रोहित शेट्टीच्या कुटुंबामध्ये झालं नव्या पाहुण्याचं आगमन

रोहित शेट्टीच्या कुटुंबामध्ये झालं नव्या पाहुण्याचं आगमन

रोहित शेट्टी हे नाव बॉलीवूडमध्ये सध्या खूप गाजत आहे. एकापाठोपाठ एक हिट देणाऱ्या रोहित शेट्टीच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहे हा नवा पाहुणा? तर कोणताही तर्कवितर्क लावायला सुरुवात करू नका. आम्ही तुम्हाला सांगतो हा पाहुणा कोण आहे. रोहित शेट्टी पिक्चर्झसाठी नृत्यदिग्दर्शिक आणि दिग्दर्शिका असणारी फराहा खान एक नवा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. याविषयी रोहित शेट्टीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून माहिती दिली आहे. इतकंच नाही तर फराहा खाननेदेखील या गोष्टीला पुष्टी देत दोघांचा फोटो शेअर केला आहे. लेट्स फ्लाय टुगेदर म्हणून रोहित शेट्टीने आपला आनंद व्यक्त केला आहे. रोहितने यापूर्वी ‘सिम्बा’ हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनसह दिग्दर्शित केला. आता अशा प्रकारचा एक ट्रेंडच येताना दिसत आहे. आता फराहा खान रोहित शेट्टीच्या प्रॉडक्शनमध्ये दिग्दर्शिका म्हणून काम करणार असून नक्की कोणता चित्रपट आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार याची मात्र अजून माहिती मिळालेली नाही. पण हा चित्रपट अॅक्शन कॉमेडी असल्याचं रोहितने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे अर्थातच पुन्हा एकदा अफलातून चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांसाठी मिळणार हे नक्की

फराहा खान झाली भावूक


फराहानेदेखील ही बातमी शेअर करत फोटो शेअर केला. मात्र आपण उत्साही आणि भावूक झाल्याचं रोहितचं नाव घेत फराहाने सांगतिलं आहे. चित्रपटांसाठी असणारं दोघांचंही प्रेम सर्वश्रुत आहे. ‘द मदर ऑफ ओल एंटरटेनर्स’ असा चित्रपट निर्माण करू असा विश्वासही या शेअर केलेल्या पोस्टमध्ये फराहाने दर्शवला आहे. हा चित्रपट रोहित शेट्टी पिक्चर्झ आणि रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनर अन्वये बनण्यात असल्याचंही या पोस्टवरून लक्षात येत आहे. फराहा आणि रोहित दोघेही खूपच चांगले मित्र आहेत. आता ही मैत्री मोठ्या पडद्यावर काय नवा रंग दाखवणार हे पाहावं लागेल. 

रोहित सध्या सूर्यवंशीमध्ये व्यग्र


रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. रोहित शेट्टीची कॉप ड्रामामध्ये मास्टरी झाली असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता अक्षयकुमार बरोबर येणारा नवा कॉप ड्रामा ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणामध्ये रोहित शेट्टी सध्या व्यग्र आहे. याच वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अजूनही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कळू शकलेली नाही. पण हादेखील सिंघम आणि सिम्बाप्रमाणेच धमाकेदार चित्रपट असेल अशी आशा प्रेक्षकांना आहे. प्रेक्षकांनी नस ओळखून मसालेदार चित्रपट बनवणं हा रोहित शेट्टीचा हातखंडा आहे. शिवाय रोहितच्या चित्रपटांमध्ये कॉमेडी आणि अॅक्शन भरभरून असल्यामुळे प्रेक्षकांनाही तीन तास डोक्याला कोणताही ताप न घेता चित्रपटाचा निखळ आनंद घेता येतो.   दरम्यान पुन्हा एकदा सिंघम सिरीजच्या तिसऱ्या भागाची तयारीही चालू असल्याची चर्चा आहे आणि सिम्बाच्या यशानंतर पुन्हा एकदा आता सिम्बा सिरीज पण सुरु होणार का अशी कुजबूज प्रेक्षकांमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे रोहित शेट्टी सध्या प्रचंड व्यग्र असून नवेनवे व्हेंचर सुरु आहेत. त्याव्यतिरिक्त टीव्हीवरदेखील रोहितचा शो ‘खतरों के खिलाडी’ सध्या टीआरपीच्या रेसमध्ये सर्वात पुढे आहे. एकंदरीतच सध्याचा दौर रोहित शेट्टीचा आहे असं म्हणावं लागेल.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा 


म्हणून आलिया भट दिसते इतकी सुंदर, जाणून घ्या रहस्य


शाहरूख खानला जमत नाहीये अक्षय कुमारबरोबर काम करणं


Are U Coming: टायगर श्रॉफचा 'या' डान्स मूव्हची सोशल मीडियावर वाढतेय क्रेझ