सैफला ‘पद्मश्री’ पुरस्कार द्यायचा होता परत...पण नक्की काय घडलं

सैफला ‘पद्मश्री’ पुरस्कार द्यायचा होता परत...पण नक्की काय घडलं

अभिनेता सैफ अली खान त्याच्या अभिनय आणि इतर गोष्टींसाठीही नेहमीच चर्चेत असतो. सध्या जास्त चर्चेत असतो तो म्हणजे त्याचा मुलगा तैमुरमुळे. पण आता अजून एका कारणाने सैफ चर्चेमध्ये आलाय. अरबाज खानला ‘पिंच’ या त्याच्या शो मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफने आपल्याला 2010 या वर्षी मिळालेला ‘पद्मश्री’ हा सन्मान पुरस्कार परत द्यायचा होता असं सांगितलं आहे. पण नक्की असं सैफला का वाटलं होतं हेदेखील त्याने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे.


saif FI


सैफला युजरने पद्मश्री खरेदी केल्याचा मारला टोमणा


अरबाज खानच्या या शो मध्ये सोशल मीडियावर युजर्स काय बोलतात अथवा चर्चा करतात याविषयी सैफशी बोलणं चाललं होतं. त्यामध्ये एका युजरने ‘पद्मश्री खरेदी करणारा, आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवणाऱ्या आणि एका रेस्टॉरंटमध्ये मारधाड करणाऱ्या अशा ठग माणसाला ‘सेक्रेड गेम्स’ मध्ये भूमिका कशी मिळाली? याला अभिनयदेखील करता येत नाही.’ असा टोमणा सैफ अली खानला मारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना सैफने आपली बाजू स्पष्ट केली. यावर प्रतिक्रिया देताना सैफने सांगितलं, ‘मी ठग नाहीये. ‘पद्मश्री’ विकत घेणं कोणालाही शक्य नाही. भारत शासनाला कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवणं मला शक्य नाहीये. त्यासाठी तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या. पण हे खरं आहे की, मला पद्मश्री स्वीकारायचा नव्हता.’ हा पुरस्कार न स्वीकारण्याचा विचार करण्यामागचं कारणही त्याने यावेळी सांगितलं, ‘चित्रपटसृष्टीत आपल्यापेक्षा अनेक वरिष्ठ अभिनेता होते ज्यांना हा सन्मान मिळावा आणि त्यांना तो सन्मान मिळण्याचा हक्क आहे असं मला वाटतं होतं. पण त्याचबरोबर काही अशा कलाकारांजवळही हा पुरस्कार आहे जे माझ्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत.’ आपल्या दिवंगत वडिलांशी बोलून सैफने हा सन्मान स्वीकारण्याचा निर्णय घेतला असंही यावेळी त्याने सांगितलं.


पुरस्कार परत द्यायचा होता - सैफ


saif 1


सैफने पुढे असंही सांगितलं की, ‘मला हा पुरस्कार परत द्यायचा होता. मला खरं तर हा पुरस्कार स्वीकारायचा नव्हता. पण माझ्या वडिलांनी त्यावेळी सांगितलं की, भारत शासनाला नकार देणं योग्य आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे तू नकार देऊ शकशील असं वाटत नाही. त्यामुळेच मी होकार दिला आणि आनंदाने त्याचा स्वीकारही केला.’ त्यानंतर त्याने स्वतःच्या अभिनयाबद्दलही स्पष्ट केलं, ‘मी ही गोष्ट अशीच स्वीकारली आहे. मी काम करणं अजून बंद केलं नाही आणि अभिनय ही माझी आवड आहे. मी नक्कीच बरं काम करतो. जे काही सध्या माझ्याकडे काम आहे त्यामध्ये मी आनंदी आहे. मला आशा आहे की, प्रेक्षक जेव्हा माझ्या भूतकाळातील कामाकडे पाहतील तेव्हा नक्कीच म्हणतील की, ही व्यक्ती नक्कीच सन्मानाच्या लायक आहे.’ दरम्यान याच मुलाखतीमध्ये एका ट्रोलरला नवाब असण्यावरूनही सडेतोड उत्तर दिलं, ‘नवाब’ होण्यात मला अजिबातच रस नव्हता. मला त्यापेक्षा कबाब खाण्यात जास्त स्वारस्य आहे.’ असं मजेशीर उत्तर यावेळी सैफने दिलं. कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सैफच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजचा दुसरा भाग लवकरच येत आहे. पहिल्या वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांना सैफचं काम खूपच आवडलं होतं.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


वेबसीरिजनंतर आता सैफला टीव्ही सीरियलचे वेध


वेबसीरिजमध्ये सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूरच सर्वाधिक लोकप्रिय


करिना कपूर आणि सैफ अली खानची 'लव्हस्टोरी'