वेबसीरिजमधल्या कलाकारांचं वाढतं फॅन फोलोइंग

वेबसीरिजमधल्या कलाकारांचं वाढतं फॅन फोलोइंग

टेलीव्हीजन आणि रूपेरी पडद्यानंतर सध्या वेबसीरीजचे जग सर्वाधिक लोकप्रिय झालं आहे. त्यामुळेच तर वेबसीरिजमधल्या कलाकारांची फॅन फॉलोइंगही खूप जास्त वाढत आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडिया अनुसार, गेल्या आठवड्यात ‘मिर्जापूर’चा अभिनेता अली फजल आणि ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्री किर्ती कुल्हारी वेबसीरिजच्या दुनियेतल्या कलाकारांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Four more shots please!✨✨✨@banij @maanvigagroo @sayanigupta


A post shared by Kirti Kulhari (@kirtikulhari) on
वेबसीरिजच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये किर्ती कुल्हारीने अमेझॉन प्राईमच्या 'फोर मोर शॉट्स प्लीज’ या  मालिकेत दिलेल्या आपल्या बोल्ड परफॉर्मन्समुळे नंबर वन स्थान पटकावलं. इतके दिवस वेबसीरिज स्टार्सच्या लोकप्रियतेत नंबर वन स्थानी असलेल्या राधिका आपटेला किर्तीने 94 गुणांसह नंबर एक स्थानी येऊन मागे टाकलं.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Shot by @prabhatshetty hair and make up @kritikagill styled by @ayesha_dasgupta #photoshoot #studio #brownisbeautiful #normaldayatwork


A post shared by Radhika (@radhikaofficial) on
नेटफ्लिक्सच्या ‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘घोल’ मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री राधिका आपटे सध्या लोकप्रियतेत 46 गुणांसह दूस-या स्थानावर आहे.

‘बीएफएफ विथ वोग’ सीजन 2 (वूट) ने नेहा धूपियाला तिस-या स्थानावर नेऊन ठेवले. तर 'इट्स नॉट दॅट सिंपल’ (वूट) आणि रसभरी या वेबमालिकांमुळे स्वरा भास्कर चौथ्या पदावर आहे. तर 'फोर मोर शॉट्स प्लीज’मध्ये असलेली अभिनेत्री लिझा रे पाचव्या स्थानावर आहे.


rsz top actors in web series


लोकप्रिय अभिनेत्यांच्या श्रेणीमध्ये अमेझॉनच्या ‘मिर्जापूर’मध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा अभिनेता अली फ़जल लोकप्रियतेत प्रथम स्थानी आहे. 79 गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचलेल्या अलीने ऑल्ट बालाजीच्या ‘कहने को हमसफर हैं’ वेबसीरिजचा अभिनेता रोनित रॉयला लोकप्रियतेत मागे टाकलंय. रौनित 48 गुणांसह दुस-या स्थानावर आहे, तर ‘सॅक्रेड गेम्स’चे दोन्ही लोकप्रिय अभिनेते सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हे यादीत तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तर ‘मिर्जापूर’मुळे अभिनेता पंकज त्रिपाठीच्या लोकप्रियतेत वाढ होऊन तो पाचव्या स्थानावर आहे.


rsz top actress in web series


अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये किर्ती आणि अलीची लोकप्रियता डिजीटल न्यूज, न्यूजपेपर आणि व्हायरल न्यूजमध्ये दिसून आली होती.  


स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याविषयी सांगतात की, "वेब सीरीजच्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो. तेव्हा आम्हांला असं लक्षात आलं की, आज बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच या वेबमालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांची लोकप्रियता वाढत आहे. सोशल प्लॅटफॉर्म, व्हायरल न्यूज, डिजीटल न्यूज आणि न्यूजपेपर्समध्ये त्यांचा वाढता प्रेजेंस ते स्टार्स झाल्याचाच पुरावा आहेत. भलेही मेनस्ट्रीम सिनेमांमध्ये यातले काही कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून येत नसले तरीही वेबसीरिजच्या जगातले ते तारे-तारका तेच आहेत.”


अश्वनी कौल पुढे सांगतात की, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड आणि इतर सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग मिळवतो.”


फोटो सौजन्य - Instagram


हेही वाचा -


रेवा- सत्याचा ब्रेकअप झाला?, #MovingOut चा सीझन २ आला