गोपी बहू येतेय परत, सिद्धार्थ शुक्लादेखील मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची शक्यता

गोपी बहू येतेय परत, सिद्धार्थ शुक्लादेखील मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची शक्यता

सोशल मीडियावर सध्या एका संवादाची खूपच चर्चा होतेय आणि तो म्हणजे ‘रसोडे में कौन था’. यशराज मुखाते (yashraj mukhate) ने केलेल्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा राशीबेन, कोकिलाबेन आणि गोपी बहू ट्रेंडिंगमध्ये दिसले. ‘साथ निभाना साथीया’ (Saath Nibhana Saathiya) चा हा सीन तुफान व्हायरल झाला. यशराज मुखातेला या एडिटमधून प्रचंड फॅन फॉलोईंगदेखील मिळाला. तर आता या मालिकेशी संबंधित अजून एक आनंदाची बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे ‘साथ निभाना साथिया 2’ लवकरच सुरू होत आहे. निर्मात्यांनी या शो च्या दुसऱ्या सीझनची तयारी सुरू केली असून देवोलीना भट्टाचार्जीने याचा पहिला प्रोमोदेखील शूट केला आहे. गोपी बहू म्हणून पहिले जिया मानेकने भूमिका साकारली होती. मात्र तिने मालिका सोडल्यावर देवोलिनाने ही भूमिका साकारून अनेकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. आता पुन्हा एकदा गोपी बहू (Gopi Bahu) परत येत आहे.

‘रसोडे’ चा दाखला देऊनच प्रोमो

‘बिग बॉस’ फेम देवोलिना भट्टाचार्जी या मालिकेत पुन्हा एकदा गोपी बहूची भूमिका साकारणार असून तिचा प्रोमोही समोर आला आहे. या प्रोमोतही रसोडेबद्दल बोलण्यात आले असून यामध्ये ‘गहना’ या नव्या पात्राविषयीदेखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता ही गहना नक्की कोण असणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. देवोलीना पुन्हा एकदा त्याच भूमिकेत असली तरीही आता ती नक्कीच आईची भूमिका साकारणार असेल असंही दिसून येत आहे. पण ही मालिका नक्की आता कोणत्या महिन्यापासून सुरू होणार आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.

टेरेन्स लुईसचा हिंदीचा क्लास होतोय व्हायरल, Vlogeshwari मध्ये येतेय मजा

कोकिलाबेनसाठी अजूनही रूपल पटेलला विचारण्यात आलेले नाही

यातील कोकिलाबेनची भूमिका अजरामर केलेली अभिनेत्री रूपल पटेलला (Rupal Patel) अजूनही कोकिलाबेन या भूमिकेसाठी विचारण्यात आलेले नाही असं तिने सांगितले आहे. सध्या रूपल पटेल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या सिक्वेलमध्ये भूमिका साकारत आहे. तसंच आपण एका वेळी एकाच मालिकेत काम करू शकतो आणि सध्या या भूमिकेत आहोत असंही रूपल पटेलने सांगितलं आहे. तसंच मालिकेच्या दुसऱ्या सीझनसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे कदाचित कोकिलाबेन ही भूमिका आता या मालिकेत नसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ आल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री, केले ट्विट

सिद्धार्थ शुक्ला दिसणार मुख्य भूमिकेत

सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि देवोलीना भट्टाचार्जी बिग बॉसमध्ये एकत्र होते. सुरूवातीला दोघांचे अजिबातच पटत नव्हते. मात्र नंतर नंतर त्यांच्यातील खोटी भांडणं आणि त्यांची नोक झोक प्रेक्षकांनाही आवडू लागली होती. त्यामुळे या जोडीने एकत्र काम करावं असंही त्यांच्या चाहत्यांना वाटत होतं. आता सिद्धार्थ शुक्लालादेखील या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आल्याचं समोर येत आहे. मात्र याबद्दल खात्रीलायक वृत्त मिळू शकलेले नाही. अजूनही सिद्धार्थशी याबाबत बोलणी चालू असल्याचं म्हटलं जात आहे. जर सिद्धार्थने या मालिकेला होकार दिला तर नक्कीच देवोलीना आणि सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असेल. पहिला सीझन तुफान लोकप्रिय झाला होता. आता पुन्हा एकदा गोपी बहू आणि गहना काय कमाल करणार हे येणारा काळच ठरवेल.

अक्षय कुमारचा नवा स्टंट, बेअर ग्रिल्ससोबत करणार खतरनाक जंगलात भटकंती

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा