रेशम टिपणीस झळकणार या चित्रपटामध्ये

रेशम टिपणीस झळकणार या चित्रपटामध्ये

बिग बॉसच्या पहिल्या भागात एक नाव सतत चर्चेत होतं ते म्हणजे रेशम टिपणीस. तिच्या बोल्ड आणि बेधडक अंदाजामुळे तिने पहिल्या सिझनमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रेशमने तिच्या इंन्स्टा अकाउंटवरून या चित्रपटाचं नाव शेअर केलं आहे. हे नाव वाचून तुम्हाला एका गाजलेल्या हिंदी चित्रपटाची आठवण नक्कीच येईल. शिवाय या नावातील साधर्म्य आणि शब्दात बदल केल्यामुळे होणारा विनोद यामुळे हसायला देखील नक्कीच येईल. 

काय आहे भाऊबळीचं कथानक

रेशम टिपनिसच्या या  आगामी चित्रपटाचं नाव बाहुबळी  असं आहे. लोकप्रिय चित्रपट बाहुबली या नावाशी ते  मिळतं जुळतं आहे. ज्यामुळे रेशमच्या हा आगामी चित्रपट नक्कीच विनोदी असणार  हे समजत आहे. या चित्रपटाची कथा जयंत पवार यांच्या 'फिनिक्स राखेतून उठला मोर' या कथासंग्रहातील एका कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर पाटील करत असून या चित्रपटात रेशम नेमकी कोणती भूमिका साकारणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे. मात्र रेशमने तिच्या सोशल मीडियावरून चित्रपटाचं नाव जाहीर केल्यामुळे यात रेशम टिपनिसची एखादी महत्त्वाची भूमिका असण्याची शक्यता वाटत आहे. 

रेशमने एकेकाळी होती गाजवली मराठी चित्रपटसृष्टी

रेशम टिपणीसने तिच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजन मालिकांमधून केली. तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून काम केलं आहे. शिवाय अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधूनही आपण रेशमला पाहिलेलं आहे. गोड चेहरा आणि निरागस हास्य यामुळे रेशम नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहिली. अनेक चित्रपटांमधून तिने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत.  मात्र काही वर्षांपासून ती चित्रपट आणि टेलिव्हिजन माध्यमातून कमी दूर गेली आहे. तिने वयाच्या विसाव्या वर्षीच संजीव शेठ या अभिनेत्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर या क्षेत्रापासून दुरावलेली रेशम घटस्फोटानंतर पुन्हा हळूहळू या क्षेत्रात दिसू लागली.त्यानंतर रेशम पुन्हा एकदा चर्चेत आली ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये. या भागात तिचं आणि राजेश शृगांरपुरेचं जवळ येणं तिच्या चाहत्यांना मुळीत आवडलं नव्हतं. मात्र आता रेशम तिच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच  एक खुशखबर आहे. रेशमला पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.  

 

 

फोटोसौैजन्य - इन्साग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट

पार्थ समथान आणि हिना खान बनले 2019 चे टॉप टेलीव्हिजन स्टार्स

'अनन्या' आता झळकणार रुपेरी पडद्यावर, रवी जाधव करणार निर्मिती