सारा अली खानने 'अशा' दिल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सारा अली खानने 'अशा' दिल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिमचा आज वाढदिवस आहे. सारा अली खानने सोशल मीडियावर इब्राहिमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच साराने तिचा आणि इब्राहिमचा एक क्यूट फोटोदेखील तिच्या इन्स्टावर शेअर केला आहे. ज्यामध्ये इब्राहिमने तिला उचलून घेतले आहे. शुभेच्छा देताना साराने एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे. साराने लिहीले आहे, “ जगातील सर्वात बेस्ट अशा माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझ्या पाठी सतत खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि शांतपणे माझा मुर्खपणा सहन करण्यासाठी तुझे धन्यवाद.” या फोटोमधून  आणि पोस्टमधून सारा आणि इब्राहिमचे प्रेम दिसून येत आहे. भाऊ आणि बहिणीचं नातं हे नेहमीच अनोखं असतं. ते दोघं कितीही भांडले तरी मनातून मात्र त्याचं एक अतुट नातं नेहमीच राहतं. साराने शेअर केलेल्या या पोस्टमधून हेच सुंदर नातं दिसून येत आहे.

साराच्या पोस्टवर फॅन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया


साराने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या पोस्टला बारा लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. काही चाहत्यांनी इब्राहिमला "साराला खाली पडू देऊ नकोस" तर काहींनी "तुझ्या भावाप्रमाणे कोणीच नाही"  "लहानपणीचे सैफ आणि अमृता" अशा मजेशीर कंमेट्स दिल्या आहेत. अनेकांनी इब्राहिमला 'छोटा सैफ अली खान' असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सारा सध्या सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते आणि साराला अनेक चाहते फॉलो करतात.


sara and ebrahim


sara and emrahim 1


सारा लवकरच झळकणार 'लव आज कल 2' मध्ये


‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटातून चाहत्यांच्या मनात घर केलेल्या सारा अली खानला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  केदारनाथ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला तर सिम्बामधील अभिनय कौशल्यामुळे ती लोकप्रिय झाली. कमी वयात आणि इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यावर लगेच तिला चांगलं यश मिळालं. काही दिवसांपूर्वी साराने तिची आई अमृता सिंगच्या घरी राहणं सोडलं असून ती तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. सारा तिच्या नव्या घरात शिफ्ट झाली आहे असं सांगण्यात येत होतं. कारण तिने इंन्स्टावर एक  फोटो शेअर करत “Here’s to new beginnings!”  अर्थात “एक नवी सुरूवात” असं तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. मात्र नंतर ते एका अॅडच्या शुटिंगचे फोटो असल्याचं  उघड झालं. लवकरच सारा ‘लव आज कल 2’ या चित्रपटातून कार्तिक आर्यनसोबत झळकणार अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Here’s to new beginnings! 💘💝💞💖💗


A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on
‘सावट’मधल्या इन्व्हेस्टीगेटीव्ह ऑफिसरच्या भूमिकेसाठी स्मिता तांबेने कापले केस


...आणि कुंभ मेळ्यात उजळून निघाले ‘ब्रम्हास्त्र’, पाहा फोटो


अक्षय कुमारचा 'सुर्यवंशी'मधील फर्स्ट लुक रिलीज


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम