ADVERTISEMENT
home / मनोरंजन
साथ निभाना साथिया फेम ‘ही’ अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई

साथ निभाना साथिया फेम ‘ही’ अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई

टेलिव्हिजन शो साथ निभाना साथियामधील प्रत्येक पात्र चाहत्यांना आजही स्मरणात आहे. आता या शोचा दुसरा भाग टेलिव्हिजनवर प्रसारित होतो. मात्र पहिल्या भागानेही खूप कमी वेळात चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. आजही या मालिकेच्या पहिल्या भागातील कोकिलाबेन आणि गोपी, राशीवर अनेक मीम्स व्हायरल होताना दिसतात. मात्र या मालिकेत आणखी एक पात्र होतं परिधि मोदी जे साकारलं होतं लवी सासन म्हणजेच लवली सासनने. सध्या लवली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या मालिकेसाठी नाही तर वैयक्तिक आयुष्यातील एका गोड घटनेमुळे… अभिनेत्री लवलीने सोशल मीडियावर नुकतीच तिच्या दुसऱ्या प्रेगनन्सीची घोषणा एका खास स्टाईलने केली आहे. ज्यामुळे सगळीकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

लवलीन होणार दुसऱ्यांदा आई

लवलीन सासनने 2019 मध्ये 10 फेब्रुवारीला कौशिक कृष्णमुर्तीसोबत विवाह केला होता. दोघांचेही पंजाबी आणि साऊथ इंडियन अशा दोन्ही पद्धतीने अगदी थाटामाटात लग्न झाले. लग्नाआधी तो दोघं एकमेकांना ओळखत होते आणि डेट करत होते. लवलीन पंजाबी आहे तर तिचा पती कौशिक कृष्णमुर्ती साऊथ इंडियन आहे. आधी पंजाबी पद्धतीने तर तीन महिन्यानंतर साऊथ इंडियन पद्धतीने असं जवळजवळ तीन महिने त्यांचा लग्न सोहळा आणि लग्नाचे विधी सुरू होते.पंजाबी पद्धतीने केलेल्या लग्नात लवलीनने गुलाबी रंगाचा लेंगा आणि कुंदन ज्वैलरी घातली होती तर साऊथ इंडिअन पद्धतीने झालेल्या  लग्नात तिने पारंपरिक साडी आणि दागिने घातले होते.  लग्नानंतर लवलीन पतीसोबत बॅंगलोरला शिफ्ट झाली आणि तिने मालिकांमध्ये काम करणं काही प्रमाणात कमी केलं. त्यानंतर एका वर्षातच लवलीनने एका गोंडस मुलाला जन्म दिला. लवलीनच्या पहिल्या मुलाचे नाव रॉयस असे आहे. आता लवलीनने तिच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच रॉयसचा फोटो शेअर करत ती दुसऱ्यांदा आई होणार आहे याची घोषणा केली आहे. रॉयसने या फोटोमध्ये व्हाईट शर्ट घातला आहे आणि तो धावताना दिसत आहे. त्याच्या टीशर्टवर लिहिलं आहे की, ” मी लवकरच मोठा दादा होणार आहे” यासोबतच लवलीनने शेअर केलं आहे की मला माझी सेकंड प्रगनन्सीची घोषणा चाहत्यांसोबत करताना खूपच आनंद होत आहे. मी खूप उत्साही आहे की आता आमचं लिलिट बेबी दोन फुटाने वाढलं आहे. तिच्या या कॅप्शनवर अनेक टेलिव्हिजन स्टार्सनी तिला शुभेच्छा आणि आर्शीवाद दिले आहेत. 

लवलीननचा अभिनय प्रवास

लवलीनने साथ निभाना साथिया या मालिकेतून अभिनयात प्रवेश केला होता. या मालिकेमुळे तिला घराघरात चांगली प्रसिद्धी मिळाली. पुढे तिने बडे अच्छे लगते है, कितनी मौहब्बत है, सावधान इंडिया, अनामिका, क्या हुआ तेरा वादा, कैसा ये इश्क है अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये  काम केलं आहे. लग्न आणि मुलांच्या जबाबदारीमुळे लवलीन अभिनय क्षेत्रापासून दुरावली आहे. मात्र ती तिच्या संसार आणि मुलांमध्ये नक्कीच रमली असून आनंदी आणि उत्साही आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

 कंगना राणावतचे संपूर्ण कुटुंब झालंय योगामय, शेअर केले अनुभव

#KKK11 Promo: प्रेक्षकांना खिळवून ठेवायला तयार, राहुल वैद्यचा पहिला प्रोमो

बिग बॉस’ची तयारी सुरु, यंदा 6 महिने चालणार हा रिअॅलिटी शो

ADVERTISEMENT
22 Jun 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT