आरजे सुमित आणि अभिनेत्री मयुरी घाडगे थिरकणार 'सांज' गाण्यात

आरजे सुमित आणि अभिनेत्री मयुरी घाडगे थिरकणार 'सांज' गाण्यात

'तुझ्या पेरमाच्या नादामंधी मी, वाहातया गेलो आता वाहातया गेलो...' असे गावरान भाषेत प्रेमाचे बोल ओठावर आणत आणि मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या या गाण्याच्या बोलांनी तर जणू हृदयाचा ठेकाच चुकविला आहे. सध्या रसिक प्रेक्षकांमध्ये रोमँटिक गाण्यांची क्रेझ जरा जास्तच आढळून येत आहे. म्हणूनच प्रेक्षकांच्या प्रेमापोटी हे प्रेमाचे तरल गीत एका म्युझिक व्हिडीओसह 'सांज' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

(वाचा : संगीतमय प्रेमकथा असलेल्या 'तत्ताड'चा ट्रेलर लाँच)

विशेष म्हणजे या गाण्यात संबंध कोल्हापूरला त्याच्या झणझणीत आवाजाची सवय असलेला आपला सर्वांचा लाडका आरजे सुमित पहिल्यांदाच 'सांज' या म्युझिक अल्बम मधून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला. त्याचे हे पदार्पण प्रेक्षकांच्या पसंतीस नक्की पडेल यांत शंकाच नाही. आजवर ज्याच्या आवाजाची नुसती सवय झाली होती असा हा सुमित प्रत्यक्षात एका गाण्यातून थिरकताना दिसणार ही सर्वच कोल्हापूरवासियांसाठी आणि मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी मेजवानीच ठरणार आहे.

(वाचा : सुभाष घईंचा मराठी सिनेमा 'विजेता' या दिवशी झळकणार बॉक्सऑफिसवर)

तसेच अभिनेत्री मयुरी घाडगे या गाण्यात सुमितसह रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. या दोघांशिवाय या गाण्यात विशाल राठोड आणि माधुरी सोनावणे यांची कलाकार म्हणून उत्तम साथ लाभली आहे. आपलं प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करण्यासाठी दोघांनीही म्हणजे सुमित आणि मयुरीने या संबंध गाण्यात तसूभरही उणीव भासू दिली नाही. या गाण्याचे चित्रिकरण बोरघर या गावात करण्यात आले असून अगदी गावरान आणि त्या गाण्याला साजेशा अशा नजराण्यांची कुठेही कमतरता आढळली नाही.

(वाचा : FIRST LOOK : अक्षय कुमारचा सिनेमा 'पृथ्वीराज'मध्ये अशी दिसणार मानुषी छिल्लर)

चेतन गरुड प्रोडक्शन प्रस्तुत, गिरीश जंगमे निर्मित आणि उमाकांत येले दिग्दर्शित 'सांज' या सुमधुर संगीताला दिलेली नृत्याची जोड अगदी प्रसन्न करून सोडणारी आहे. आपल्या दमदार आणि सुमधुर आवाजात गायक युवराज मेढे याने या गाण्याला शब्दबद्द केले आहे तर गाण्याचे बोल महेश खंडागळे यांनी संगीतबद्ध केले आहेत. तसेच या गाण्याची पटकथा चेतन गरुड लिखित आहे. सोशल एंटरटेनमेंट पार्टनर म्हणून लाभलेल्या टिकटॉक अँपमुळे या गाण्याची झळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यात नक्कीच यशस्वी ठरेल. नुकतेच प्रेमकथेच्या अनुषंगाने येणारे हे गाणं खासच झालंय यात वादच नाही. मुख्य म्हणजे व्हॅलेंटाईन डे जवळ आला असताना चेतन गरुड प्रोडक्शन प्रस्तुत आणि गिरीश जंगमे निर्मित 'सांज' हे गाणं सर्व प्रेमीयुगुलांसाठी एक पर्वणीच ठरेल.

(वाचा : संगीतमय प्रेमकथा असलेल्या 'तत्ताड'चा ट्रेलर लाँच)

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.