रितेशने धर्मेंद्रजींना दिल्या वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा

रितेशने धर्मेंद्रजींना दिल्या वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनेकांनी धर्मेंदजींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना निरोगी आरोग्य लाभावे याची प्रार्थनाही केली. पण रितेशने थोड्या हटक्यापद्धतीने धर्मेदजींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर केवळ रितेशच नाही. तर धर्मेंद्रजींच्या चाहत्यांनी सुद्धा त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर आजही धर्मेंद्रजींच्या अभिनयाची मोहिनी लोकांवरुन उतरली नाही असेच म्हणावे लागेल.

उदय टिकेकर यांचं मराठीत पुनरागमन

रितेशने दिल्या अशा शुभेच्छा

धर्मेंद्रजींनी अनेक हिट चित्रपट दिले. त्यांची अनेक गाणी चांगलीच गाजली. त्यापैकीच एक गाणं म्हणजे ‘पल पल दिल के पास’ या गाण्याचे लिपसिंक केले आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने पोस्टमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. रितेशचा हा व्हिडिओ 3 लाखांहून अधिक चाहत्यांनी पाहिला असून त्याच्या या पोस्टमध्येही अनेकांनी धर्मेंद्रजींना शुभेच्छा दिल्या आहेत.

टीकटॉकवर धुमाकूळ

आता वर सांगितलं तसं रितेशनेच नाही तर इतरही चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीकटॉकवर त्यांच्या डायलॉगचे व्हिडिओ भलतेच व्हायरल होत आहे. त्यातील काहीच व्हिडिओ आपण पाहूया.

धर्मेंद्रजींचे डायलॉग

धर्मेंद्रजींचे डायलॉग हे फारच प्रसिद्ध होते. ‘कुत्ते कमिने मे तेरा खून पी जाऊंगा’,(शोले) ‘गाववालो इस बसंती के साथ मेरा लगन होने वाला था ’(शोले), ‘अंग्रेजी बहुत ही अवैज्ञानिक भाषा है साहब (चुपके चुपके)’, ‘बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना’ (शोले) हे अगदी काही उदाहरणादाखल आहे. पण त्यांचे अनेक डायलॉग प्रसिद्ध आहेत. 

जेव्हा बाजीराव पेशवा आणि सदाशिवराव भेटतात तेव्हा...

धर्मेंद्रजींचे चित्रपट

Instagram

धर्मेंद्र सध्या 84 वर्षांचे असून त्यांनी चित्रपटात काम करणे बंद केले आहे. धर्मेंद्र सिंह देओल असे त्यांचे नाव असून त्यांनी कायम चित्रपटांसाठी धर्मेंद हे नाव घेतले. धर्मेंद्रजींचा चित्रपट प्रवास हा यशस्वी होता असे म्हणायला हवे. दिसायला अत्यंत देखणे आणि अभिनयाची वेगळीच लकब असलेले धर्मेंद्रजी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ (1960) या चित्रपटातून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात  केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमधून कामाचा सपाटा लावला. त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. नुतनसोबत त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. मिना कुमारीसोबतचे त्यांचे चित्रपट चांगले चालले. त्यांना सगळ्यात जास्त यश मिळाले ते हेमा मालिनीसोबत. हेमा मालिनीसोबतची त्यांची जोडीही प्रेक्षकांना फारच आवडली. विवाहित असूनही त्यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केले. 

सध्या धर्मेंदजी हे प्रोडक्शनमध्ये असून त्यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलही चित्रपटात आला आहे. 


एकूणच धर्मेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.