करीना कपूरमुळे चर्चेत असलेल्या सैफ अली खानची येणार ऑटोबायोग्राफी

करीना कपूरमुळे चर्चेत असलेल्या सैफ अली खानची येणार ऑटोबायोग्राफी

ऑटोबायोग्राफीच्या यादीमध्ये आता आणखी एक अभिनेत्याचे नाव लवकरच जोडले जाणार आहे. पतौडी खानदानातील नवाब अभिनेता सैफ अली खानचे आत्मचरित्र पुढील वर्षी प्रकाशित केले जाणार आहे. सैफ अली खान आत्मचरित्र स्वत:च लिहिणार असून ते हारपर कॉलिन्स नावाची पब्लिशर छापणार आहे. सैफ अली खानच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटनांचा यामध्ये समावेश असणार आहे. आत्मचरित्र हा विषय खरंतरं एखाद्याच्या आयुष्याचा अत्यंत गंभीर असा विषय असतो. पण त्यावरही सोशल मीडिया चांगलीच तुटून पडली आहे. सैफ अली खानच्या ऑटोबायोग्राफीच्या निर्णयावर अनेकांनी मीम्सचा पाऊस केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचीही फार चर्चा आहे.

यशराज फिल्म्सचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, नवीन लोगो होणार प्रदर्शित

आत्मचरित्रात उलगडणार आयुष्याच्या महत्वाच्या गोष्टी

Instagram

आत्मचरित्राच्या माध्यमातून सैफ अली खान त्याच्या आयुष्यातील अनेक चढ- उतार मांडणार आहे. करीअरसोबतच त्याचे खासगी आयुष्यही नेहमी काहीना काही कारणास्तव चर्चेत राहिले आहे. 2016 साली तैमूरचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नावावरुन अनेकांनी विरोध केला होता. तैमूर हे नाव इतिहासात देशाच्या विरोधी लढणाऱ्याचे होते. त्यामुळे हे नाव ठेवताना विचार करावा असा अनेकांनी त्याला सल्ला कमी समज बजावला पण तरीही एका योद्ध्याचे नाव म्हणून त्याने आपल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ असे ठेवले. त्याचाही यामध्ये समावेश असणार आहे. करीनासोबत लग्न केल्यानंतर आणि तैमूरच्या जन्मानंतर बदलेल्या आयुष्याचा तो या आत्मचरित्रामध्ये समावेश करणार आहे. त्याने याबद्दल अधिक सांगितले की, आयुष्याचा हा काळ खूप मागे गेला पण आजही मनाच्या एका कप्प्यात आहे तो विसरेन या आधी मला तो लिहून ठेवायचा आहे. त्यासाठीच सैफ अली खान आत्मचरित्र लिहिणार आहे. 2021 मध्ये तो हे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. 

करीना कपूरमुळे आला प्रकाशझोतात

अभिनेता म्हणून सैफ अली खानने दिमाखदार कामगिरी केली असली. तरी त्याने वयपरत्वे काही कामे करणे सोडून दिले होते. पण तो अचानक प्रकाशझोतात आला तो त्याच्याहून वयाने लहान असणाऱ्या करीना कपूरसोबत लग्न केल्यामुळे. आपल्या वयाच्या अर्ध्या करीना कपूरशी त्याचे एका चित्रपटादरम्यान प्रेमसंबंध जुळले आणि त्याने 2012 साली तिच्याशी लग्न केले. त्यानंतर सैफच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा गॉसिपचा विषय होता. अनेकांना हे रुचले नव्हते. कारण सैफ आधीच दोन मोठ्या मुलांचा पिता होता. अम्रिता सिंहसोबत त्याने लग्न केले होते. ते वेगळेही झाले होते. पण इतक्या लहान अभिनेत्रीशी तो लग्न करेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. 

एस. एस. राजमौलीच्या 'RRR' मध्ये आता आलियाऐवजी प्रियांकांची वर्णी

सैफने नुकतीच साजरी केली पन्नाशी

सैफ अली खानने नुकतीच त्याची पन्नाशी पूर्ण केली आहे. यावेळी बेबोने खास त्याच्यासाठी एक व्हिडिओही शेअर केला होता.शिवाय आताच त्यांनी सगळ्यांना गुडन्यूज ही दिली आहे. सैफ अली खान पुन्हा एकदा बाबा बनणार आहे. दुसऱ्या बाळाचे स्वागत ते नव्या वर्षांत करणार असल्याचे कळत आहे.  करीअरचा विचार केला तर करीना कपूर आमीर खानसोबत लालसिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. तर सैफ अली खान ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटात दिसणार आहे.. सैफने त्याच्या आत्मचरित्राची घोषणा केल्यापासून अनेक मीम्सही वायरल होऊ लागले आहेत. 


आता त्याच्या फॅन्सना प्रतिक्षा आहे ती सैफच्या ऑटोबायोग्राफीची

रणवीर सिंगवर खळबळजनक आरोप, सुशांत प्रकरणात टीका