अभिनेत्री राजश्री ठाकूरचा कमबॅक, तब्बल पाच वर्षांनी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर

अभिनेत्री राजश्री ठाकूरचा कमबॅक, तब्बल पाच वर्षांनी पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर

सात फेरे या मालिकेतून सर्वांचं मन जिंकून घेणारी सलोनी म्हणजेच अभिनेत्री राजश्री ठाकूर आता छोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. राजश्री तब्बल पाचवर्षांनी हा कमबॅक करत आहे. पाचवर्ष टेलिव्हिजनपासून दूर राहिल्यावर आता एका नव्या मालिकेत राजश्री दिसणार आहे. या मालिकेत ती अशा एका राजस्थानी महिलेची भूमिका साकारणार आहे जिच्या व्यक्तिमत्वाला जगण्यातून हळूहळू अनेक पैलू मिळत जातात. जाणून घ्या या भूमिकेबाबत

या मालिकेतून राजश्री करणार कमबॅक

राजश्री ठाकूर लवकरच स्टार प्लसवर सुरू होणाऱ्या 'शादी मुबारक' या मालिकेतून कमबॅक करत आहे. ही मालिका एक फॅमिली रोमॅंटिक ड्रामा असणार आहे. या मालिकेची निर्मिती शशी-सुमित मित्तल करत असून त्यात राजश्री मुख्य भूमिकेत साकारणार आहे. या मालिकेत राजश्रीचे नाव 'प्रीती' असून ती एक सर्वसामान्य महिला आहे. राजश्रीच्या मते तिचे या मालिकेतील प्रीती हे कॅरेक्टर एक राजस्थानी महिलेचे असून ती या पूर्ण मालिकेत राजस्थानी पेहराव आणि साडीमध्ये दिसणार आहे. एका छोट्याशा गावात लहानची मोठी झालेल्या प्रीतीचे विचार आणि पेहराव अतिशय साधे असणार आहेत. पती आणि मुलांमध्ये खुश असणारी ती एक सामान्य गृहिणी आहे. मात्र तिच्या आयुष्यात असं काही घडतं की तिला स्वतःसाठी जगण्याची ईच्छा निर्माण होते. या भूमिकेला मालिकेत विविध पैलू आहेत पण जर ते आधीच सांगितले तर मालिकेबाबत असलेल्या उत्सुकता कमी होईल म्हणून जास्त खुलासा करण्यात आलेला नाही. या मालिकेसाठी प्रोमो शूट करण्यात आलेलं असून ऑगस्ट महिन्यापासून या मालिकेचे शूटिंग सुरू होईल. राजश्रीसोबत या मालिकेत 'मानव गोहिल'ही मुख्य भूमिकेत असणार आहे. तो यापूर्वी केसरी नंदन मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आला होता. त्याचप्रमाणे राजेश्वरी सचदेवही बऱ्याच कालावधीनंतर या मालिकेतून कमबॅक करणार आहे. डॉली मिन्हास, आकांक्षा सरीन, गौरव शर्मा, मनु मलिक, शैलेश गुलबनी यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका असतील. या मालिकेचं नाव आधी 'लव्ह यू जिन्दगी' असं ठरवण्यात आलं होतं मात्र नंतर ते बदलून 'शादी मुबारक' असं ठेवण्यात आलं.

राजश्री ठाकूर आणि महाराणी जयवंता बाई

राजश्री ठाकूरने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तिने साकारलेल्या भूमिका नेहमीच आव्हानात्मक आणि सक्षम महिलांच्या होत्या. सात फेरेमधील सलोनीप्रमाणेच राजश्रीने 2013 साली तिने भारत का वीर पूत्र महाराणा प्रताप या मालिकेत महाराणी जयवंता बाई यांची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे यापूर्वी राजश्रीने कसम से, कहो ना प्यार है, बनू में तेरी दुल्हन, एक से बढकर एक, सपना बाबूल का अशा मालिका आणि शोमध्ये दिसली होती. हिरकणी या मराठी चित्रपटातही तिने मागच्या वर्षी जिजामाता साकारून आपली एक झलक दाखवली होती. राजश्री आता पुन्हा छोट्या पडद्यावर तिच्या एका आव्हानात्मक भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. तेव्हा मालिका आणि प्रितीची भूमिका पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. 

View this post on Instagram

Starting tomorrow. Soooooo happy 🤗 Please Do watch

A post shared by Rajashree Thakur (@rajashreethakur_) on