नव्या वर्षाची संध्याकाळ जोडीदारासह घालवा रोमँटिक चित्रपट पाहून

नव्या वर्षाची संध्याकाळ अशी घालवा रोमँटिक, पाहा हे चित्रपट

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (Dilwale Dulhaniya Le Jayenge)

शाहरूख आणि काजोलचा हा अजरामर चित्रपट कोणत्याही क्षणी तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचा मूड चांगला होतोच. रोमँटिक चित्रपट पाहायचा असेल आणि अशी नवं वर्ष सुरू होण्यापूर्वीची संध्याकाळ असेल तर यापेक्षा अधिक रोमँटिक चित्रपटाचं पहिलं नाव डोळ्यासमोर येणारच नाही. शाहरूख आणि काजोलच्या प्रेमाची ही केमिस्ट्री आपल्याला कितीही वेळा पाहिलं तरीही गुंतवून ठेवते हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे आणि तुम्हीही तुमच्या जवळच्या माणसाकडून अशीच प्रेमाची अपेक्षा करत असता. त्यामुळे हा चित्रपट पाहणं नक्कीच योग्य आहे. नव्या वर्षाच्या संध्याकाळी आपल्या जवळच्या व्यक्तीसह हा चित्रपट बघण्याची मजाच काही वेगळी आहे. 

ये जवानी है दिवानी (Ye Jawani Hai Deewani)

Instagram

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरची पडद्यावरची केमिस्ट्रीचे चाहते तुफान आहेत. अशा संध्याकाळी इतका रोमँटिक चित्रपट आपल्या गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंडसह पाहण्याची मजाच वेगळी आहे. एका वेगळ्याच विश्वास घेऊन जातो. आपल्याही आयुष्यात अशीच प्रेम करणारी व्यक्ती असावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि असं केवळ स्वप्नातील प्रेम नाही तर वास्तवाची जाणीव करत जगणारं प्रेमही यातून दिसतं. त्यामुळे हा चित्रपट कोणत्याही वेळी पाहता येतो. याशिवाय यामधील संवादही मनाला भिडतात.

2021 मध्ये या जोड्यांनी थाटावा संसार, चाहत्यांची इच्छा

जब व्ही मेट (Jab We Met)

करिना कपूर आणि शाहीदच्या करिअरला वेगळं वळण देणारा हा चित्रपट प्रेमी युगुलांसाठी उत्तम आहे. नव्या वर्षाच्या संध्याकाळी जर रोमँटिक चित्रपट पाहायचा तुमचा प्लॅन असेल तर त्या यादीमध्ये या चित्रपटाचे नाव नक्कीच यायला हवे. बॉलीवूडमधील रोमँटिक चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचे नाव घेतले जाणार नाही असं कधीच होणार नाही. मस्तीखोर आणि जगाची जाण नसणारी मुलगी आणि तितकाच गंभीर आणि मनापासून सर्व काही निभावणारा मुलगा अशी हटके असणारी लव्ह स्टोरी सर्वांनाच भावली होती.

2020 मध्ये लहान वयातच केला या कलाकारांनी जगाला अलविदा

कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai)

Instagram

शाहरूख, राणी मुखर्जी आणि काजोलच्या या चित्रपटाला कॉलेजमधील मुलांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हा चित्रपट आजही तितकाच आपलासा वाटतो. अनेक रेकॉर्ड ब्रेक करणारा हा चित्रपट तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्या व्यक्तीसह पाहू शकता. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला हवी असते. चित्रपटातील संवाद आणि अभिनयाने सर्वांचे मन जिंकून घेतले होते. त्यामुळे इतक्या वर्षानंतरही हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. 

पाहायला हवेत असे नवीन मराठी चित्रपट 2020 (Latest Marathi Movie List)

लव्ह आज कल (Love Aaj Kal)

दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानच्या उत्तम अभिनयाने साकारलेला आणि इम्तियाज अलीच्या उत्तम चित्रपटांपैकी एक असलेला लव्ह आज कल हा चित्रपटही तुम्ही रोमँटिक संध्याकाळी नक्कीच पाहू शकता. प्रेम हे कधीही कोणत्याही पिढीत सारखेच असते असा आशयाचा असणारा हा चित्रपट अगदी मनात घर करून बसतो. उत्तम अभिनय, संवाद आणि अप्रतिम गाण्यांचा हा चित्रपट नक्कीच तुमची संध्याकाळ रोमँटिक करतो यात वाद नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक