रिंकू राजगुरू ठरतेय सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री

रिंकू राजगुरू ठरतेय सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री

सैराट चित्रपटातील ‘आर्ची’मुळे रिंकू राजगुरू (Rinku Rajguru)ला चित्रपटसृष्टीत एक विशेष ओळख मिळाली. सैराटच्या यशानंतर संपूर्ण महाराष्ट्र रिंकूला आर्ची या नावाने ओळखू लागला. एवढंच नाही तर सैराट चित्रपटातील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. ज्यामुळे तिला कमी वयातच नाव, यश, मानसन्मान, पैसा सर्वकाही मिळालं. सहाजिकच या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीत आता रिंकूचा भाव चांगलाच वधारला आहे. या यशामुळे तिला लागोपाठ चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.  एवढंच नाही तर रिंकूने तिच्या आगामी ‘मेकअप’ (Makeup) या चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन घेतल्याची चर्चा आहे. 

View this post on Instagram

Great things never come from comfort zone⚘

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकू 'या' गोष्टींबाबत झाली आहे सावध

सैराटमुळे रातोरात अभिनेत्री झालेल्या रिंकूला या चित्रपटानंतर एका पाठोपाठ अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. सैराटनंतर लगेचच रिंकूने कागर या चित्रपटात एक आगळीवेगळी भूमिका साकारली. कागरमध्ये तिने एका युवा राजकीय नेत्याची भूमिका केली होती. कागरमध्ये रिंकूसोबत शुंभकर तावडेचीही महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटामुळे तिच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू जगासमोर आला. याशिवाय रिंकूने साऊथच्या मल्लिगे, नूर जहान या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ताहिर शब्बीरच्या एका आगामी वेबसिरिजमध्येही रिंकू लवकरच दिसणार आहे. या वेबसिरिजचं नाव 100 असून ती लवकरच हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. थोडक्यात रिंकूच्या करिअरचा ग्राफ दिवसेंदिवस उंचच  उंच चढू लागला आहे. याशिवाय तिचा ‘मेकअप’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. सध्या या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी आणि प्रमोशन व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटात ती चिन्मय उदगीरकरसह दिसणार आहे. रिंकूने याआधी केलेल्या भूमिकांपेक्षा मेकअपमधील भूमिका थोडी वेगळी आहे. यात ती पूर्वी नावाच्या एका एका अल्लडपण तरिही बोल्ड मुलीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रिंकूने तिचं 20 किलो वजन कमी केल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा - रिंकू राजगुरूचा झाला साखरपुडा, निळ्या साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य

View this post on Instagram

Promotion time #MakeUp#😊

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकूने किती घेतलं आहे मेकअपसाठी मानधन

सैराट चित्रपट साईन करण्यापूर्वी रिंकू फारच लहान होती. मात्र आता ती एक अभिनेत्री म्हणून सिद्ध झाली आहे. ज्यामुळे ती आता फिटनेस, लुक्स, चित्रपटातील भूमिका, मानधन याबाबत सावध झाली आहे. एका अभिनेत्रीसाठी या गोष्टी फिल्म इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. ज्यामुळे मेकअपसाठी रिंकूने वजन कमी केलं आहे. यासोबतच तिने तिच्या मानधनातही वाढ केली आहे. मेकअपसाठी रिंकू राजगुरूला 27 लाख मानधन मिळाल्याची चर्चा आहे. मराठीतील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ही रक्कम नक्कीच जास्त आहे. ज्यामुळे रिंकूला आता सर्वांधिक मानधन घेणारी मराठी अभिनेत्री ही ओळख प्राप्त झाली आहे. 

 

हे ही वाचा - रिंकू राजगुरूने केलं 20 किलो वजन कमी, केला डाएट प्लॅन शेअर

View this post on Instagram

अय काय बघतोय😂

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

फोटोसौैजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

‘या’ अभिनेत्रीने समुद्रकिनारी बिकनीत शेअर केल्या हॉट योगा पोझ