संगीतकार विशाल शेखरला टक्कर देतोय रितेश देशमुखचा मुलगा

संगीतकार विशाल शेखरला टक्कर देतोय रितेश देशमुखचा मुलगा

रितेश देशमुख नेहमीच आपल्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. कधी त्याचे आणि जेनेलियाचे फोटो,  तर मुलांचे व्हिडिओ रितेश पोस्ट करत असतो. आपल्या चाहत्यांना आपल्या आयुष्यात काय चालू आहे याची वेळोवेळी माहितीही देत असतो. नुकताच रितेशने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने संगीतकार विशाल आणि शेखरला टॅग करत आपल्या घरात एक संगीत दिग्दर्शक असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला काही भविष्य दिसतंय का असाही प्रश्न रितेशने विशाल आणि शेखरला विचारला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण आहे का नवा संगीतकार? तर दुसरा तिसरा कोणीही नसून रितेशचा लहान मुलगा राहिल (Rahyl) आणि पुतणी दिवियाना आहेत. हा क्यूट व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. 

राहिलच्या क्यूट आवाजातील गाणं

रितेशने एक व्हिडिओ शेअर करत क्वारंटाईन संगीतकार म्हणून विशाल आणि शेखरला आपला मुलगा टक्कर देत असल्याचे म्हटले आहे. मुळात राहिलचा गोड आवाज आणि कोणत्या विचित्र भाषेतील गाणं ऐकून आपल्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. नक्की ही भाषा कोणती असाही विचार एकदा मनात डोकावून जाईल. पण राहिल आपल्याच मस्तीमध्ये आपली बहीण दिवियानासह मस्तपैकी गाण्याचं संगीत देत गात आहे. अर्थात राहिल गीतकार आणि संगीतकार दोन्ही बनला आहे. लहान मुलांचे दिवस अप्रतिमच असतात. म्हणूनच आपण नेहमी लहानपण देगा देवा म्हणतो. राहिलचा हा व्हिडिओ बघून पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटलं तर नवल नाही. रितेश त्याला या व्हिडिओमध्ये तू नक्की काय करत आहेस असंही विचारत आहे. त्यावर आपण गाणं बनवत असल्याचं उत्तर राहिलने दिलंय. इतकंच नाही तर पुढे अतिशय मस्तपैकी मस्तीत राहिल स्वतःच्याच नादात हे गाणं गात आहे. रितेशच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

रितेश देशमुखने सांगितलं जेनेलियाबरोबरच्या सुखी संसाराचं गुपित

रितेश आणि जेनेलिया नेहमीच देतात मुलांना प्रोत्साहन

रितेश आणि जेनेलिया हे दोघेही नेहमी आपल्या दोन्ही मुलांना इतकंच नाही तर आपल्या भावाच्या मुलांनाही नेहमीच प्रोत्साहन देत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच हे दोघेही त्यांना आपले भारतीय संस्कार जपून ठेवायलाही मदत  करतात. रितेशची दोन्ही मुलं अगदी कॅमेऱ्यासमोरही कोणाला भेटले तर हात जोडून नमस्ते म्हणतात. त्यांचा हा सालसपणा आणि नम्रता नेहमीच सर्वांना हवीहवीशी वाटत आली आहे. रितेशची दोन्ही मुलं नेहमीच मजा मस्ती करत असताना दिसतात. पण त्यातही रितेशचा लहान मुलगा हा जास्त मस्तीखोर असल्याचं व्हिडिओवरून जाणवतं. 

सुशांतच्या केसमध्ये नवे वळण, रियावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

नुकताच दोघांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

रितेश आणि जेनेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी अवयवदान करणार असल्याचे सांगितले आहे. आपण अवयवदान करणार असल्याची आज प्रतिज्ञा घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं असून आपल्या चाहत्यांनाही त्यांनी यासाठी विचार करण्यास सांगितलं आहे. अवयव दान हे सर्वात मोठं दान असून त्यामुळे अनेक जीव वाचू शकतात. याचं महत्त्व गेले कित्येक वर्ष डॉक्टरही सांगत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स डे च्या दिवशी हा मोठा निर्णय या दोघांनी घेऊन सध्याच्या  या कोरोनाच्या काळात अतिशय योग्य निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरातून येत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक जणांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देत रितेश आणि जेनेलियाचे कौतुक केले आहे.

नेहा कक्कर यंदा सारेगमच्या सेटवर साजरा करणार 'रक्षाबंधन'