रितेशने दिल्या ‘बायको’ जेनेलियाला मजेशीर शुभेच्छा

रितेशने दिल्या ‘बायको’ जेनेलियाला मजेशीर शुभेच्छा

बॉलीवूडमधील फेव्हरेट आणि मराठमोळं कपल म्हणजेच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा. जे नेहमीच सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात आणि आपल्या फॅन्ससोबतही कनेक्टेड असतात. हे कपल नेहमीच त्यांचे क्युट फोटोज आणि मूमेंट्स सोशल मीडियावर शेअर करत असतं. आज या क्युट कपलच्या लग्नाचा आठवा वाढदिवस आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या फॅन्सनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान या क्युट कपलनेही खास व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातीलच रितेशने शेअर केलेला व्हिडिओ तर लयभारी आहे. जो कोणीही लग्न झालेला व्यक्ती अगदी हूबेहूब समजू शकतो.

रितेशने शेअर केला लयभारी व्हिडिओ

रितेशने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये जेनेलिया त्यांच्या लग्नाचे फोटो पाहत आहे. त्याचवेळी बॅकग्राऊंडला प्रसिद्ध गजल गायक जगजीत सिंग यांची गजल तुम इतना जो मुस्कुरा रहे हो वाजत आहे. त्यावर रितेशने दिलेले दुःखद हावभाव एक नंबर आहेत.

View this post on Instagram

Happy Anniversary Baiko @geneliad

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

हा व्हिडिओ शेअर करत रितेशने लिहीलं आहे की, हॅपी अॅनिव्हर्सरी बायको. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आणि या दोघांच्या बाँडिगची खूप चर्चा आहे.

माझ्या चेहऱ्यावरील हास्यामागचं कारण रितेश

एकीकडे रितेशने मजेशीर व्हिडिओ शेअर केला तर दुसरीकडे जेनेलियाने यावर्षी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, माझ्या नवऱ्याची बायको असल्याबद्दल प्रेम आहे.

मागच्यावर्षीही जेनेलियाने लग्नाच्या वाढदिवसाला भावस्पर्शी पोस्ट लिहून शेअर केली होती. जेनेलियाने लिहीलं होतं की, प्रत्येक मुलीच्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबत काही अपेक्षा असतात की, मला असा नवरा हवा. पण खरं सांगायचं तर माझी अशी काहीच अपेक्षा नव्हती. माझ्याकडे रितेशच्या रूपात एक चांगला जोडीदार आहे, जो माझा सर्वात चांगला मित्र आहे. मला जेव्हा गरज होती तेव्हा तो माझ्यासोबत ठाम उभा होता. त्याने मला हा विश्वास दिला की, आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती येवो आपण त्याचा जोडीने सामना करू.

तसंच तिने हेही लिहीलं होतं की, ही व्यक्ती ज्याच्याशी माझं लग्न झालं तिच माझ्या हास्यामागचं कारण आहे. किती गोड ना. 

रितेश आणि जेनेलियाचं लग्न 3 फेब्रुवारी 2012 ला झालं होतं. या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती त्यांच्या मुझे तेरी कसम या पहिल्यावहिल्या चित्रपटापासून. या दोघांना रियान आणि राहिल ही दोन क्युट मुलं आहेत. लग्नानंतर जेनेलिया बऱ्याच काळ मोठ्या पडद्यापासून दूर होती पण आता तिच्या दाक्षिणात्य चित्रपट येत आहे. तर रितेशचाही आगामी बागी 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

POPxoMarathi कडून या मेड फोर इच अदर कपलला #HappyAnniversary.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.