'बंटी और बबली'च्या सिक्वलमध्ये हा अभिनेता होणार बबलीचा बंटी

'बंटी और बबली'च्या सिक्वलमध्ये हा अभिनेता होणार बबलीचा बंटी

बंटी और बबली या चित्रपटाने चौदा वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.  2005 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी या दोघांची जोडी हिट ठरली होती. त्या काळात या चित्रपटातील अभिषेक, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या 'कजरा रे' या गाण्यावर प्रेक्षकांनीदेखील ताल धरला होता. बंटी और बबली या चित्रपटाचा आता लवकरच सिक्वल येत आहे. मात्र या चित्रपटात बबलीचा बंटी मात्र आता बदललेला असेल. 

instagram

कोण असणार बबलीचा बंटी

पहिल्या बंटी आणि बबलीमध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांची जोडी गाजली होती. या चित्रपटातील त्यांच्या लव्ह केमिस्ट्रीमुळे ही दोघं लवकरच खऱ्या खुऱ्या जीवनातही एकमेकांचे  उत्तम जोडीदार होतील असं अनेकांना वाटत होतं. मात्र त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्या रॉयशी लग्न केलं. ज्यामुळे अभिषेकच्या आयुष्यातून राणी कायमची दूर झाली. सहाजिकच आता बंटी आणि बबलीच्या सिक्वलमध्ये पुन्हा ही जोडी एकत्र दिसेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. मात्र प्रेक्षकांची ही इच्छा आता पूर्ण होणं शक्य नाही. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार या चित्रपटात राणी मुखर्जीसोबत सैफ अली खान हा अभिनेता दिसणार असण्याची शक्यता आहे. बंटी और बबलीच्या सिक्वलची निर्मिती यशराज फिल्म्स करणार आहे. राणी मुखर्जीचा मर्दानी 2 प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच बंटी और बबली 2 च्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. राणी मुखर्जीचा मर्दानी चित्रपट 13 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. शिवाय सैफदेखील सध्या एका वेबसिरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

instagram

सैफ आणि राणीला पुन्हा एकत्र पाहण्याचा योग

सैफ अली खान आणि राणीची जोडीदेखील एकेकाळी हिट जोडी मानली जायची. सैफ आणि राणीने हमतुम, तारा रम पम आणि थोडा प्यार थोडा मॅजिक अशा चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. आता बंटी और बबलीच्या सिक्वलमध्ये या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील. या सिक्वलमध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ बंटी आणि बबलीची भूमिका साकारणार आहेत. गोव्यामध्ये नुकतंच या चित्रपटाच्या काही भागांचं  शूटिंग करण्यात आलं. 

instagram

राणीचा मर्दानी 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

राणी मुखर्जी पुन्हा  एकदा मर्दानीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. मर्दानीच्या पहिल्या भागात चित्रपटात राणी मुखर्जीने 'शिवानी शिवाजी रॉय' या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. राणी मुखर्जीने तिच्या या भूमिकेसाठी प्रंचड मेहनत घेतली असून ती तिच्या सोशल मीडियावरील फोटोजवरून दिसून येत आहे. पुन्हा एकदा एका डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणं नक्कीच तिच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करत आहे. तर दिग्दर्शक गोपी पुथरन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. वास्तविक राणीने लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर चित्रपटात काम करणं कमी केलं होतं. मर्दानी नंतर राणीने ‘हिचकी; या चित्रपटात काम केलं होतं. हिचकीमधील तिची भूमिकादेखील प्रंचड गाजली होती. राणी मोजक्या चित्रपटात काम करत असली तरी तिच्या भूमिका हटके आणि महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे आजही राणीचे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसतात. शिवाय आता ती पुन्हा एकदा ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटात दिसणार असल्यामुळे चाहते नक्कीच खुश आहेत.  

फोटोसौजन्य - इन्साग्राम 

हे ही वाचा-

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

बॉडी शेमिंगवर इलियानाने ट्रोलर्सला दिले सडतोड उत्तर

प्रियांका चोप्रा जगभरात गुगल सर्चवर सर्वात पुढे

Good Newwz’च्या टायटलमध्ये का वापरलं चुकीचं स्पेलिंग, करण जोहर म्हणाला…