही रक्कम लहान नाही. त्यामुळे त्याची चौकशी ही व्हायला यामध्ये रिया चक्रवर्तीचा किती हात आहे हे देखील पाहायला हवे, अशी मागणी देखील कुटुंबियांनी केली आहे.

कुलदीप सिंगने 'या' कारणासाठी सोडली विघ्नहर्ता गणेश मालिका

आधीच दिली होती कल्पना

सुशांतचे वडील केके सिंह यांनी या आधीच 25 फेब्रुवारीला पोलिसांमध्ये तक्रार केली होती. त्यांनी सुशांतच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते. पण त्या गोष्टीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. आता सुशांतने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्यानंतरही मुंबई पोलीस गांभीर्याने तपास करत नसल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांकडून होत आहे. म्हणूनच सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केली आहे. आता बिहारवरुन पोलिसांची फळी तपासासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. पण सध्याच्या कोरोनाच्या काळात त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस

मुंबई पोलिसांनी या संदर्भात चौकशी योग्य पद्धतीने केली नसल्याचा आरोप बिहार पोलिसांनी केला आहे. पण मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 56 लोकांची चौकशी केली आहे. शिवाय सुशांतच्या बँक खात्याचीही चौकशीही करण्यात आली आहे. पोलिसांनी यामध्ये कोणालाही क्लीन चीट दिली नसल्याचे सांगितले आहे.सुशांतची गुगल हिस्ट्री शोधल्यानंतर त्याने बायपोलर डिसऑर्डर आणि शरीराला त्रास न होता मृत्यू असे काही शब्द शोधले होते.  पण बिहार पोलिसांनी मुंबई पोलिस त्यांना योग्य ती माहिती पुरवत नाहीत असा आरोपही केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस आमनेसामने आले आहेत. 


सुशांत आणि तिच्या बहिणीचा नवरा यामध्येही काही संभाषण झाले होते. यामध्येही रियाचा उल्लेख असल्याचे दिसत आहे. हा उल्लेख चांगल्या गोष्टीसाठी नाही तर सुशांत अडचणीत असल्याच्या संदर्भात आहे. या सगळ्याच गोष्टी रियाच्या विरोधात असल्यामुळे रियाच्या अडचणीत वाढ झाल्याचे समजत आहे. 

सुशांतच्या केसमध्ये नवे वळण, रियावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी