रितेश - जेनेलियामध्ये नक्की काय बिनसलं, रितेशला दिलं जेनेलियाने सडेतोड उत्तर

रितेश - जेनेलियामध्ये नक्की काय बिनसलं, रितेशला दिलं जेनेलियाने सडेतोड उत्तर

घर आणि संसार म्हटलं की भांड्याला भांडं आदळणारच असं नेहमी म्हटलं जातं. बॉलीवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचा संसार दृष्ट न लागो असा आहे आणि त्यापैकी एक जोडी आहे ती म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलियाची. रितेश आणि जेनेलिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. इतकंच नाही तर आपले फोटो पोस्ट करत एकमेकांविषयी प्रेमही नेहमी व्यक्त करत असतात. पण यावेळी मात्र इतक्या वर्षात पहिल्यांदाच रितेश आणि जेनेलियामध्ये नेमकं काय बिनसलं आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला ना नक्की काय झालं? रितेश आणि जेनेलियाचं भांडण रितेशनेच सोशल मीडियावर आणलं आहे. पण जरा थांबा...आधीच काही निष्कर्ष काढू नका. प्रेमात भांडण हे असतंच पण हे भांडण लुटूपुटीचं आहे हे नक्की. 

नक्की काय झालं?

रितेश आणि जेनेलिया ही अशी जोडी आहे जी सगळ्यांच्या दृष्टीने आदर्श आहे. ही जोडी नेहमीच एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसून येते. त्यांचे फोटो पाहताना आणि त्यांच्या कॅप्शन वाचताना या दोघांनाही एकमेकांंविषयी असलेला आदर आणि प्रेम नेहमीच दिसून येतो. पण रितेशने पहिल्यांदाच अशी पोस्ट शेअर केली आहे की, नक्की रितेश आणि जेनेलियामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. पण या सगळ्यावर जेनेलियानेही रितेशला सडेतोड उत्तर दिलं आहे. तर नेमकं असं झालं की, रितेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये लिहिलं आहे, ‘प्रत्येक रागावलेल्या स्त्री च्या मागे एक पुरूष असतो, पण त्याने नक्की काय चुकीचं केलं आहे याची त्याला कल्पनाही नसते.’ हा फोटो ट्विट करून रितेशने जेनेलियाला टॅग केलं. हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रक्रिया द्यायला सुरूवात केली. ‘ही घरातील गोष्ट आहे’. तर एकाने लिहिलं की,  ‘घरचं भांडण आता ऑनलाईन झालं.’ 

Good news: अॅमी जॅक्सनला झाला मुलगा, फोटो व्हायरल

जेनेलियाचं सडेतोड उत्तर

रितेशने केलेल्या ट्विटवर जेनेलियानेदेखील दुसरा फोटो ट्विट करत सडेतोड उत्तर दिलं. जेनेलिया नेहमीच रितेशचे कौतुक करणारे फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. पण पहिल्यांदाच रितेशच्या अशा फोटोला तिने उत्तर दिलं आहे. ‘नवरा काय बोलतो याकडे मी सहसा लक्ष देत नाही. पण जेव्हा देते आणि काही बोलते तेव्हा नक्कीच त्याची त्यात काहीतरी चूक आहे’. रितेश आणि जेनेलियाच्या या लुटूपुटीच्या भांडणाने त्यांच्यातील प्रेम पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 

टीव्हीवरील ‘या’ आदर्श सुनेने दाखवलाय पहिल्यांदाच बोल्ड अंदाज

काही दिवसांपूर्वीच प्रिती झिंटाबरोबरील व्हिडिओ झाला व्हायरल

गेल्याच आठवड्यात एका पुरस्कार सोहळ्यात जेनेलिया आणि रितेश गेले होते. त्यावेळी रितेश आणि प्रिती झिंटा बोलत असताना जेनेलिया त्यांच्याकडे ज्या प्रकारे पाहात होती तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे काही जण या भांडणाचा या गोष्टीशी तर काही संबंध नाही ना असाही कयास लावत आहेत. पण रितेश आणि जेनेलिया हे एकमेकांचे सर्वात जवळचे मित्रही आहेत आणि नवरा बायकोही. त्यामुळे त्यांच्यातील हे लुटूपुटीचं भांडण नक्कीच लगेच मिटलं असणार. दरम्यान याच आठवड्यात रितेशचा ‘मरजावां’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. जेनेलियादेखील लवकर पुनरागमन करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

छोट्या पडद्यावरच्या या सुंदऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षाही आहेत वरचढ