वेबसीरिजनंतर आता सैफला टीव्ही सीरियलचे वेध

वेबसीरिजनंतर आता सैफला टीव्ही सीरियलचे वेध

बॉलीवूड इंडस्ट्रीतील तीन खान म्हणजेच सलमान, आमिर आणि शाहरुख खान चित्रपटांसोबतच टीव्हीच्या दुनियेतही आपलं नशीब आजमावलं आहे. आता या लिस्टमध्ये अजून एका खानचं नाव सामील होत आहे तो खान म्हणजे सैफ अली खान. हो...नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्सच्या पहिल्या यशस्वी सिझननंतर आता सैफ लवकरच टीव्हीवर झळकण्यासाठी सज्ज आहे. तब्बल 25 वर्षांच्या आपल्या बॉलीवूड करिअरमध्ये विविध भूमिका रंगवल्यानंतर आता सैफ टीव्हीवर झळकणार आहे. टीव्हीचा पडद्याची पोच किती मजबूत आहे, ते सगळ्याच कलाकारांना आता माहीत आहे. त्यामुळे सैफनेही हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय.


शाहरूखनंतर आता सैफ सूत्रधार
 

 

 


View this post on Instagram


 

 

KAHAAN HUM KAHAAN TUM ❤️❤️ Jai Mata Di


A post shared by Sandiip Sikcand (@sandiipsikcand) on
सैफ झळकणार असणाऱ्या या सीरियलचं नाव आहे ‘कहा हम कहा तुम’. सूत्रानुसार, सैफ अली खान संदीप सिंकदच्या नव्या सीरियलमधील कलाकारांची प्रेक्षकांशी ओळख करून देणार आहे. या शोमध्ये दीपिका कक्कर आणि करण ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, सैफ फक्त या सीरियलमधल्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांबाबत प्रेक्षकांना सांगेल. म्हणजेच तो एका सूत्रधाराच्या भूमिकेत दिसेल.  


तैमूर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये एंट्री
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by Kahaan Hum Kahaan Tum (@kahaanhumkahaantum_) on
ही सीरियल एक लव्ह स्टोरी आहे. ज्यामध्ये दीपिका कक्कर एका अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार असून करण या सीरियलमध्ये कार्डिओलॉजिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे.


करिना कपूर आणि सैफ अली खानची 'लव्हस्टोरी'


जर तुम्हाला लक्षात असेल तर मागच्या वर्षी एकता कपूरच्या लाँच करण्यात आलेल्या कसौटी जिंदगी की या सीरियलसाठी शाहरूखनेही असंच केलं होतं. सूत्रानुसार सैफने मागच्या आठवड्यातच या सीरियलचं शूटींग पूर्ण केलं आहे. या सीरियल शूटींग सध्या मुंबईत केलं जात आहे.  


तैमूरच्या लोकप्रियतेमुळे होतोय शेजाऱ्यांना त्रास


सैफचा पुढचा प्लॅन


saif-on-tv-1


चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास सैफ लवकरच अजय देवगण आणि काजोल स्टारर तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सैफ जवानी जानेमन आणि भूत पुलीस या चित्रपटातही दिसणार आहे. जवानी जानेमन या चित्रपटात तब्बल 20 वर्षानंतर तब्बू आणि सैफची जोडी दिसणार आहे. या आधी दोघांनी सूरज बडजात्या यांच्या ‘हम साथ साथ है’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा एक कॉमेडी सिनेमा आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Iss khel ka asli baap kaun?


A post shared by Sacred Games (@sacredgames_tv) on
तसंच लवकरच त्याच्या गाजलेल्या वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स'चा ही पुढचा सिझन येणार आहे.