आजकाल सगळेच जण सोशल मीडिया अॅडीक्ट झाल्याचं दिसतं मग ती तरूणाई असो वा ज्येष्ठ नागरीक. पण मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर मात्र सध्या ‘डिजीटल डिटॉक्स’वर आहे.
मराठी सिनेसृष्टीतील 2018 मध्ये तिचे स्टाईलिश लूक्स असोत, परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स असो, कुश्ती लीगमध्ये एक टीम विकत घेणे असो किंवा स्टॅंडअप कॉमेडी करणे या ना त्या कारणाने सई सातत्याने चर्चेत होती. पण आता मात्र सई ताम्हणकरने सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचं ठरवलं आहे. याबाबतचा व्हिडीओ तिने इन्स्टा अकाउंटवर शेअर केला होता.
View this post on Instagram
सई ताम्हणकरचे सोशल मिडीयावर लाखो चाहते आहेत. सध्या सईच्या इंस्टाग्रामवर साडेनऊ लाखांपेक्षा जास्त चाहते असून ट्वीटरवर 79 हजारापेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. तसंच १० लाखांपेक्षा जास्त फोलोअर्स फेसबुकवर आहेत. अशा परिस्थितीत सईने अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार केला आहे.
या डिजीटल डीटॉक्सबाबत सई ताम्हणकरला विचारलं असता तिने सांगितलं की,, “ट्वीटर, इंस्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रिय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही काळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचेत, म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचं ठरवलं आहे."
View this post on InstagramSunshine On My Mind ! 💚 #saitamhankar #leaves #green #sunshine #treelover
एकीकडे दुसरे सेलिब्रिटीज सोशल मीडियावर एक मिलीयन फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात असताना जास्तीत जास्त पोस्ट आणि अपडेट्स टाकण्यावर भर देतात. मात्र सई ही नेहमीच हटके निर्णय घेण्यासाठी प्रचलित आहे. त्यामुळे डिजीटल डीटॉक्स हा सईचा एक नवा बोल्ड मूव्ह म्हणायला हरकत नाही.
View this post on InstagramYeah!!! Our super girl @saietamhankar with thalaivaa. #SaiTamhankar #SuperGirl #Celebrity #ShootTime
पण सईच्या या डिजीटल डिटॉक्सच्या निर्णयामुळे एक मात्र नक्की तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसलाय. कारण गेले 5 दिवस सईने तिच्या सोशल मीडियावर एकही पोस्ट टाकली नाहीये. सई सध्या आगामी 'पाँडीचेरी' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
आता एक महिन्यानंतर सईचा डिजीटल डीटॉक्स संपल्यानंतर ती काही नवीन सरप्राइजेस देणारं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हेही पाहा -
मराठी चित्रपटसृष्टीतल्या ‘10’ हॉट (Hot) आणि बोल्ड अभिनेत्री
'तेजस नेरुरकर'च्या कॅमेऱ्याने टिपली मराठी अभिनेत्रींची ही अनोखी रुपं...