अभिनेत्री सई ताम्हणकर इज बॅक….येस्स मराठीची ग्लॅमगर्ल सई ताम्हणकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर परत आली आहे. अँड शी इज बॅक विथ द बँग.
View this post on Instagramआले परत! #saitamhankar #goodtobeback #backtothebay #missedyouall #nicebreak #muchneeded
सई ताम्हणकरने डिजीटल डिटॉक्सनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा ती म्हणाली, “हो, मी आता पाँडेचरीहून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही एका महिन्यांनी मुंबईत परत आले आहे. माझ्या सोशल मीडिया डिटॉक्सचा माझ्या शूटींगला खूप फायदा झाला. पण सोशल मीडियामुळे चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने मी चाहत्यांना खूप मिस केलं. या एका महिन्यात खूप काही घडलंय. मी पाँडेचरीत काय-काय केले ते लवकरच मी चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करेनच.” सईच्या या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
View this post on Instagram
सईने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडिया अकाऊंटवर ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचं जाहीर केलं होतं. या एक महिन्याच्या डिजीटल डिटॉक्समध्ये सई पाँडेचरीला होती. तिकडे सईने सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरण केलं.
View this post on Instagram
नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत आली आणि आल्या आल्या ती सोशल मीडियावरही परत आली. सोशल मीडियावर येताच सईने एक छान ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूटही केलं.
हे फोटोज म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी व्हिजुअल ट्रीट होती, असंच म्हणायला हवं. या फोटोशूटविषयी सई ताम्हणकरने सांगितलं की, “फोटोशूट करणं किंवा शुटींग करणं हा माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. आता डिजीटल डिटॉक्सनंतर मी पुन्हा नव्या जोमाने परतलीय. परत आल्यानंतर लक्षात येतंय की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. तसंच आमच्यासारख्या अभिनेत्यांसाठी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट करण्यासाठी जणू एक वरदान आहे. पण तरीही कधीतरी यातून ब्रेक घेऊन आयुष्यातल्या नव्या अनुभवांना सामोरं जाणंही गरजेचं आहे.”
काहीही असो. वी आर हॅपी सई इज बॅक.
हेही वाचा -