जेव्हा रितेशची मुलं टायगरचं नाव ऐकून गोंधळतात…

जेव्हा रितेशची मुलं टायगरचं नाव ऐकून गोंधळतात…

बाघी 3 या टायगर, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुखच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा मिक्स रिव्ह्यू मिळाला आहे. पण तरीही हा चित्रपट 100 कोटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. होळीच्या सुट्टीच्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली असल्याचे दिसून आले आहे. पण तरीही या चित्रपटाने अजय देवगण आणि सैफ अली खानच्या तान्हाजी चित्रपटाला मात्र पहिल्या आठवड्यात कमाईच्या बाबतीत मात दिली नाही. कोरोना व्हायरस असूनही या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे रितेश देशमुखने. टायगर श्रॉफच्या मोठ्या भावाची भूमिका या चित्रपटात रितेशने केली आहे. या चित्रपटाच्या सेटवर जेव्हा रितेशची मुलं आली होती त्याचा एक मजेशीर किस्सा सध्या व्हायरल होत आहे. रितेशने एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला आहे. टायगरचं नाव ऐकून त्याची मुलं थोडी बिथरली होती.

रितेश देशमुखने सांगितलं जेनेलियाबरोबरच्या सुखी संसाराचं गुपित

टायगरचे नाव कळल्यानंतर गोंधळली रितेशची मुलं

बाघी 3 चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी रितेशने अनेक मुलाखती दिल्या होत्या. रितेश हा नेहमीच त्याच्या मजेशीर उत्तरांसाठी आणि स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. रितेशने याआधी श्रद्धा कपूरबरोबर काम केलं आहे. एक विलनमध्ये तिच्या विरूद्ध खलनायकाचं कामही त्याने केलं होतं. रितेशच्या मते श्रद्धा ही अतिशय हुशार आणि मेहनती कलाकार आहे. त्यावेळचा किस्सा रितेशने एका मुलाखतीमध्ये शेअर केला. या चित्रपटाच्या वेळी रितेशची दोन्ही मुलं सेटवर आली होती. त्यांनी रितेशला विचारलं ‘बाबा हे कोण आहेत?’ तर मी म्हणालो की, ‘ही श्रद्धा आत्या आहे’ त्यानंतर त्यांनी टायगरकडे बघून विचारलं, ‘हे कोण आहेत?’ त्यावर मी उत्तर दिलं की, ‘हे टायगर काका आहेत’, त्यावर त्यांनी माझ्याकडे गोंधळून पाहिलं आणि म्हटलं की, ‘यांचं नाव टायगर आहे का?’ तर मी हो म्हटलं त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती की, ‘यांचं नाव टायगर का आहे? टायगर आहे तर मग ते इथे काय करत आहेत?’ त्यावेळी आम्ही सर्बियामध्ये चित्रीकरण करत होतो. त्यावर मी त्यांना म्हटलं की, ‘बाळा, आपल्या देशात आपण टायगर वाचवा सांगतो, पण या देशात टायगर आपल्याला वाचवणार आहे.’ टायगर या नावावरून बरीच मुलं गोंधळतात.

रितेश-जेनेलिया चार वर्षांनी पुन्हा एकत्र

रितेशच्या मुलांचे व्हिडिओ व्हायरल

रितेशच्या मुलांचा निष्पापपणाही यातून दिसून येतो. रितेशची मुलं ही नेहमी मस्ती करत असतात. त्यांना शाळेतून आणताना अथवा नेताना जेनेलिया आणि रितेशचे बरेचदा व्हिडिओ व्हायरल होत असतात. रितेशची दोन्ही मुलं ही अतिशय संस्कारी असून कधीही कोणत्याही व्यक्तीच्या समोर जाताच हात जोडून नमस्कार करतात. त्याशिवाय रितेशचा लहान मुलगा तर नेहमी शाळेतून येताना रस्त्यावरून धावत असतो आणि त्याच्या मागे दोघेही आई वडील धावत असल्याचे व्हिडिओ बरेचदा व्हायरल झाले आहेत. याआधीही त्यांनी एका व्हिडिओमध्ये गांधीजींबद्दल बोलतानाही बऱ्याच जणांनी ऐकलं आहे. त्यामुळे ही दोन्ही मुलं देशमुख घराण्याचं नाव पुढे नेणार अशीही नेहमी चर्चा होत असते. रितेश आणि जेनेलियाची दोन्ही मुलं ही नेहमीच त्यांच्याबरोबर असतात. शिवाय प्रत्येक ठिकाणी हे दोघेही आपल्या मुलांना सोबत घेऊन जातात. कधीही या दोघांना कोणत्याही नॅनी अथवा अन्य व्यक्तींसह पाहण्यात  आलेले नाही. अन्य सामान्य आई वडिलांप्रमाणेच या दोन्ही मुलांची काळजी रितेश आणि जेनेलिया घेत असलेले दिसून येते. 

रितेश देशमुखचं केंद्रीय मंत्र्यांना सणसणीत उत्तर...वाचा काय म्हणाला रितेश

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.