अभिनेत्री सई ताम्हणकरचा परदेशातही बोलबाला

अभिनेत्री सई ताम्हणकरचा परदेशातही बोलबाला

नव्या वर्षात सध्या ‘हव्वा’ आहे ती फक्त अभिनेत्री सई ताम्हणकरचीच. नुकत्याच रिलीजे झालेल्या तिच्या ‘धुरळा’ या मल्टीस्टारर सिनेमातल्या सईच्या दमदार अभिनयाची चर्चा सगळीकडेच झाली. सई ताम्हणकरने या चित्रपटाने 2020 सालाची सुरूवात धमाकेदार केल्यावर आता ती धुरळा सिनेमा घेऊन परदेशात जाणार आहे. हो...सई लवकरच कतारमधल्या सिनेरसिकांची मनं जिंकायला पोहोचतेय.

महाराष्ट्रात 3 जानेवारीला धुरळा सिनेमा झळकताच सर्वत्र सई ताम्हणकरच्या उत्कृष्ट अभिनयाची चर्चा सुरू झाली. आता महाराष्ट्रानंतर हा सिनेमा इतर देशांमध्येही रिलीज होणार आहे आणि कतारमध्ये धुरळा सिनेमाच्या प्रिमीयरसाठी अभिनेत्री सई ताम्हणकर स्वत: जाणार आहे.

सूत्रांनुसार, सई ताम्हणकर ही एकमेव अभिनेत्री आहे, जी मराठी सिनेमाची आंतरराष्ट्रीय आयकॉन आहे. तिचं फक्त भारतातच नाहीतर ग्लोबल फॅनफॉलोइंग आहे. त्यामुळे कतारमध्ये हा सिनेमा रिलीज करण्याच्या वेळी खास तिथल्या सिनेरसिकांसाठी सई ताम्हणकर उपस्थित राहणार आहे. तसे आग्रहाचे आमंत्रणच सईला करण्यात आले आणि त्या विनंतीला मान देऊन सई कतारला जात आहे.

सई ताम्हणकरच्या या खास परदेशवारीबाबत तिला विचारलं असता ती म्हणाली की, “ प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की, त्याचं काम जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं आणि महाराष्ट्रातल्या रसिकांची दाद मिळवल्यावर आता इतर देशांमधल्या प्रेक्षकांपर्यंतही आमचा चित्रपट पोहचणार आहे. आम्हा प्रत्येक कलाकाराला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आलीय. त्यापैकी कतारच्या प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलीय. याचा खूप आनंद होतोय. आता कतारमधील माझ्या चाहत्यांना धुरळाच्या निमित्ताने भेटण्याची संधी मिळतेय. त्यांच्यापर्यंत सिनेमा पोहोचवण्याची आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता वाढलीय.”

यंदाच्या वर्षात दमदार सुरूवात करून तिने आपल्या पुढच्या कारकिर्दीला सुरूवात केली आहे. या वर्षात सई फक्त मराठीतच नाहीतर हिंदी सिनेमातही झळकणार आहे. 2020 सालात सईचे पाँडिचेरी, मीडियम स्पाईसी आणि हिंदीतील अभिनेत्री क्रिती सनोनसोबचा मिमी हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे लक्ष्मण उतेकर यांनी. मराठीतील मला आई व्हायचंय या सिनेमावर याची कथा बेतलेली आहे. सई नेहमीच हटके भूमिका करून आपल्या फॅन्सचं मन जिंकत असते. हे वर्षही त्याला नक्कीच अपवाद नाही.

सई नेहमीच तिच्या अभिनयासोबतच तिच्या सुंदर आणि बोल्ड लुक्समुळेही सततच चर्चेत असते. इतरवेळी वेस्टर्न आऊटफिट्समध्ये दिसणाऱ्या सईने धुरळामध्ये मात्र साडीतला लुक कॅरी केला आहे. तिने धुरळाच्या प्रमोशन आणि प्रिमीअरलाही साडीलाच पसंती दिली.

 

सोनेरी पिवळ्या बनारसी साडीतील सईचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या लुकमधील तिचा मेकअप आणि ज्वेलरीही लक्ष वेधून घेणारी होती. तुम्हीही करता का स्टाईल आयकॉन सई ताम्हणकरला फॉलो? 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.