ADVERTISEMENT
home / मनोरंजन
रिंकू-आकाश जोडी पुन्हा झळकणार नागराज मंजुळेच्या ‘झुंड’मधून

रिंकू-आकाश जोडी पुन्हा झळकणार नागराज मंजुळेच्या ‘झुंड’मधून

‘सैराट’च्या अफाट यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे नवीन कोणता चित्रपट घेऊन येणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं असतं. ‘नाळ’ चित्रपटाच्या यशानंतर आता नागराज हिंदी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावत आहे. लवकरच त्यांचा ‘बिग-बी’ सोबत झुंड चित्रपट येत आहे. एवढंच नाही तर या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही सैराट फेम जोडीदेखील पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. नागराज पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

nagraj

नागराजसाठी ‘रिंकू आणि आकाश’ ही जोडी लकी

सैराटमधील आर्ची-परश्या म्हणजेच रिंकू-आकाश या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. सैराटने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले. आता नागराजच्या झुंडमध्ये ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने त्यांचे चाहते फारच खूश झाले आहेत. शिवाय रिंकू आणि आकाश यांचादेखील नागराजसोबतचा हा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे. आकाश ठोसरने यापूर्वी लस्ट स्टोरीमध्ये हिंदीतून काम केलं आहे. मात्र रिंकू आणि आकाश या दोघांचा एकत्र असा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. त्यामुळे झुंडमध्ये या सैराटफेम जोडीला पाहणं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारं आहे.

ADVERTISEMENT

rinku and akash

अमिताभ बच्चन यांची ‘झुंड’मध्ये महत्त्वाची भूमिका

झुंड चित्रपटामध्ये हिंदीतील महानायक ‘अमिताभ बच्चन’ एका प्रमूख भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक ‘विजय बारसे’ यांची प्रमुख भूमिका अमिताभ या सिनेमामध्ये साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन नागपूरात या चित्रपटाच्या शूटींगसाठी गेले होते. झुंडच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी  गावाकडच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केल्या होत्या. फार वर्षांनी त्यांनी या चित्रपटाच्या शूटींगसाठी बैलगाडी आणि बसमधून प्रवास केला असं त्यांनी यासोबत शेअर केलं होतं.

विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित झुंड

ADVERTISEMENT

झुंड चित्रपट प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक ‘विजय बारसे’ यांच्या जीवनावर आधारित आहे. झोपडपट्टीत राहण्याऱ्या गरीब मुलांचं खेळातून करियर घडावं यासाठी विजय बारसे यांनी प्रयत्न केले होते. समाजाकडून वाईट वागणूक मिळाल्याने वाममार्गाला लागलेल्या काही मुलांना विजय बारसे यांनी फुटबॉलपटू बनवलं होतं. त्यातील काही मुलांनी परदेशातील होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती. झोपडपट्टीत फुटबॉल खेळ रुजवण्याचा बारसे यांचा संघर्ष या सिनेमामधून प्रेक्षकांना पाहता येणार आहे

nagraj wth big b

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

15 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT