रोहित आणि विराटचं बिनसलं, विराटनंतर अनुष्कालाही केलं unfollow

 रोहित आणि विराटचं बिनसलं, विराटनंतर अनुष्कालाही केलं unfollow

भारताने यंदाचा वर्ल्ड कप गमावला. सेमीफायनलपर्यंत मजल दरमजल करत पोहोचलेल्या भारतीय टीमला सेमीफायनलमध्येच हार पत्करावी लागली. पण या पराजयानंतर भारतीय टीममध्ये फूट पडल्याच्या चर्चा होत आहेत. आता काही गोष्टी अशा घडल्या आहेत. ज्यामुळे भारतीय क्रिकेट टीममध्ये नक्कीच काहीतरी बिनसल्याचं कळत आहे. पण नेमंक कोणामध्ये असं विचारत असाल तर भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्माचं काहीतरी बिनसलं आहे. कारण रोहित शर्माने आधी विराट कोहलीला आणि आता त्याची बायको आणि अभिनेत्री अनुष्कालाही unfollow केलं आहे. त्यामुळे आतावर सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.

म्हणून केलं Unfollow

Instagrsm

विराट कोहलीच्या निर्णयावरुन अनेकदा रोहित शर्मा नाराज असतो. मॅचदरम्यान त्याने घेतलेल्या काही निर्णयामुळे त्यांच्यामध्ये बाचाबाची होते अशा देखील बातम्या वरचेवर येत असतात. आता एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार रोहित शर्माने नुकतेच अनुष्का शर्माला unfollow  केले आहे. त्यामुळे विराट कोहीवरील अनुष्काचा राग अजूनही गेलेला नाही. उलट त्यान अनुष्काला unfollow करुन कोहली कपलशी काहीच संबंध ठेवायचा नाही असे दाखवून दिले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिल्यानंतर ही बाब समोर आली आहे. 

अनिता हसनंदानीने सांगितले आई होण्याचे आपले प्लॅन्स

विराट अजूनही करतो रोहित शर्माला Follow

Istagram

रोहित शर्माने विराटला  unfollow केलं असलं तरी विराट मात्र अजूनही रोहित शर्माला follow  करत आहे. त्यामुळे विराटकडून कोणताही राग किमान सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आलेला नाही, असेच दिसत आहे. 

ऑनस्क्रीन स्टंट तर रिअलमध्ये टॅलेंटचा शोध घेणार अमृता

अनुष्का रोहित शर्माला करत नाही follow

अनुष्का शर्मा 142 जणांना instagramवर फॉलो करत असून या यादीमध्ये रोहित शर्मा आणि त्यांची पत्नी रितिका या दोघांनाही फॉलो करत नाही. आता या दोघी या आधी एकमेकांना फॉलो करत होत्या की, नाही हे माहीत नाही. पण विराट आणि रोहित यांच्या मतभेदाचा परिणाम त्यांच्या नात्यावर झाला आहे की नाही याची काहीच खात्री देता येत नाही.  पण वर्ल्डकप दरम्यानच्या निर्णयावर रोहित शर्मा विराट कोहलीवर नाराज झाला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये नेमकं काय झालं हे एक तर ते दोघेच सांगू शकतात.

मध्यरात्री का घेतली रणबीरने करण जोहरची भेट

शुक्रवारी कळेल खरं

आता या नुसत्या चर्चा आहेत की, खरचं असे काही घडले आहे. यावर आता फक्त भारतीय क्रिकेट टीम बोर्डच सांगू शकते. या शुक्रवारी बोर्डाची मिटींग होणार असून या अफवा आहेत की, खरचं असं काय झालं आहे ते आपल्याला कळू शकणार आहे.

Follow आणि unfollow चा सारा खेळ

सोशल मीडियावर एखाद्याला follow करुन unfollow करणे हे आता काही नवं राहिलेलं नाही. भांडण झाल्यानंतर अगदी आपणही एखाद्याला  unfollow करतो. पण ते लक्षात येत नाही. पण सेलिब्रिटींच्या बाबतीतही अगदी तसेच आहे म्हणा. भांडण झाल्यानंतर सोशल मीडियावर आपली मत व्यक्त करतात. त्यामुळेच त्यांची झालेली भांडणं अशापद्धतीने जगजाहीर होतात. काहीच दिवसांपूर्वी सुष्मिता सेन आणि रोहमन शॉ यांचं बिनसलं होतं. त्यानेही अशाच काही भावनिक स्टोरी पोस्ट केल्यानंतर आता त्यांचं सगळं आलबेल असल्याचं त्यांच्या पोस्टवरुन दिसत आहे.