रेवा- सत्याचा ब्रेकअप झाला?, #MovingOut चा सीझन २ आला

रेवा- सत्याचा ब्रेकअप झाला?, #MovingOut चा सीझन २ आला

वेबसीरिजच्या चाहत्यांसाठी खूशखबर!!!... मराठीतील  #MovingOut चा दुसरा सीझन सुरु झाला आहे. मंगळवारी या वेबसीरिजचा पहिला एपिसोड युट्युबवर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला आणि  हा हा म्हणता रेवा आणि सत्याचा चाहता वर्ग ऑनलाईन एपिसोड पाहण्यासाठी जमला. पण या पहिलाच एपिसोडने मोठा धक्का दिला आहे कारण एपिसोडची सुरुवातच रेवा आणि सत्याच्या ब्रेकअपने झाली आहे. रेवा-सत्याचा ब्रेकअप? अरे आता हे काय झाल?असेच तुम्हालाही वाटले असेल नाही का? पण हो रेवा आणि सत्याचा ब्रेकअप झाला आहे. आता हा ब्रेकअप का झाला ते पुन्हा एकत्र येणार का? यासाठी आपल्याला या वेबसीरिजच्या दुसऱ्या एपिसोडची वाट पाहावी लागणार आहे.


अजय- काजोलच्या निसावर पापाराझींचे बारीक लक्ष


रेवा- सत्याचा का झाला ब्रेकअप


पहिल्या भागात रेवा आणि सत्यामधील जवळीक प्रेमात बदलण्यात आलेली दाखवण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या भागात या दोघांचे लग्न होईल का? काय नेमकं होईल ? त्यांची लव्हस्टोरी कशी वाढत जाईल? असे अनेक प्रश्न पडले होते. पण दुसरा भाग सुरु झाला तोच रेवा आणि सत्याच्या ब्रेकअपने.  हा ब्रेकअपदेखील म्युच्युअल दाखवण्यात आला आहे. आणि दोघेही आपल्या आयुष्यात पुन्हा परतलेले दाखवण्यात आले आहे.आता अर्थातच हातात आलेला चांगला मुलगा रेवाने का सोडला? या प्रश्नाने आईला भांडाऊन सोडले आहे. दुसऱ्या सीझनचा आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे रेवाचे घर बदलण्यात आले आहे. पूर्वीच्या घरातील आपलेपणा या घरात नाही कारण आताचे घर हे अधिक लॅविश वाटत आहे. घर बदलल्यामुळे अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.पण या नव्या घरात नवे काय बदल होणार हे देखील आपल्याला पाहायचे आहे. पहिला भाग हा १० एपिसोडचा होता आता हा दुसरा सीझन किती एपिसोडचा असणार याविषयी अधिक माहिती नाही. पण  यात आणखी एक जोडप पाहायला मिळणार आहे. कारण या एपिसोड आधी आलेल्या टीझरमध्ये ऋषी सक्सेना (काहे दिया परदेस फेम) आणि गिरिजा ओक गोडबोले दिसत आहे. ही वेबसीरिज रिवर्ब कट्टाची ही प्रस्तुती असून या आधीदेखील त्यांची 'नाईट आऊट' नावाची वेब सीरिज आली होती.

Subscribe to POPxoTV

जय मल्हारमधील 'म्हाळसा' अडकली विवाहबंधनात


रिकॅप


#MovingOut चा पहिला सीझन जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला सांगायला आवडेल की,  एक अशी मुलगी जिच्या घरी इतर मुलींसारखीच लग्नाची घाई आहे. पण तिला आवडेल असा कोणताही मुलगा तिला मिळत नाही. रेवा( अभिज्ञा भावे) असे मुख्य पात्राचे नाव असून ती सध्याच्या प्रॅक्टिक युगात वावरणारी मुलगी आहे. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेच तिला अनेकांनी नाकारलेले असते. आई-वडिलांचा लग्नाच्या तगाद्याला कंटाळून ती एकटी राहण्याचा निर्णय घेते आणि घराबाहेर पडते. एकटी सगळं घर चालवते. या प्रवासात आलेल्या अडचणी, अनुभव आणि त्यातून सत्या (निखिल राजेशिर्के)वर फुलत जाणाे प्रेम असा हा पूर्ण सीझन होता. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पाहायला हवा.

Subscribe to POPxoTV

मराठीतील वेबसीरिज खास


सध्या वेबसीरिजचा जमाना आहे. प्रत्येक भाषांमध्ये आता वेबसीरिज येऊ लागल्या आहेत. त्यात मराठीही काही मागे नाही. स्त्रीलिंग-पुल्लिंग, पॅडेड अॅण्ड पुशअप, नाईट आऊट, बँग- बँग या शिवाय अनेक लहान मोठ्या सीरिज मराठीत आलेल्या आहेत आणि येऊ घातल्या आहेत. अनेक मराठी मालिकेतील कलाकार या वेब सीरिजमध्ये आहेत. त्यामुळे साहजिकच हा नवा प्रयोग लोकांनाही आवडत आहे.