ऋषी कपूरला वेध रणबीर - आलियाच्या लग्नाचे

ऋषी कपूरला वेध रणबीर - आलियाच्या लग्नाचे

अभिनेता ऋषी कपूर गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या आजारावर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. यामुळे आपल्या आईच्या निधनाच्या  वेळीदेखील ऋषी उपस्थित राहू शकलेला नाही. तथाकथित आलेल्या बातम्यांप्रमाणे ऋषी कपूरला कॅन्सर झाल्याचं म्हटलं जातं. पण कपूर खानदानाने आतापर्यंत ऋषीच्या आजाराबद्दल उपचार घेत  असल्याचं सोडून काहीच स्पष्ट केलेलं नाही. नुकतीच ऋषी कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ऋषी लवकरच भारतात परतणार असल्याची बातमी व्हायरल होत आहे. या महिन्याच्या अखेरील आपले उपचार करून ऋषी कपूर भारतात परत येत आहे असं सूत्रांकडून कळत आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऋषी यांना भारतात आल्यानंतर आपला मुलगा रणबीरचं लग्न बघायचं आहे.


rishi kapoor
सध्या मुहूर्त काढण्याचं काम सुरु


सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांना आपल्या मुलाचं लग्न बघायचं आहे. हीच त्यांच्या आयुष्यातील प्राथमिकता आता राहिली आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. रणबीरने याआधीदेखील दीपिका आणि कतरिनाला डेट केलं आहे. पण त्यांच्याशी काही कारणांमुळे रणबीरचं लग्न होऊ शकलं नाही. पण आता निदान आलियाबरोबर रणबीरने आपलं आयुष्य सेट करावं असं त्याच्या वडिलांना वाटत आहे. लवकरात लवकर या दोघांनी लग्नबंधनात अडकावं असं ऋषी कपूरला वाटत असल्याचं आता कळत आहे. ऋषी आणि नीतू कपूर भारतात आल्यानंतर आलियाच्या कुटुंबीयांशी चर्चा करून लग्नाची तारीख ठरवणार असल्याचंही कळत आहे. इतकंच नाही तर सध्या भटजींशी बोलून योग्य मुहूर्त कोणते हेदेखील ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे.


आलिया आणि रणबीरची वाढती जवळीक


alia and ranbir FI


गेल्या अनेक महिन्यांपासून आलिया आणि रणबीरची वाढती जवळीक सर्वांनाच दिसत आहे. इतकंच नाही तर कपूर आणि भट्ट हे दोन्ही कुटुंबीयदेखील एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत. दिग्दर्शक महेश भट यांनीदेखील आपल्या  मुलीचे रणबीरशी असलेलं नातं मान्य केलं आहे. तर अंबानीच्या प्रि - वेडिंग पार्टीमध्येही करण जोहरने रणबीर कोणाच्या हाती लागत नाही असं म्हणत आलिया आणि रणबीरची फिरकी घेतली होती. रणबीर आणि आलियाला सध्या सगळेच लग्न करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे केवळ ऋषीच नाही तर सध्या सगळ्यांनाचा आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे वेध लागले आहेत. ब्रम्हास्त्रच्या सेटवर आलिया आणि रणबीरमधील प्रेम फुलत गेलं याची सर्वांनाच माहिती आहे. कतरिना आलियाची बेस्ट फ्रेंड होती. पण इतकं असूनही रणबीरचं कतरिनाशी ब्रेक अप झाल्यानंतर रणबीरबरोबर आलियाने आपलं प्रेमाचं नातं जपलं हे सर्वांनाच थोडं धक्कादायक होतं. पण रणबीर इतर दोघींप्रमाणे आलियालादेखील चकवणार नाही ना? असा प्रश्न इतर लोकांप्रमाणेच त्याच्या वडिलांच्याही कदाचित मनात असावा त्यामुळे आल्यानंतर आपल्या मुलाचं लग्न सर्वात आधी पाहण्याचा ऋषी कपूर यांचा मानस असल्याचं म्हटलं जातं.


सहा महिन्यांपूर्वी उपचारासाठी ऋषी दाखल


rishi with family


सहा महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये उपचारासाठी ऋषी कपूरला दाखल करण्यात आलं होतं. गेल्या सहा महिन्यांपासून नीत कपूरही ऋषीबरोबर साथ द्यायला तिथेच आहे. यावेळी अधूनमधून रणबीर आणि आलिया दोघेही भेटायला जात असून सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत असतात.


फोटो सौजन्य - instagram 


हेदेखील वाचा -


‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट


आलिया-रणबीरच्या नात्यात ‘का रे दुरावा?’,पाहा पुरावा


आलिया रणबीरसोबत नाही तर याच्यासोबत करणार व्हेलेंटाईन्स डे