घराचे दोन भाग झाल्यापासून घरात वेगवेगळे वाद व्हायला सुरुवात झाली आहे. कॅप्टनसी टास्कसाठी घराला दोन टीममध्ये विभागण्यात आले आहे. जास्मिन विरुद्ध रुबिना अशी ही टीम करण्यात आल्यापासून घरात असलेले अभिनव-रुबिना-जास्मिन असे त्रिकूट घरात तुटताना दिसत आहे. टास्कदरम्यान झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे यांचे नाते तुटले असून अभिनव- रुबिनामध्येही तणाव आल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमकं या टास्कमध्ये असे काय झाले ते आता जाणून घेऊया.
प्रेगनन्सीमध्ये दिसायचं असेल स्टायलिश तर या बॉलीवूड अभिनेत्रींना करा फॉलो
शाब्दिक चकमक
रुबिना ही कायमच घरात तिच्या शाब्दिक वारामुळे चर्चेत असते. घरात कोणताही वाद सुरु असेल. त्यावेळी रुबिना तिच्या उत्तम हिंदीतून लोकांवर कोटी करते. पण हेच शब्द अनेकांच्या डोक्यावरुन जातात. ‘घर का बटवारा’ या टास्कमध्ये बेडरुमचा भाग हा रुबिनाच्या टीमला मिळाला तर किचनचा भाग हा जास्मिनला मिळाला होता. बेडरुममधील वस्तू मागण्यासाठी जास्मिनच्या टीमने बरीच घासाघिस केली. पण काही वस्तू न मिळाल्यामुळे जास्मिनच्या टीमला बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. पण तरीही त्याचा राग मनात न ठेवता जास्मिन टीमने योग्य जेवण आणि नाश्ता देऊनही अभिनव- रुबिना नको त्या गोष्टीमध्ये अडकून राहिले आहेत. जास्मिनने काही गोष्टी न दिल्याचा राग मनात ठेवून रुबिना- अभिनवने तिच्याशी बोलणे टाकले आहे. शिवाय तिच्याबद्दल मागून बोलण्यासही सुरुवात केली आहे.
सेटवर साफसफाईचे केले काम, गाण्याने केले युवराज मेढेने परीक्षकांना थक्क
अभिनववर चिडली रुबिना
अभिनव आणि रुबिनामध्ये नेहमीच काहीना काही होत असते. निर्णय घेण्यावरुन अभिनव नेहमीच रुबिनाशी भांडत असतो. शिवाय बरेचदा रुबिना अभिनवला निर्णय घेऊ देत नाही हे अनेकदा दिसून आले आहे.या घरात हे दोघं खेळण्यापेक्षा जास्त नको त्या गोष्टींमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवतात, असे देखील दिसून आले आहे. इतकेच नाही तर सलमानने देखील याबद्दल अभिनवला सांगितले आहे. जास्मिनशी मैत्री असल्याचे सांगत त्यांनी जास्मिनला नेहमीच चुकीच्या गोष्टीत पाठिंबा दिला आहे. पण आता जास्मिनला काही गोष्टी बोलल्यामुळे आता अभिनव-रुबिना विरुद्ध जास्मिन असे वातावरण घरात दिसत आहे.
चुकीच्या ट्रॅकवर अभिनव- रुबिना
रुबिना दिलैकचा फॅन फॉलोविंग मोठा आहे. पण घरात राहताना घराच्या आत राहाताना अनेकांना रुबिना- अभिनव ही जोडी पहिल्या दिवसापासून खटकली आहे. रुबिनाच्या फॅन्सला तिच्या गोष्टी पटत असल्या तरी काहींना तिचे वागणे खटकले आहे. राहुल वैद्यला पहिल्या दिवसापासून या जोडप्याने संस्कारांच्या तराजूत तोलल्यामुळे राहुलला या गोष्टीचा चांगलाच फायदा झाला आहे. ज्यावेळी अभिनवने राहुलचा क्रिमिनल असा उल्लेख करत जास्मिनला पाठिंबा दिला होता. त्यावेळीच रुबिनाला कटपुली टास्कमध्ये मदारी म्हणून दाखवण्या आले होते. जास्मिन स्वत:च्या डोक्याचा उपयोग न करता रुबिनाच्या डोक्यानुसार चालते असे देखील सांगण्यात आले होते. पण अली आल्यानंतर जास्मिनला बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत. आता ती या खेळात फारच बिनधास्त खेळते. आता ती डोईजड होत असल्याचे दिसल्यामुळे रुबिना- अभिनव तिला या खेळात वेगळ्या पद्धतीने दाखवताना दिसत आहेत.
अजूनही हा कॅप्टनसी टास्क पूर्ण झालेला नाही. त्या आधीच या घरात असलेली एक घट्ट जोडी तुटली आहे. आता या टास्कदरम्यान अजून किती नाती दावणीला लागणार ते पाहायला हवे.
साऊथ सुपर ‘भागमती’च्या हिंदीत आलेल्या ‘दुर्गामती’च्या ट्रेलरवर प्रेक्षक नाराज