11 वर्षांपूर्वी केलेल्या रियाने केलेल्या ट्विटवर नेटीझन्सची चर्चा

11 वर्षांपूर्वी केलेल्या रियाने केलेल्या ट्विटवर नेटीझन्सची चर्चा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक नवी वळण येत आहेत. या प्रकरणात ड्रग्जचा संबंध जोडला गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने याची चौकशी नार्कोटिक्स विभागाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्ती भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी रियाच्या मुसक्या आवळल्या आहेत. रियाला काल अटक झाल्यानंतर नेटीझन्समध्ये नुसता गोंधळ माजला आहे. अनेकांनी रियाच्या मुसक्या आवळल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तर काहींनी सुशांतच्या मृत्यूचा उलगडाही लवकर करण्याच्या मागण्या केल्या आहेत. दरम्यान, रियाचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सनी चांगलेच उचलून धरले आहे. या ट्विटवर चर्चा करत नेटीझन्सनी रियाला आधीच तिचे भविष्य कळले होते असा टोमणाही दिला आहे. जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय?

बधाई हो' मधील अभिनेत्री रुग्णालयात दाखल, ब्रेन स्ट्रोकचा त्रास

रिया तू पण निघाली अशीच

Instagram

रियाने 11 वर्षांपूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये एका अशा मुलीची कथा दोन वाक्यामध्ये सांगितली आहे. त्यात तिने लिहिले आहे की, ‘आताच एका भारतीय मुलीची अत्यंत भयानक कथा वाचली. ड्रग्जसाठी तिला साडेचार वर्षांची शिक्षा झाली होती.’ तिने केलेले हे ट्विट आता खूपच वायरल होऊ लागले आहे. साधारण 11 वर्षांनंतर तिला ड्रग्जच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ड्रग्जच्या बाबतीत दुसऱ्यांना दुषण लावणाऱ्या रियाला आधीच तिचे भविष्य कळले होते की काय अशी चर्चा नेटीझन्समध्ये होऊ लागली आहे. रियाची स्टोरीही कदाचित या मुलीसारखीच असावी असे नेटीझन्स म्हणत आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

रिया आणि ड्रग्ज प्रकरण

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा संबंध हा रिया आणि ड्रग्जशी लावला गेला. रियाचे व्हॉटसअॅप चॅट वायरल झाल्यानंतर त्यामध्ये ड्रग्जचा सातत्याने होणाऱ्या उल्लेखामुळे नार्कोटिक्स विभागाने यात लक्ष घालायला सुरुवात केले. त्यानुसार रियासोबत अन्य लोकांचीही कसून चौकशी करण्यात आली. या संदर्भात या आधीही 10 जणांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये रियाचे नाव सातत्याने आल्यामुळे नार्कोटिक्स विभागाकडून तिची 3 दिवस कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये तिला तिचे व्हॉटसअॅप चॅट आणि अन्य काही गोष्टींवर चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान रियाने दिलेल्या जवाबानंतर तिला अटक करण्यात आली आहे. 

टायगर सिंगर होतो तेव्हा.. या गाण्यातून पदार्पण

सुशांतच्या आत्महत्येशी कसा असेल याचा संबंध

Instagram

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली यावर आजही त्याच्या कुटुबियांना विश्वास नाही. म्हणूनच त्यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली. CBI चौकशीनंतर अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या.सुशांत सिंह राजपूत हा ड्रग्ज घेत असल्याचा दावाही यामध्ये त्याच्याोबत राहण्यांनी केला होता. पण कुटुंबियांना आधीपासूनच रिया चक्रवर्तीवर संशय असल्यामुळे संशयाची सुई पहिल्या दिवसापासून रियावर होती. रिया या प्रकरणात अनेक कारणांमुळे गोवली गेली. तिचे व्हॉटसअॅप चॅट आणि रियाचे आर्थिक व्यवहार या सगळ्यामुळे रिया या प्रकरणात चांगली गोवली गेली आहे. 


आता या प्रकरणात रिया खरंच दोषी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी  नेटीझन्स आणि सुशांतच्या फॅन्सनी तिला आताच दोषी मानले आहे. 

संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात पार्थ समथान साकारणार मुख्य भूमिका