मेकअपमध्ये रिंकू राजगुरूचा राऊडी अवतार

मेकअपमध्ये रिंकू राजगुरूचा राऊडी अवतार

सैराट फेम रिंकू राजगुरू आता मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच स्थिरावली आहे. सैराटनंतर रिंकूच्या आलेल्या कागर या चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाचं नाण खणखणीत असल्याचं दाखवून दिलं आणि राणीची भूमिका अगदी सहज पेलली. पहिला चित्रपट प्रेमकथा, दुसरा राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट आणि आता लवकरच रिंकू दिसणार आहे मेकअप या चित्रपटात. एवढंच नाहीतर या चित्रपटात प्रेक्षकांना रिंकूचा राऊडी अवतार दिसणार आहे.


कागरनंतर आता रिंकू करणार मेकअप
 

 

 


View this post on Instagram


 

 

White 🙂


A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on
रिंकूला तिच्या करिअरच्या सुरूवातीलाच सैराटसारखा चांगला आणि दमदार भूमिका असलेला सिनेमा मिळाला. त्यानंतर रिंकूचा नुकताच येऊन गेलेला 'कागर' हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट दिग्दर्शक मकरंद माने यांचा होता. ज्यामध्ये तिने एका युवा राजकीय नेत्याची भूमिका केली होती. आता रिंकू तिच्या आगामी मेकअप या चित्रपटातही अगदी हटके रोलमध्ये दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन गणेश पंडीत करत आहेत. या आधी त्यांनी बालक-पालक, बाळकडू आणि राणी मुखर्जीच्या हिचकी सिनेमाचं लेखन केलं असून दिग्दर्शनातलं हे त्याचं पहिलं पाऊल आहे.  


मेकअपमध्ये रिंकूचा राऊडी अवतार
 

 

 


View this post on Instagram


 

 

शेमारूचं नवीन सरप्राइज.. नवीन मराठी सिनेमा 'मेकअप'. आपल्या लाडक्या रिंकू राजगुरूच्या या नवीन सिनेमाचं टिझर आता लॉन्च झालंय शेमारूमराठीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनेलवर. . नक्की पहा आणि शेअर करा. #RinkuRajguru #Makeup #ShemarooMakeup #ShemarooMarathi #jaymaharashtra #maratha #mimarathi #ekpremveda #marathikavita #marathipost #marathistatus #marathimotivation #marathiyuva #marathi #marathimulga #marathimulgi #marathiquotes #marathi_ig #marathikavita #beingmarathi


A post shared by Shemaroo Marathi (@shemaroomarathi) on
मेकअपच्या टीझरमध्ये रिंकू दारूच्या नशेत असून अगदी शोले स्टाईल धर्मेंद्रप्रमाणे बडबडताना दिसत आहे. या 57 सेकंदाच्या क्लीपमध्ये रिंकू एका पडक्या बिल्डींगमध्ये उभी असून तिच्या घरच्यांना उद्देशून बोलत आहे. जी तिच्या मेकअपवरून बोलणाऱ्या घरातल्याविरूद्ध तक्रारीचा सूर लावत आहे. या टीझरमध्येही तिचा बोलण्याचा लहेजा थोडासा ग्रामीणच आहे. हे टीझर सोशल मीडियावर येताच व्हायरल झालं आहे. रिंकूच्या फॅन्सनी तिच्या या नव्या अवताराला पसंती दिल्याचं कळतंय. मेकअपमधला रिंकूचा हा लुक तिच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांपासून अगदी हटके आहे. त्यामुळे तिच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.  
 

 

 


View this post on Instagram


 

 

#RinkuRajguru #actress #indiancinema #marathi #bollywood #hindi #film #RinkuMRajguruOfficial


A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on
रिंकू-आकाश जोडी पुन्हा झळकणार नागराज मंजुळेच्या ‘झुंड’मधून

मेकअप या चित्रपटात रिंकूसोबत चिन्मय उदगीरकर, प्रतीक्षा लोणकर आणि राजन ताम्हाणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


हेही वाचा 


लवकरच मराठी पडद्यावर येतोय 'सत्यशोधक' चित्रपट