रियाच्या जामिनावर आज विशेष कोर्टात सुनावणी, एक रात्र काढली तुरुंगात

रियाच्या जामिनावर आज विशेष कोर्टात सुनावणी, एक रात्र काढली तुरुंगात

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंमली पदार्थांचा समावेश असल्याचे कळाल्यानंतर त्यापद्धतीने नार्कोटिक्स विभागाने चौकशी सुरु केली आणि या चौकशीत तब्बल 10 जणांना अटक केली. या यादीमध्ये मंगळवारी रिया चक्रवर्ती हिचाही समावेश झाला आहे. त्या आधी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला देखील अटक करत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर आता रियालाही मंगळवारी रात्री उशीरा अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तिने जामिनासाठी धडपड करुनही मंगळवारी तिच्या जामिनाचा अर्ज फेटाळून लावण्यात आला आणि तिला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे भायखळा जेलमध्ये असलेल्या रियाने पुन्हा एकदा जामिनाचा अर्ज केला आहे. रियाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आज विशेष कोर्टात त्याची सुनावणी होणार आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक

अक्षय कुमारने 'या' चित्रपटांमध्ये साकारला आहे अफलातून खलनायक

रियाला तुरुगांत भीती

Instagram

रियाचे वकिल सतीश मानशिंदे यांनी रिया आणि तिचा भाऊ शौविकच्या जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. रियाचा भाऊ शौविक याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. रियाच्या या जामिनामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. रियाची आतापर्यंत झालेली चौकशी ही पुरुष अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावेळी तिच्यासोबत कोणतीही महिला अधिकारी किंवा कॉन्स्टेबलही नव्हता. रियाकडून जबरदस्तीने काही गोष्टी कबूल करुन घेतल्या गेल्या आहेत. रियाने न्यूज चॅनेल्ससाठी दिलेल्या मुलाखतीतील काही विधानांना औपचारिक पद्धतीने मागे घेतले आहे. अशामुळे तुरुंगात जाणे तिच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. पुढे यामध्ये म्हटले आहे की, रियाकडे कायद्यानुसार ड्रग्ज हे सापडलेले नाही किंवा ड्रग्जची अवैधपद्धतीने केलेली खरेदी, विक्री, निर्मिती असा कोणताच पुरावा नाही. त्यामुळे तिला जामीन मिळायला हवी,असे तिच्या वकिलांचे म्हणणे आहे. आज यावर विशेष सुनावणी होणार आहे. त्यानंतरच रिया तुरुगांत राहते की बाहेर येते हे कळेलच. दरम्यान, सॅम्युअल आणि दिपेश यांच्या याचिकांवरही आज सुनावणी होणार आहे. 

सॅम्युअल आणि दिपेशही अटकेत

सुशांतच्या आत्महत्येची बातमी सगळ्यात आधी त्याचे घर सांभाळणारा सॅम्युअल मिरांडा आणि त्याचा कुक दिपेश सावंतही हे दोघेही अटकेत आहे. त्यांच्या जामिनासाठीही आज सुनावणी होणार आहे. सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांच्यावरही सध्या संशयाची सुई फिरत आहे.

11 वर्षांपूर्वी केलेल्या रियाने केलेल्या ट्विटवर नेटीझन्सची चर्चा

आधी नेपोटिझम मग ड्रग्ज अँगल

सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी आपल्या वांद्रे येथील घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. प्राथमिकरित्या त्याने आत्महत्या केली असे म्हटले जात होते. पण त्यानंतर यामध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या. अनेक चौकशीमध्ये याचा ड्रग्जशी संबंध असल्याचे समोर आले. मानसिक ताणवाखाली असलेला सुशांत ड्रग्जच्या आधीन होता. त्याला त्याची सवय लागली होती. त्याचे इलाज सुरु होते. पण तो गांजा ओढत होता.असे रियाने मुलाखतीत सांगितले होते. पण आता रिया, शौविक आणि सुशांत तिघेही ड्रग्ज घेत होते असे समोर आले आहे. यावर अद्याप सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला नाही. पण लवकरच सगळ्या गोष्टी समोर येतील. 


आज या सुनावणीमध्ये रिया तुरुंगात राहणार की,तिला जामीन मिळणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

बधाई हो' मधील अभिनेत्री रुग्णालयात दाखल, ब्रेन स्ट्रोकचा त्रास