रिंकू राजगुरूचा झाला साखरपुडा, निळ्या साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य

रिंकू राजगुरूचा झाला साखरपुडा, निळ्या साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य

सैराटफेम आर्ची या व्यक्तिरेखेने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं. या चित्रपटात आर्चीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरूने साकारली होती. रिंकूच्या अभिनय आणि सौंदर्यांचे चाहते अनेक आहेत. सैराटमधील तिचे डायलॉग्ज आजही प्रेक्षकांना झिंगाट करतात. खरंतर सैराटमुळे रिंकूला एक विशेष ओळख मिळाली. ज्यामुळे तिला कमी वयातच लागोपाठ अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. सैटारनंतर रिंकूने कागर या चित्रपटात एक आगळीवेगळी भूमिका साकारली होती. कागरमध्ये तिने एका युवा राजकीय नेत्याची भूमिका केली होती. ज्यामुळे तिच्या अभिनयाचा वेगळा  पैलू जगासमोर आला. या चित्रपटानंतर रिंकूने साऊथच्या मल्लिगे, नूर जहान या चित्रपटांमध्येही काम केलं. एवढंच नाही तर रिंकू लवकरच ताहिर शब्बीरच्या एका वेबसिरिजमध्येही दिसणार आहे. या वेबसिरिजचं नाव 100 असून ती लवकरच हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. थोडक्यात रिंकूच्या करिअरचा ग्राफ दिवसेंदिवस उंचच  उंच चढू लागला आहे. मात्र करिअरच्या या टप्प्यावर असताना रिंकूने आता लग्नाचा घाट घातला आहे. रिंकू थेट लग्नाच्या बोहल्यावरच चढण्याच्या तयारीत आहे. मात्र हा थाटमाट रिंकूच्या खऱ्याखुऱ्या जीवनात नाही तर तिच्या आगामी चित्रपटासाठी सुरू आहे. तिच्या नव्या चित्रपटातील एका साखरपुड्याचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं तिच्या आगामी मेकअप चित्रपटातील असून त्यात रिंकू अतिशय सुंदर दिसत आहे. 

View this post on Instagram

Promotion time #MakeUp#😊

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

कसा आहे रिंकूच्या साखरपुड्याचा थाट

नुकतंच मेकअप या चित्रपटाचा ट्रेलर दिग्दर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये रिंकूच्या साखरपुड्याचा थाट दाखवण्यात आला आहे. रिंकू या चित्रपटात पूर्वी नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत चिन्मय उदगीकर प्रमुख भूमिकेत असणार आहे. चिन्मय यात नील नावाची भूमिका साकारत आहे. या  चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पूर्वी आणि नीलचा साखरपुडा दाखवण्यात आला आहे. हे गाणं शाल्मली खोलगडेने गायलं असून ते ए. व्ही. प्रफुलचंद्र यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याचे गीतकार वैभव देशमुख असून त्याची कोरिओग्राफी विठ्ठल पाटील यांनी केली आहे. मेकअप या चित्रपटात रिंकू आणि चिन्मयसोबत प्रतीक्षा लोणकर आणि राजन ताम्हाणे यांच्यादेखीलप्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन गणेश पंडीत करत आहेत. गणेश पंडितने आधी त्यांनी बालक-पालक, बाळकडू आणि राणी मुखर्जीच्या हिचकी सिनेमाचं लेखन केलं असून दिग्दर्शनातलं त्याचं हे पहिलं पाऊल आहे. 

मेकअपचा टीझर आणि रिंकूचा अभिनय

काही दिवसांपूर्वीच मेकअपचा टीझर प्रदर्शित झाला होता. या  टीझरमध्ये रिंकू दारूच्या नशेत दाखवण्यात आली होती. अगदी शोले स्टाईल धर्मेंद्रप्रमाणे ती यात बडबड करताना दिसत होती. या  क्लीपमध्ये रिंकू एका पडक्या बिल्डींगमध्ये उभी असून तिच्या घरच्यांना उद्देशून बोलत होती. जी तिच्या मेकअपवरून बोलणाऱ्या घरातल्याविरूद्ध तक्रारीचा सूर लावत आहे. या टीझरमध्येही तिचा बोलण्याचा लहेजा थोडासा ग्रामीणच आहे. हे टीझर सोशल मीडियावर येताच व्हायरल झालं आहे. रिंकूच्या फॅन्सनी तिच्या या नव्या अवताराला पसंती दिल्याचं कळतंय. मेकअपमधला रिंकूचा हा लुक तिच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांपासून अगदी हटके आहे. त्यामुळे तिच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.  

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

जान्हवी कपूरला नाही व्हायचं आई श्रीदेवीसारखं सुपरस्टार

कसौटी’ची प्रेरणाही अडकणार लवकरच विवाहबंधनात, एरिका फर्नांडिसचे शेअर केली पोस्ट

टॅक्सीतला तो अनुभव आठवला की, सोनमच्या अंगावर येतो काटा