सारा अली खानच्या वागणुकीवर ऋषी कपूर खूश,सोशल मीडियावर केली स्तुती

सारा अली खानच्या वागणुकीवर ऋषी कपूर खूश,सोशल मीडियावर केली स्तुती

सारा अली खान सध्या सगळ्यांचीच आवडती आहे. तिचे चारचौघातील वागणे एखाद्या सर्वसाधारण मुलीसारखेच असल्यामुळेच लोकांना ती Down to earth वाटते. आता तर चक्क ऋषी कपूर यांनी सारा अली खानची तारीफ केली आहे. साराचे त्यांनी सोशल मीडियावर कौतुक केले असून सगळ्याच सेलिब्रिटींनी साराचा आदर्श घ्यायला हवा असे त्यांनी सांगितले आहे.

असे काय केले साराने?

Instagram

अनेकदा सेलिब्रिटीजना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात येते. त्यावेळी त्यांच्या मागे लवाजमा असतो. त्यांना रिसीव्ह करण्यासाठी एक मोठी पलटणच एअरपोर्टवर जमा झालेली असते. सारा अली खानही तिच्या शुटींगमधून परतत असताना तिला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले. आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं आहे. तर साराचे वेगळेपण असे की, ती या फोटोंमध्ये तिची बॅग स्वत: घेऊन जाताना दिसत आहे. तिने तिच्या बॅगची ट्रॉली स्वत: ओढताना दिसत आहे.

‘जागो मोहन प्यारे’चा ‘राहुल’ भेटला बॉलीवूडच्या ‘राहुल’ला

म्हणून केली ऋषी कपूर यांनी तारीफ

ऋषी कपूर यांनी हा फोटो पाहिल्यानंतर त्यांनी लगेचच ट्विट करत साराचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, सेलिब्रिटी असले म्हणून काय झाले. इतर सेलिब्रिटींनी एअरपोर्टवर कसे वागायला हवे याचे उत्तम उदाहरण तू सगळ्यांसमोर उभे केले आहेस. कोणत्याही सेलिब्रिटीला रिसीव्ह करण्यासाठी कोणत्या चमच्यांची गरज नाही. तुमचे तुम्ही समर्थ आहात हे तू तुझ्या वागण्यातून दाखवून दिले आहे. कोणत्याही सुरक्षा रक्षकाशिवाय तू बिनधास्त फिरु शकतेस हे तू दाखवून दिले आहेस.तुझे फार कौतुक आहे. 

Instagram

साराचा अंदाच नेहमीच असा

Instagram

सारा अली खान ही अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी असली तरी देखील ती एका सर्वसाधारण मुलीसारखेच राहते. ती अनेक वेळा कोणत्याही बॉडीगार्डशिवाय बिनधास्त फिरत असते. तिचा हाच अंदाज अनेकांना आवडतो.साराने आतापर्यंत दोन चित्रपटात काम केले आहे. पण तरीदेखील तिचा पाय जमिनीवर आहे. तिच्या याच स्वभावामुळे तिचे सगळीकडून नेहमीच कौतुक होत असते.

भारतीय फॅन्सची सर्वात जास्त पसंती आर्यन मॅनला

सध्या करतेय कार्तिक आर्यनला डेट

Instagram

सध्या सारा आणि कार्तिकच्या अफेअर्सच्या चर्चा जोरदार रंगत असतात. ही जोडी कायमच फिरताना दिसत असते. लव आज कल 2 या चित्रपटात ही फ्रेश पेअर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शुटींगच्या निमित्ताने ही दोघं एकत्र असतात. पण शुटींग व्यतिरिक्तही ही जोडी अनेकदा बाहेर फिरताना दिसते. त्यामुळे आता या दोघांमध्ये जे काही सुरु आहे ते त्यांनी ऑफिशिअली सांगितले नसले तरी लोकांनी या दोघांची जोडी कन्फर्म करुन टाकली आहे. या दोघांनी नुकतीच एम्तियाज अलीच्या चित्रपटाची शुटींग संपवली आहे.सारा मुंबईत परतली असून ती पुढील कामाच्या तयारीला देखील लागली आहे.

 

साराला आवडतात ट्रेडिशनलवेअर

साराच्या प्रेमात पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती बाहेर नेहमीच ट्रेडिशनल कपड्यांमध्ये असते. ती ट्रेंडी कपडे घालत नाही असे नाही तर ती ट्रेडिशनल कपड्यांमध्ये फारच कम्फर्टेबल असते. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. पण वाढत्या वजनामुळे ते शक्य नव्हते. म्हणूनच तिने तिचे वजनही कमी केले. 


आता साराच्या या जबाबदार वागण्यामुळे बॉलीवूडच्या इतर कलाकारांच्या वागण्यात काही फरक पडतो का हे पाहावे लागेल.

या' अभिनेत्री प्रमोट करत आहेत Nude Yoga, व्हायरल झाले फोटोज